कंपन्यांवर मंदीचे सावट: मेटा, अ‍ॅमेझॉननंतर 'या' कंपनीतून कर्मचारी कपात

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 20, 2022 | 13:16 IST

सिस्कोचे मुख्य आर्थिक अधिकारी स्कॉट हेरेन यांनी म्हटले की, आम्ही काही प्राधान्यक्रम निश्चित करत आहोत. काही क्षेत्रांमध्ये आम्हाला अधिक गुंतवणूक करायची आहे. सिक्युरिटी, क्लाउड डिलिव्हरर्ड प्रोडक्ट अशा उत्पादनांकडे लक्ष देत आहोत. आम्ही ज्या नवीन क्षेत्रात गुंतवणूक करत आहोत, त्या क्षेत्रात निर्माण झालेल्या रोजगाराची संख्या पाहिल्यास या नोकरकपातीचा परिणाम फार कमी लोकांवर झालेला असू शकतो.

Meta, Twitter and Amazon this Company layoffs
कंपन्यांवर मंदीचे सावट: मेटा, अ‍ॅमेझॉननंतर 'या' कंपनीतून कर्मचारी कपात: अनेकांवर बेरोजगारीची वेळ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • सिस्कोमध्ये जवळपास 4100 कर्मचारी कपात होणार आहे.
 • जगभरात सिस्कोचे 83,000 हजार कर्मचारी आहेत.
 • मेटामधून सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.

CISCO Layoffs: आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांवर(companies) मंदीचे सावट दिसत असून काही कंपन्यांमधून कर्मचारी  (staff) कपातीला सुरुवात झाली आहे. मेटा, अ‍ॅमेझॉन आणि ट्विटरनंतर आता मोठी टेक कंपनी (Tech company) सिस्कोनेही (Cisco) कर्मचाऱ्यांना  (employees ) कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर सिस्कोमधून पाच टक्के कर्मचाऱ्यांचा रोजगार जाणार आहे. याआधी, मेटाने सुमारे 11,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे आणि Amazon ने 10,000 कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. कंपन्यामधून होणाऱ्या कर्मचारी कपातीमुळे जगावर आलेल्या  मंदीचे सावट आता गडद होत असल्याचं दिसत आहे. (After Meta, Twitter and Amazon this Company layoffs) 

अधिक वाचा  : तुमचा डेटा आणखी होणार सुरक्षित, केंद्र सरकार आणणार कायदा

सिलिकॉन व्हॅली बिझनेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, सिस्कोमध्ये जवळपास 4100 कर्मचारी कपात होणार आहे. जगभरात सिस्कोचे  83,000 हजार कर्मचारी आहेत. व्यवसायात 'पुनर्संतुलन' करण्यासाठी कर्मचारी कपात करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या सर्व चर्चा होत असताना सिस्कोचे अध्यक्ष आणि सीईओ चक रॉबिन्स यांनी कंपनीतील नोकरकपातीबाबत कोणतेही भाष्य केले नाही. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांशी अधिक तपशीलवारपणे संवाद साधत नाही. तोपर्यंत आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही.

आम्ही व्यवसायात संतुलन आणण्यासाठी प्रयत्न करत असून काही प्राथमिकता, प्राधान्यदेखील निश्चित करत आहोत, असेही त्यांनी म्हटले.  दरम्यान, कंपनीच्या  यंदाच्या पहिल्या तिमाही निकालात सिस्कोचे 13.6 अब्ज डॉलर इतके उत्पन्न नोंदवण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांची अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. 

अधिक वाचा  : अस्थी विसर्जन करून परतत असताना कारला भयंकर अपघात

सिस्कोचे मुख्य आर्थिक अधिकारी स्कॉट हेरेन यांनी म्हटले की, आम्ही काही प्राधान्यक्रम निश्चित करत आहोत. काही क्षेत्रांमध्ये आम्हाला अधिक गुंतवणूक करायची आहे. सिक्युरिटी, क्लाउड डिलिव्हरर्ड प्रोडक्ट अशा उत्पादनांकडे लक्ष देत आहोत. आम्ही ज्या नवीन क्षेत्रात गुंतवणूक करत आहोत, त्या क्षेत्रात निर्माण झालेल्या रोजगाराची संख्या पाहिल्यास या नोकरकपातीचा परिणाम फार कमी लोकांवर झालेला असू शकतो. तसेच आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना त्या भूमिकांशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. तिथे कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा कस लागणार आहे. असंही ते पुढे बोलताना म्हणाले. 

आयटी कंपन्यांवर मंदी, या कंपन्यांमध्ये होत आहे कर्मचारी कपात 

 • Twitter- कंपनीने आपल्या जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. सुमारे 3700 लोकांची छाटणी करण्यात आली आहे.
 • मेटा- मेटामधून सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.
 • Amazon – या कंपनीमधील 10,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. 
 • Netflix - मधून  500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.
 • L&T - कंपनीने कामगारांची संख्या 5 टक्क्यांनी कमी केली आहे.
 • टेक महिंद्रा - सुमारे 1.4 टक्के लोकांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. 
 • विप्रो - कर्मचार्‍यांवर जास्त खर्च होत असल्यामुळे 6.5% कर्मचारी कमी करण्यात आले आहे. 
 • स्नॅपचॅट - स्टॉकमध्ये 40 टक्के घट झाल्यामुळे 20 टक्के कपातीची तयारी करत आहे. 1,000 कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील.
 • Shopify - कंपनीने आपल्या 10 टक्के कर्मचार्‍यांची काढून टाकण्याची घोषणा केली आहे. यानुसार, 1,000 हून अधिक कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात.
 • मायक्रोसॉफ्ट- कंपनीने घटत्या कमाईमुळे जुलैपासून सुमारे 1 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
 • इंटेल- कंपनी आपल्या 20 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. 
 • सी-गेट- कंपनीने आपल्या 8 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा  केली आहे. यानुसार, सुमारे 3,000 कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात.
 • लिफ्ट- गेल्या एका महिन्यातच कंपनीने आपल्या 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. सुमारे 700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. 
 • स्ट्राइप - कंपनी 14 टक्क्यांनी कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे सुमारे 1,120 कर्मचाऱ्यांवर बेरोजगगारीचे वेळ येणार आहे. 
 • ओपनडोअर - ही कंपनीने आपल्या 18 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे, यानुसार, 550 कर्मचार्‍यांना दुसरीकडे  काम शोधावे लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी