बँकेची कामे आजच करून घ्या, हे आहे कारण 

बँकेशी निगडीत तुमची कोणती कामे शिल्लर असल्यास ती आजच म्हणजे बुधवार २५ नोव्हेंबरला पूर्ण करा, नाही तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

AIBEA to join trade unions in nationwide general strike
बँकेची कामे आजच करून घ्या, हे आहे कारण  

थोडं पण कामाचं

  • बँकेशी निगडीत तुमची कोणती कामे शिल्लर असल्यास ती आजच म्हणजे बुधवार २५ नोव्हेंबरला पूर्ण करा
  • राष्ट्रीय व्यापार संघटनांनी उद्या २६ नोव्हेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
  • नुकत्याच झालेल्या अधिवेशनात लोकसभेने तीन नवीन कामगार कायदे मंजूर केले

मुंबई :  बँकेशी निगडीत तुमची कोणती कामे शिल्लर असल्यास ती आजच म्हणजे बुधवार २५ नोव्हेंबरला पूर्ण करा, नाही तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  उद्या  गुरुवार २६ नोव्हेंबरला देशातील बहुतांश बँकांचे कर्मचारी एक दिवसाच्या संपात  सहभागी होणार आहेत. त्यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित बँकांनी सोशल मीडिया किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना सूचना दिली आहे. 

राष्ट्रीय व्यापार संघटनांनी उद्या २६ नोव्हेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (All India Bank Employees' Association - AIBEA) (एआयबीईए) देखील या संपात सामील होण्याची घोषणा केली आहे. एआयबीईएच्या दाव्यानुसार महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि परदेशी बँकांचे सुमारे ३० हजार कर्मचारी संपात सहभागी होतील.
एआयबीईए ही स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक वगळता बहुतांश बँकांचे प्रतिनिधित्व करते. विविध सार्वजनिक आणि जुन्या खासगी क्षेत्रातील बँकांसह काही परदेशी बँकांचे चार लाख कर्मचारी त्यांचे सदस्य आहेत.

का जाणार संपावर? 

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात लोकसभेने तीन नवीन कामगार कायदे मंजूर केले आणि व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली विद्यमान २७ कायदे रद्द केले. हे कायदे पूर्णपणे कॉर्पोरेट जगाच्या हिताचे आहेत. या प्रक्रियेमध्ये ७५ टक्के कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. नवीन कायदे या कामगारांना कोणतेही संरक्षण देणार नाहीत, असं 'एआयबीईए'चं म्हणणं आहे.

शनिवार-रविवारीही सुट्टी

२६ नोव्हेंबरच्या संपाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बँकांचे कामकाज सुरळीत होईल. यानंतर पुन्हा एकदा २८ नोव्हेंबर रोजी चौथा शनिवार आणि २९ नोव्हेंबर रोजी रविवारमुळे बँका बंद राहतील. 

डिजिटल व्यवहार सुरु राहणार

२६ नोव्हेंबरचा संप किंवा सुट्टीचा डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच आपण नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंगद्वारे व्यवहार करु शकता. त्याच वेळी आपण एटीएममधून पैसेही काढू शकता.

26 नोव्हेंबरचा संप: कोणत्या संघटना सहभागी होत आहेत?

  1. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेस (इंटक)
  2. ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (एआयटीयूसी)
  3. हिंद मजदूर सभा (एचएमएस)
  4. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू)
  5. ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर (एआययूटीयूसी)
  6. कामगार संघटना समन्वय केंद्र (टीयूसीसी)
  7. सेल्फ एन्पॉइ वुमन असोसिएशन (SEWA)
  8. अखिल भारतीय केंद्रीय कामगार संघटना (एआयसीसीटीयू)
  9. लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन (एलपीएफ)
  10. युनायटेड ट्रेड युनियन कॉंग्रेस (यूटीयूसी)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी