7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर! DA नंतर वाढणार HRA...होणार थेट 20,484 रुपयांचा फायदा

Central Government Employees : केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) महागाई भत्त्यात सरकारने वाढ केली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ३४ टक्क्यांवर पोचला आहे. पण आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येते आहे. ती अशी की, महागाई भत्त्यासोबतच इतर भत्तेही वाढू शकतात. या भत्त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा भत्ता हा घरभाडे भत्ता (HRA)आहे.

Central Government Employees to get hike in HRA
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एचआरए वाढणार 
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
  • डीएनंतर आता घरभाडे भत्ताही वाढू शकतो
  • घरभाडे भत्ता 20,484 रुपयांनी वाढण्याची शक्यता

7th Pay Commission : नवी दिल्ली :  केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) महागाई भत्त्यात सरकारने वाढ केली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ३४ टक्क्यांवर पोचला आहे. पण आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येते आहे. ती अशी की, महागाई भत्त्यासोबतच इतर भत्तेही वाढू शकतात. या भत्त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा भत्ता हा घरभाडे भत्ता (HRA)आहे. आता लवकरच घरभाडे भत्त्यादेखील वाढ होण्याची शक्यता आहे. (After rise in DA, Central Government Employees to get hike in HRA)

अधिक वाचा : Pune Real Estate | पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये घर खरेदी करणे होणार महाग...पाहा काय आहे कारण

एचआरए वाढण्याची शक्यता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) देखील वाढू शकतो. यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार HRA मध्ये पुढील सुधारणा 3 टक्के असेल. कमाल HRA दर 27 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. घरभाडे भत्ता (HRA) ची श्रेणी X, Y आणि Z वर्ग शहरांनुसार आहे. जे केंद्रीय कर्मचारी X श्रेणीत येतात त्यांना 27 टक्के HRA मिळतो आहे. Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा HRA 18 टक्क्यांवरून वाढून 20 टक्के असेल. त्याच वेळी, झेड वर्गाचा एचआरए 9 टक्क्यांवरून 10 टक्के होईल.

अधिक वाचा : Indian Railways update | आरक्षण असूनही बर्थ न दिल्याबद्दल भारतीय रेल्वे, प्रवाशाला देणार एक लाख रुपये

DA वाढल्याने HRA देखील वाढतो

गेल्या वर्षी जुलैमध्ये एचआरएमध्ये सुधारणा करण्यात आली होती आणि डीए 25 टक्क्यांवर पोचला होता. जुलै 2021 मध्ये सरकारने महागाई भत्ता वाढवून 28 टक्के केला. DA 25 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होताच HRA मध्ये देखील आपोआप वाढ झाली. मात्र, आता महागाई भत्ता ३४ टक्के झाला आहे. आता प्रश्न असा आहे की वाढत्या डीएनंतर, एचआरएची पुढील सुधारणा कधी होणार?

अधिक वाचा : Financial Planning Tips | नवीन आर्थिक वर्षात तुमच्या फायद्याच्या 5 गोष्टी... हे केल्यास तंदुरुस्त राहील तुमचा खिसा

HRA चे कॅल्क्युलेशन असे केले जाते -

7 व्या वेतन मॅट्रिक्सनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांचे कमाल मूळ वेतन दरमहा 56,900 रुपये आहे. तर त्यांचा HRA 27 टक्क्यांनिशी गणला जातो. साध्या पद्धतीने घरभाडे भत्त्याचे कॅल्क्युलेशन समजायचे झाल्यास ते असे असेल...

HRA = 56900 रुपये × 27/100 = 15363 रुपये प्रति महिना
30% HRA असल्यास = 56,900 रुपये × 30/100 = 17,070 रुपये प्रति महिना
HRA मध्ये एकूण फरक : 1707 रुपये प्रति महिना
HRA मध्ये वार्षिक  वाढ : 20,484 रुपये

केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) बैठकीत महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर आता महागाई भत्ता 34 टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने जानेवारी ते जून 2022 पर्यंतसाठी असणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 48 लाख कर्मचारी आणि जवळपास 69 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी