पुणे, मुंबईनंतर आता ऑलेक्ट्राच्या इलेक्ट्रिक बसेस ठाण्यातही धावणार

9 महिन्यांच्या कालावधीत या बसेसचे वितरण होईल.  हा करार १५ वर्षासाठी करण्यात येणार आहे. या निविदेची अंदाजे किंमत  185 कोटी रुपये एवढी असेल. यात  १२ मीटरच्या एकूण ५५ बसेस आहेत यात ४५ एसी तर १० विना-वातानुकूलित आहेत.

After Pune, Mumbai, now electric buses of Olectra will also run in Thane
पुणे, मुंबईनंतर आता ऑलेक्ट्राच्या इलेक्ट्रिक बसेस ठाण्यातही धावणार 
थोडं पण कामाचं
  • 123 EV बसेस पुरवण्याचे कंत्राट मिळवण्यात ऑलेक्ट्रा यशस्वी
  • प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे,  आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स अशा सुविधा असणार आहेत. 
  • प्रवाशांच्या सुखसोयीसाठी १२ मीटर आणि ९ मीटर लांबीच्या या बसेसमध्ये उत्तम एअर सस्पेंशन आहे.

मुंबई : कार्बन डायऑक्साईडमुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसची मागणी सध्या सर्वत्र वाढते आहे. पुण्यात जवळ जवळ ४००हून अधिक इ बसेस रस्त्यावर धावत आहेत. मुंबईत देखील 2017 पासून साध्या आणि वातानुकूलीत बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. बेस्ट बसेसच्या ताफ्यातील इ बसेसची संख्या देखील ४०० हून अधिक आहे शिवाय डबल डेकर बसेस देखील प्रतिक्षेत आहेत. नवी मुंबईत देखील इलेक्ट्रिक बसेस वाहतूक सेवेत आहेत. 

अधिक वाचा : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

आता या महानगरासोबत ठाण्यात देखील इलेक्टिक बसेस धावताना दिसणार आहेत. पहिल्या टप्यात १२ मीटरच्या मोठ्या तसेच ९ मीटरच्या मीडी अशा दोन प्रकारच्या बसेसची मागणी टीमटीने ऑलेक्ट्रा ग्रीनटेककडे नोंदवली आहे. ऑलेक्ट्रा ग्रिनटेक आणि इवे ट्रान्स या अनुक्रमे उत्पादक आणि परिचालन करणाऱ्या कंपन्यामार्फत बसेस चालवल्या जाणार आहेत.  एकूण १२३  इलेक्ट्रिक बसेसचे मागणीपत्र देण्यात आले आहे.  यातील काही बसेस वातानूकुलित तर काही साध्या अशा प्रकारात आहेत. अतिशय प्रगत सुविधांनी या बसेस सज्ज असणार आहेत .  

अधिक वाचा : मोरपंखांच्या आकारातीन पानांचे झाड घरात लावल्यास होईल भरभराट

काय आहेत बसेसमध्ये सुविधा 

प्रवाशांच्या सुखसोयीसाठी १२ मीटर आणि ९ मीटर लांबीच्या या बसेसमध्ये उत्तम एअर सस्पेंशन आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे,  आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स अशा सुविधा असणार आहेत. 

9 महिन्यांच्या कालावधीत या बसेसचे वितरण होईल.  हा करार १५ वर्षासाठी करण्यात येणार आहे. या निविदेची अंदाजे किंमत  185 कोटी रुपये एवढी असेल. यात  १२ मीटरच्या एकूण ५५ बसेस आहेत यात ४५ एसी तर १० विना-वातानुकूलित आहेत.  ९ मीटरच्या एकूण 68 बसेस आहेत यात २६ एसी तर ४२ नॉनएसी प्रकारच्या बसेस  या करारानुसार टीमटीला मिळणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी