Agriculture Sector Economic Survey 2022: ऐकलं का ! कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये 3.6 टक्क्यांची वाढ

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jan 31, 2022 | 16:22 IST

आज लोकसभेत (Lok Sabha) आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey Report) सादर करण्यात आला असून यात कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) सकारात्मक वाढ झाली आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये 2020-21 साली कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये (Agriculture and Allied Sectors)3.6 टक्के सकारात्मक वाढ झाली आहे.

Agriculture Sector Economic Survey 2022
कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये 3.6 टक्क्यांची वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कृषी क्षेत्रातील उत्पादनांसह क्षेत्राशी संबंधित पशुधन आणि मत्स्यव्यवसायात चांगली वाढ होत आहे.
  • अर्थव्यवस्थेच्या GVA मध्ये शेतीचा वाटा 2020-21 मध्ये 20.2 टक्क्यांपर्यंत तर 2021-22 मध्ये 18.8 टक्के आहे.
  • केंद्रीय अर्थसंकल्पाआधी देशाचं आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल लोकसभेत सादर करण्यात येतो.

Economic Survey 2022 Agriculture Sector:  नवी  दिल्ली :  आज लोकसभेत (Lok Sabha) आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey Report) सादर करण्यात आला असून यात कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) सकारात्मक वाढ झाली आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये 2020-21 साली कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये (Agriculture and Allied Sectors)3.6 टक्के सकारात्मक वाढ झाली आहे. यावर्षी चांगला मान्सून (Monsoon) आणि विविध सरकारी (Government) उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. पत उपलब्धता वाढवणे, गुंतवणूक सुधारणे, बाजार सुविधा निर्माण करणे, पायाभूत सुविधांना चालना देणे, कृषी क्षेत्रातील विकास आणि या क्षेत्राला दर्जेदार निविष्ठांची तरतूद वाढवणे अशा उपाययोजनांमुळं ही सकारात्मक वाढ झाली असल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.  (Agriculture and allied sectors grew by 3.6 per cent)

अहवालात म्हटलं आहे की, आत्मनिर्भर भारत (ANB) अभियानासारखे उपक्रमासह इतर कृषी विकासाला चालना देणार्‍या योजना राबवल्यामुळं 2021-22 मध्ये 3.9 टक्के सुधारित वाढ साधण्यासाठी कृषी क्षेत्राला आणखी मदत होईल, असं अहवालात म्हटलं आहे.  कृषी क्षेत्रातील उत्पादनांसह क्षेत्राशी संबंधित पशुधन आणि मत्स्यव्यवसायात चांगली वाढ होत आहे. आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करण्यास मदत झाली आहे. अर्थव्यवस्थेच्या एकूण उत्पन्नापैकी GVA कृषी आणि संबंधित क्षेत्रांच्या टक्केवारीतील वाटा देखील सुधारला आहे.  अर्थव्यवस्थेच्या GVA मध्ये  शेतीचा वाटा 2020-21 मध्ये 20.2 टक्क्यांपर्यंत तर 2021-22 मध्ये 18.8 टक्के आहे. 2020-21 च्या अंदाजानुसार, देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन विक्रमी 308.65 दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे. जो आधीपेक्षा 11.15 दशलक्ष टन जास्त आहे.  

भारताचा विकास दर 8 ते 8.50 टक्के राहण्याचा अंदाज 

पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 8 ते 8.50 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेच्या पटलावर मांडला. केंद्रीय अर्थसंकल्पाआधी देशाचं आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल लोकसभेत सादर करण्यात येतो. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा विकास दर (जीडीपी) 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेत मुख्य भूमिका असणाऱ्या कृषी क्षेत्रात 3.9 टक्के, तर उद्योग क्षेत्रात 11.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत्या कच्च्या तेलाच्या भावामुळे वाढत्या महागाईवर केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, महागाई दर नियंत्रणात राहील असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी