लिंबानंतर आता जिऱ्यालाही महागाईची फोडणी ! ५ वर्षांची उच्चांकी भाववाढ

Cumin Prices Hike : क्रिसिलच्या मते, 2021-2022 च्या रब्बी हंगामात जिऱ्याखालील क्षेत्र देखील वर्षभरात 21 टक्क्यांनी घटून 9.83 लाख हेक्टरवर आले. शेतकरी मोहरी आणि हरभरा पिकांकडे वळल्यामुळे एकरी उत्पादनात घट झाली आहे.

After Limba, now cumin is also bursting with inflation! High inflation every 5 years
लिंबानंतर आता जिऱ्यालाही महागाईची फोडणी ! दर ५ वर्षांच्या उच्चांकी भाववाढ ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लिंबानंतर आता जिऱ्याचे भाव वाढू शकतात,
  • उत्पादन घटल्याने जिऱ्याचे किलोमागे २७५ ते ३०० रुपयांपर्यंत दर पोहोचण्याची शक्यता
  • सध्या एक किलो जिऱ्याला २१० रुपयांचा दर मिळाला आहे.

मुंबई : पेट्रोल आणि लिंबानंतर आता स्वयंपाक घरात फोडणीसाठी वापरण्यात येणारे जिऱ्याच्या दरातही वाढ होऊ शकते. पेरणीखालील क्षेत्र कमी झाल्याने आणि अतिवृष्टीमुळे जिरे पिकाचे झालेले नुकसान यामुळे भाव 30-35 टक्क्यांनी वाढून 5 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचू शकतात. क्रिसिल रिसर्चच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, कमी उत्पादनामुळे जिऱ्याची किंमत 165-170 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते.

अधिक वाचा : Share Market Investment | उन्हाळा कडक आहे, मात्र यातही कमाईची संधी आहे...वीजेच्या मागणीमुळे कंपन्यांची कमाई, कोणत्या शेअरमध्ये करावी गुंतवणूक

दर 165 रुपयांपर्यंत 

पीक हंगाम 2021-22 (नोव्हेंबर-मे) मध्ये, विविध कारणांमुळे जिऱ्याचे उत्पादन कमी राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे जिऱ्याच्या किमती 5 वर्षांच्या उच्चांकावर जाऊ शकतात. क्रिसिलचा अंदाज आहे की 2021-2022 च्या रब्बी हंगामात जिऱ्याच्या किमती 30-35 टक्क्यांनी वाढून 165-170 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतात.

अधिक वाचा : 

LIC IPO | एलआयसीच्या आयपीओसंदर्भात मोठी बातमी! अर्थ मंत्रालयाने बँक कर्मचाऱ्यांच्या बदलीवर घातली बंदी

उत्पादन कमी

क्रिसिलच्या मते, 2021-2022 च्या रब्बी हंगामात जिर्‍याखालील क्षेत्र देखील वर्षानुवर्षे 21 टक्क्यांनी घटून 9.83 लाख हेक्टरवर आले आहे. दोन प्रमुख जिरे उत्पादक राज्यांपैकी गुजरातमध्ये लागवडीखालील क्षेत्र 22 टक्के आणि राजस्थानमध्ये 20 टक्क्यांनी घटले आहे. शेतकऱ्यांनी मोहरी आणि हरभरा पिकांकडे वळल्यामुळे एकरी उत्पादनात घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मोहरी आणि हरभऱ्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी त्यांच्या लागवडीकडे आकर्षित झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी