Meta Layoffs: Twitter नंतर आता मेटामधील अनेकांना आठवड्याभरात मिळणार नारळ, जाणून घ्या कारण

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 07, 2022 | 13:07 IST

मेटामध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या वृत्तावर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ही कपात मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची योजना आखण्यात आली होती, आता त्याची अंमलबजावणी व्हायची आहे.

After Twitter now in the meta will Layoffs in a week, know why
Twitter नंतर आता मेटामधील अनेकांना आठवड्याभरात मिळणार नारळ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 73 टक्क्यांनी खाली घसरले आहेत.
  • मेटामध्ये येत्या बुधवारी म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून छाटणी केली जाणार आहे.
  • मेटामध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या वृत्तावर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 नवी दिल्ली :  ट्विटरनंतर (Twitter) आता फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटा या सोशल मीडिया (Social media) साइटवरुन मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची (employees) कपात केली जाणार आहे. याच आठवड्याभरात मार्क झुकरबर्गच्या कंपनीतून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचं एका अहवालात सांगण्यात आले आहे. मेटाचे सीईओ झुकरबर्गने कर्मचारी कपातीचे संकेत आधीचे दिले होते. कंपनी एकाचवेळी अनेक समस्यांना तोंड देत आहे.  (After Twitter now many in the meta will get coconuts in a week, know why)

अधिक वाचा  : करिअरमध्ये प्रगती करताना महिलांसमोर असतात ‘ही’ आव्हानं

वृत्तानुसार, मेटामध्ये येत्या बुधवारी म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून छाटणी केली जाणार आहे. कंपनीचे हजारो कर्मचारी कामावरून कमी करण्याच्या या प्रक्रियेच्या कक्षेत येतील, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. मेटा (फेसबुक) च्या इतिहासात ही पहिल्यांदाच अशी कपात केली जाणार आहे. सप्टेंबरच्या शेवटी कंपनीने सांगितले होते की मेटामध्ये एकूण 87 हजार कर्मचारी काम करत आहेत. दरम्यान,  कर्मचारी कपातीमुळे मेटासाठी काही आर्थिक समस्या कमी होऊ शकतात. मेटाकडे सध्या Facebook, WhatsApp आणि Instagram यासह जगातील काही मोठ्या प्लॅटफॉर्मची मालकी आहे. कंपनी मेटाव्हर्सवर खर्च वाढवत आहे आणि तोटा असूनही उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेबद्दल आशावादी आहे.

मेटाचे शेअर्स यावर्षी 73 टक्क्यांनी खाली आले 

फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 73 टक्क्यांनी खाली  घसरले आहेत.  कंपनीचे  2016 मधील आपले न्यूनतम  स्तरापेक्षा खाली पोहचले आहेत.  500 इंडेक्सच्या सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या शेअर्सच्या सुचीत सहभागी झाले आहे. मेटाच्या शेअर्सचे मूल्य यावर्षी सुमारे $ 67 अब्जांनी खाली आले आहे, जे कंपनीसाठी एखाद्या धक्क्या सारखे आहे. 

अधिक वाचा  : भारतीय हवाई दलात अग्नीवीर वायूची भरती

छाटणी योजना तयार, अंमलबजावणी बाकी

मेटामध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या वृत्तावर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ही कपात मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची योजना आखण्यात आली होती, आता त्याची अंमलबजावणी व्हायची आहे.

झुकरबर्गची कंपनी एकाच वेळी अनेक समस्यांशी झुंज

बता दें किझुकेरबर्गची कंपनी मेटा सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे.  जागतिक आर्थिक वाढीची चिंता, TikTok वरून वाढती स्पर्धा, Apple च्या गोपनीयता धोरणातील बदल, मेटाव्हर्सवर प्रचंड खर्च आणि नियमन या समस्यांशी कंपनी झुंज देत आहे. या आव्हानांचा कंपनीच्या तिमाही निकालांवरही परिणाम झाला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतही कंपनीची कामगिरी कमकुवत राहण्याची शक्यता आहे. 

झुकरबर्गने आधीच दिले होते कर्मचारी कपातीचे संकेत 

मेटा चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी आधीच सांगितले आहे की कंपनीत केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळण्यास एक दशक लागू शकेल. मग त्यामुळे त्यांना नोकरभरती थांबवणे, नवीन प्रकल्प थांबवणे आणि खर्च कमी करण्याचे प्रयत्न करावे लागतील.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी