Ambani Vs Bezos | रिटेलनंतर आता IPL साठी भिडणार अंबानी आणि जेफ बेझॉस...समजून घ्या संपूर्ण प्रकरण

IPL telecast rights : अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस (Jeff Bezos) आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यातील बिझनेस वॉर संपण्याचे नाव घेत नाही. भारताच्या रिटेल व्यवसायात बादशहा बनण्यासाठी अॅमेझॉन (Amazon) आणि रिलायन्समध्ये (Reliance)स्पर्धा होती. आता क्रिकेटच्या मैदानातही या दोघांमध्ये टक्कर होण्याची शक्यता आहे.

Bezos & Ambani to fight for IPL media-TV rights)
आयपीएलसाठी भिडणार अंबानी आणि बेझोस 
थोडं पण कामाचं
  • जेफ बेझॉस आणि मुकेश अंबानी यांच्यात आयपीएलच्या प्रसारण अधिकारांसाठी जोरदार स्पर्धा
  • आयपीएलच्या सीझन 2023-2027 च्या मीडिया हक्कांसाठी टक्कर
  • याआधी रिटेल व्यवसायातदेखील अॅमेझॉन आणि रिलायन्समध्ये जोरदार संघर्ष

Fight for IPL Season 2023-2027 : नवी दिल्ली : अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस (Jeff Bezos) आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यातील बिझनेस वॉर संपण्याचे नाव घेत नाही. भारताच्या रिटेल व्यवसायात बादशहा बनण्यासाठी अॅमेझॉन (Amazon) आणि रिलायन्समध्ये (Reliance)स्पर्धा होती. आता क्रिकेटच्या मैदानातही या दोघांमध्ये टक्कर होण्याची शक्यता आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे (IPL) प्रसारण हक्क मिळविण्यासाठी हा संघर्ष होणार आहे. त्यामुळे आता अॅमेझॉन आणि रिलायन्समधील संघर्ष आणखी एका मैदानात दिसणार आहे. (After retail segment, now Bezos & Ambani to fight for IPL media-TV rights)

अधिक वाचा : IEC 2022 | एचडीएफसीचे केकी मिस्त्री म्हणतात ऐतिहासिकदृष्ट्या स्वस्त दरात मिळतंय गृहकर्ज, रिअल इस्टेटसाठी ही चांगली वेळ

आयपीएलसाठी बेझॉस आणि अंबानी समोरासमोर

अॅमेझॉन आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्या म्हणजे आयपीएल सीझन 2023-2027 च्या मीडिया हक्कांसाठी शर्यतीत आहेत. अॅमेझॉनला मीडिया हक्कांबाबत आपली प्राइम सेवा वाढवायची आहे. त्याचबरोबर रिलायन्स जिओला टीव्हीला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. खरतर पहिल्यांदाच, टेलिव्हिजनवर सामने प्रसारित करण्याचे आणि ते ऑनलाइन स्ट्रिमिंग करण्याचे अधिकार स्वतंत्रपणे विकले जातील. या लिलाव प्रक्रियेत कोण बाजी मारतो, हे जून महिन्यात कळेल. 12 जूनपासून ई-लिलाव सुरू होणार आहे.

अधिक वाचा : IEC 2022 | कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक, नियामक संस्थांनी मंजूरी देताना आधीसारखीच तत्परताच दाखवावी : अदर पूनावाला

प्रसारणासाठी जोरदार स्पर्धा 

Disney Plus Hostar हे भारतातील IPL चे एकमेव लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. गुजरात आणि लखनौ फ्रँचायझींच्या समावेशासह, आयपीएल सामन्यांची संख्या 60 वरून 74 झाली आहे. त्यामुळे लिलावात जोरदार बोली स्पर्धा होण्याची शक्यता आहे. कारण या विभागात आता झी-सोनीचाही समावेश आहे. या लिलावात 7 अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक रकमेची भागीदारी असण्याची शक्यता आहे.

अॅमेझॉनला रिटेलमध्ये अडथळा

रिलायन्सने रिटेल क्षेत्रातील दिग्गज फ्यूचर ग्रुपच्या व्यवसाय अधिग्रहणासाठी सुमारे 25 हजार कोटींची बोली लावली होती. पण जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या विरोधामुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही. सध्या अॅमेझॉन या रिलायन्स आणि फ्युचर समूहातील व्यवहाराबाबत वेगवेगळ्या कोर्टात कायदेशीर लढाई लढत आहे.

अधिक वाचा : IEC 2022 | ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी शेअर केले कोरोना काळातील तीन मोठे धडे

कोणाची किती संपत्ती 

जर आपण संपत्तीबद्दल बोललो तर अॅमेझॉनचे जेफ बेझोस रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्यापेक्षा खूपच पुढे आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार जेफ बेझोस यांची संपत्ती 173 अब्ज डॉलर इतकी आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 103 अब्ज डॉलर आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत जेफ बेझोस दुसऱ्या तर मुकेश अंबानी नवव्या स्थानावर आहेत.

भारतातील आघाडीची रिटेल कंपनी असलेली रिलायन्स रिटेल (Reliance Retail) आता फ्यूचर रिटेलच्या (Future retail) किमान 200 स्टोअरचे व्यवस्थापन करणार आहे. म्हणजेच हे 200 स्टोअर्स आता रिलायन्सच्या ताब्यात येणार आहेत. रिलायन्समुळे भाडेपट्टीचे पेमेंट करण्यात अयशस्वी झाले, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. 2020 पासून, रिलायन्स फ्यूचरची किरकोळ मालमत्ता मिळविण्यासाठी 3.4 अब्ज डॉलर करार पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली आहे. यात फ्युचर रिटेलचा महत्त्वाचा भागीदार असलेल्या अॅमेझॉनने (Amazon.com) काही करारांचे उल्लंघन केल्याचा उल्लेख करून कायदेशीररित्या हा व्यवहार रोखला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी