जिओनंतर एअरटेलमध्येही गुगलची गुंतवणूक, बनवणार स्वस्त स्मार्टफोन

यूएस टेक कंपनी गुगलने भारती एअरटेलमध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये $700 दशलक्ष म्हणजेच 5,224 कोटी रुपयांची इक्विटी गुंतवणूक देखील यात समाविष्ट आहे. भारतातील टेलिकॉम कंपनीत गुगलची ही दुसरी गुंतवणूक आहे.

After jio, Google's investment in Airtel will also make cheaper smartphones
जिओनंतर एअरटेलमध्येही गुगलची गुंतवणूक, बनवणार स्वस्त स्मार्टफोन ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुगल एअरटेलमध्ये हिस्सा घेणार,
  • 7,400 कोटींची गुंतवणूक करणार
  • कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनासह ही भागीदारी

नवी दिल्ली : भारती एअरटेलने गुगलसोबत भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. भारती एअरटेलने शुक्रवारी जाहीर केले की Google भारताच्या डिजिटल इकोसिस्टमला पुढे नेण्यासाठी 1 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून पुढील पाच वर्षांत Google ने $1 बिलियन (सुमारे 7,400 कोटी) पर्यंत गुंतवणूक करण्याचा मानस असल्याचे Airtel ने म्हटले आहे. (After jio, Google's investment in Airtel will also make cheaper smartphones)

अधिक वाचा : टाटांचा महाराजा आजपासून टाटांच्या अंगणात, ६९ वर्षांनी एअर इंडिया टाटांकडे सुपूर्त


एअरटेलने सांगितले की, या कराराअंतर्गत ते एअरटेलमधील 1.28 टक्के स्टेक $700 दशलक्षला खरेदी करेल, ज्याची किंमत प्रति शेअर 734 रुपये आहे. त्याच वेळी, व्यवसाय करारांच्या अंमलबजावणीसाठी $ 300 दशलक्ष गुंतवणूक केली जाईल. तसेच, 5G नेटवर्कच्या जगात भागीदारी मजबूत होईल. संपूर्ण भारतातील व्यवसायांसाठी क्लाउड इकोसिस्टमला गती देण्यासाठी मदत करेल.


भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल म्हणाले, "एअरटेल आणि Google नाविन्यपूर्ण उत्पादनांद्वारे भारताच्या डिजिटल विकासाला चालना देण्यासाठी एक दृष्टीकोन सामायिक करतात. तर Google आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की एअरटेल भारताचे डिजिटल भविष्य घडवत आहे. त्याच वेळी, आम्हाला अभिमान आहे. कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनासह ही भागीदारी करण्यात येणार आहे.

Google आणि Alphabet चे CEO, सुंदर पिचाई म्हणाले, “Airtel मधील आमची व्यावसायिक आणि इक्विटी गुंतवणूक ही आमच्या Google for India डिजिटायझेशन फंडाच्या स्मार्टफोन्समध्ये प्रवेश वाढवणे, नवीन व्यवसाय मॉडेल्सना समर्थन देण्यासाठी कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि कंपन्यांना त्यांच्या डिजिटल परिवर्तनासाठी मदत करणे याच्या प्रयत्नांची एक निरंतरता आहे."

5G नेटवर्कसंदर्भातील कराराअंतर्गत एकत्र काम

या गुंतवणुकीचा वापर देशातील लोकांना परवडणारे स्मार्टफोन आणि इतर अँड्रॉइड उपकरणे देण्यासाठी केला जाईल. याशिवाय, 5G आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेऊन, ही गुंतवणूक भारतासाठी एक विशेष नेटवर्क डोमेन तयार करण्यासाठी देखील वापरली जाईल. एअरटेलच्या म्हणण्यानुसार, गुगलसोबतच्या भागीदारीनंतर सर्व किंमतींच्या श्रेणींमध्ये मोबाइल फोन प्रदान केले जातील. तसेच, दोन्ही कंपन्या 5G नेटवर्कसंदर्भातील कराराअंतर्गत एकत्र काम करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी