Twitter Mass Resignations : इलॉन मस्क बोलतच राहिले आणि कर्मचाऱ्यांनी सोडल्या नोकऱ्या...ऑफिस बंद करण्याची आली वेळ

Elon Musk latest : इलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरमधील कर्मचाऱ्यांवर वेगवेगळे नियम लावत असताना आणि बंधने घालत असताना कर्मचाऱ्यांनीच मस्कला दणका दिला आहे. इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांसाठी अनेक नियम लागू केल्यानंतर आणि कामाचे तास वाढवल्यानंतर आता मोठ्या संख्येने ट्विटरचे कर्मचारी राजीनामा देत आहेत. इलॉन मस्कने कामाचे तास वाढवल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांनी ट्विटरमधील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Twitter crisis
ट्विटरमधील वादंग 
थोडं पण कामाचं
  • ट्विटरमधील वादंग शिगेला
  • कर्मचाऱ्यांनीच मस्कला दणका दिला आहे.
  • अनेक कर्मचाऱ्यांनी मस्कच्या अटी झुकारून दिला राजीनामा

Twitter Employees latest update : न्यूयॉर्क : ट्विटरमधील उलथापालथ काही थांबायचे नाव घेत नाही. आता ट्विटरमधील (Twitter Crisis) वादंग शिखरावर पोचला आहे. इलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरमधील कर्मचाऱ्यांवर वेगवेगळे नियम लावत असताना आणि बंधने घालत असताना कर्मचाऱ्यांनीच मस्कला दणका दिला आहे. इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांसाठी अनेक नियम लागू केल्यानंतर आणि कामाचे तास वाढवल्यानंतर आता मोठ्या संख्येने ट्विटरचे कर्मचारी राजीनामा (Resignations of Twitter employees) देत आहेत. त्यामुळे कंपनीची एकामागोमाग एक कार्यालये बंद पडत आहेत. इलॉन मस्कने कामाचे तास वाढवल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांनी ट्विटरमधील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच कर्मचाऱ्यांची कपात केलेली आणि त्यात आणखी कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. परिणामी ट्विटरची अनेक कार्यालये बंद करण्याची वेळ आली आहे. (After warning by Musk Twitter faces mass resignations by employees)

अधिक वाचा : आपलं काय चुकतयं, हे कळायलं लागलयं : बाळासाहेब थोरात

न्यूयॉर्क टाइम्सने (NYT)यासंदर्भात दिलेल्या बातमीत म्हटले आहे की  गुरुवारी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ट्विटर सोडायचे की राहायचे हे निवडण्यासाठी वेळ दिला होता. त्यानंतर ट्विटरच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांच्या पगारासह कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरने ईमेलद्वारे जाहीर केले आहे की कंपनी सोमवारपासून त्यांची काही कार्यालये बंद करणार आहे. 

मस्कची बोलणे आणि कर्मचाऱ्यांचे जाणे

दरम्यान ट्विटर ताब्यात घेतल्यापासून मस्क आणि त्यांच्या सल्लागारांनी कंपनीच्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या आहेत. या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना कंपनी सोडण्यापासून परावृत्त करण्याचादेखील प्रयत्न झाला. मस्कने रिमोट वर्क पॉलिसी रद्द केली आहे. त्यामागचे कारण कर्मचाऱ्यांना समजावण्याचाही प्रयत्न झाला. मात्र कर्मचाऱ्यांवर या सर्व चर्चेचा काहीही परिणाम झाला नाही. मस्क आपल्या सूरात बोलत राहिले आणि कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडणे सुरू राहिले, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. 

अधिक वाचा :  Excessive Thirst: वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर असू शकतात हे आजार...

हे सर्व घडत असताना काही कर्मचाऱ्यांना सॅन फ्रान्सिस्को कार्यालयातील कॉन्फरन्स रूममध्ये बोलावण्यात आले. तर काहींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलावण्यात आले. संध्याकाळी 5 वाजताची अंतिम मुदत जवळ आल्यावर मात्र काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना आपला राजीनामा कळवण्यास सुरूवात केली. इलॉन मस्क बोलत राहिले आणि कर्मचारी बैठक सोडून निघून गेले.

अधिक वाचा : या दोन क्रिकेटर भावांनी भारताला जिंकून दिलाय वर्ल्डकप, गरिबीतून आले वर

मस्क विरोधकांना का टार्गेट करत आहेत

मस्क आपल्या विरोधकांना फटकारण्यासाठी ट्विटचा वापर करत आहेत. यशस्वी होण्यासाठी कठोर होण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. एक नवी यशस्वी ट्विटर कंपनी तयार करण्यासाठी इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांना 36 तास दिले होते. या कालावधीत कर्मचाऱ्यांना ट्विटरशी निष्ठावंत राहायचे की ट्विटर सोडायचे हा निर्णय घ्यायचा होता. 

मस्कने गेल्या महिन्यात ट्विटरचे 44 अब्ज डॉलर्समध्ये अधिग्रहण केले होते. त्यानंतर लगेचच भारतातील 200 कर्मचार्‍यांसह सुमारे 3500 ट्विटर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले. यानंतर याच मुद्द्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी