दोन वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला सोन्याची जबरदस्त विक्री, देशभरात 15 हजार कोटींची विक्री

काम-धंदा
भरत जाधव
Updated May 04, 2022 | 21:43 IST

कोरोना (Corona) महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनचा (Lockdown) सामना केल्यानंतर यंदा अक्षय्य तृतीयेला (Akshayya Tritiya) सराफ बाजार गजबजली होती. यादरम्यान देशभरातील सराफ बाजारात खळबळ उडाली असून सराफ व्यापाऱ्यांनी मोठा व्यवसाय केला.कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा सांगतात की, यावेळी ज्वेलर्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हलक्या दागिन्यांचा चांगला व्यापार केला.

After two years, Akshayya Tritiya's huge gold sales
कोरोनापूर्वीच्या तुलनेत सोन्याच्या व्यवसायात दीडपट वाढ  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अक्षय्य तृतीयेला सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला .
  • कोविड-19 संसर्गाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान एक मोठा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता आणि मे महिन्यात येणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केवळ 5 टक्के व्यवसाय झाला होता.
  • एक वर्षानंतर, मे 2021 मध्ये, संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे लॉकडाऊन झाला आणि त्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी व्यवसाय ठप्प झाला.

नवी दिल्‍ली : कोरोना (Corona) महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनचा (Lockdown) सामना केल्यानंतर यंदा अक्षय्य तृतीयेला (Akshayya Tritiya) सराफ बाजार गजबजली होती. यादरम्यान देशभरातील सराफ बाजारात खळबळ उडाली असून सराफ व्यापाऱ्यांनी मोठा व्यवसाय केला.कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा सांगतात की, यावेळी ज्वेलर्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हलक्या दागिन्यांचा चांगला व्यापार केला.  तब्बल दोन वर्षांनंतर मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशभरात सुमारे १५ हजार कोटींचा सोन्या-चांदीचा व्यापार झाला.  दरम्यान अक्षय तृतीयेला  सोन्या-चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.

कोरोनाच्या पूर्वीपेक्षा दीडपट अधिक व्यवसाय 

पंकज अरोरा यांनी सांगितले की, 2019 मध्ये, कोरोना महामारीच्या आधी देशभरात अक्षय्य तृतीयेला सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. या वेळी दीडपट अधिक व्यवसाय झाला. तथापि, 2020 मध्ये, कोविड-19 संसर्गाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान एक मोठा लॉकडाऊन  लागू करण्यात आला होता आणि मे महिन्यात येणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केवळ 5 टक्के व्यवसाय झाला होता. या दरम्यान देशभरात केवळ 500 कोटींची विक्री झाली. एक वर्षानंतर, मे 2021 मध्ये, संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे लॉकडाऊन झाला आणि त्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी व्यवसाय ठप्प झाला. यावेळी ग्राहकांच्या उत्साहाने व्यावसायिकांचे नुकसान भरून काढले.

तीन वर्षांत सोने 20 हजार रुपयांनी

खंडेलवाल यांनी सांगितले की तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या किमतीत फारसा फरक नव्हता. तेव्हा सोने 32,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 38,350 रुपये प्रति किलो होती. त्याचवेळी, यंदा अक्षय्य तृतीयेच्या पाच दिवस आधी सोन्याचा भाव 53 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 66,600 रुपये किलो होता.  अशाप्रकारे अवघ्या तीन वर्षांत सोन्याच्या दरात सुमारे 20 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

सोन्याच्या पट्ट्या आणि नाण्यांकडे कल 

सीएआयटीचे अध्यक्ष बीसी भरतिया यांनी सांगितले की, भारतीय ग्राहक सोन्याच्या विटा (सोन्याच्या पट्ट्या) आणि नाण्यांकडे अधिक झुकत आहेत. 2021 च्या पहिल्या तिमाहीत, सोन्याच्या बार आणि नाण्यांची एकूण आयात 39.3 टन होती, तर 2022 च्या पहिल्या तिमाहीत ते 41.3 टन इतके वाढले. तसेच गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत सोन्याच्या दागिन्यांची एकूण आयात १२६.५ टन होती, मात्र यावेळी ९४.२ टन झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी