Air India grooming rules: एअर इंडियालाही हवी हवाई सुंदरींच्या कपाळी टिकली, अन् बांगडी

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 24, 2022 | 19:56 IST

नवीन गणवेशानुसार,  केबिन अटेंडंट असलेल्या पुरुषांना डोक्याची केस बारीक ठेवावी लागणार आहेत. म्हणजेच  पुरुषांना झिरो कट मारावा लागणार आहे, तसेच क्लीन सेव्ह ठेवावी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे पुरुषांना हा कट नेहमी ठेवावा लागणार आहे.

Air India also wants the tikali on  forehead of air hostess
एअर इंडियालाही हवी हवाई सुंदरींच्या कपाळी टिकली  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • केबिन अटेंडंट असलेल्या पुरुषांना डोक्याची केस बारीक ठेवावी लागणार आहेत.
  • केबिन क्रू महिलांसाठी कानातील एअर रिंग्स हे सोन्याचे किंवा डायमंड असलेले गोल आकाराचे ठेवावे लागेल.
  • महिलांना कपाळावर 0.5 सेंमीची टिकली आणि अंगावर साडी परिधान करावी लागणार आहे.

मुंबई :  भिडे गुरुजींनी महिला पत्रकाराला टिकली लावयाला सांगितल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण केला होता. आता हे टिकली पुराण आता एअर इंडियात आलं आहे. एअर इंडियाची मालकी टाटा समुहाकडे आल्यानंतर टाटा ग्रुप नवं नवीन नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. या नवीन व्यवस्थापिक मंडळाने  ड्रेसकोडची सक्ती केली आहे. दरम्यान कंपनीने एका महिन्यापूर्वी एक संपूर्ण यादी जारी केली आहे. तसेच एअरलाइनने नुकतेच दुसरे दस्तऐवज जारी केले ज्यामध्ये ठळक फॉन्टमध्ये ठळक न करता एकसमान मार्गदर्शक तत्त्वांमधील महत्त्वाचे बदल हायलाइट केले आहेत. (Air India also wants the tikali on  forehead and the bangles)

अधिक वाचा  : शुक्रवारची खास लक्ष्मी मातेची आरती

नवीन गणवेशानुसार,  केबिन अटेंडंट असलेल्या पुरुषांना डोक्याची केस बारीक ठेवावी लागणार आहेत. म्हणजेच  पुरुषांना झिरो कट मारावा लागणार आहे, तसेच क्लीन सेव्ह ठेवावी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
विशेष म्हणजे पुरुषांना हा कट नेहमी ठेवावा लागणार आहे. तर महिलांसाठी असलेला ड्रेसकोड अधिकच कडक केला असून नवीन नियमांची  यादी चांगलीच मोठी आहे. हवाई सुंदरींना आता कानात मोठे झुमके टाकता येणार नाहीत, पण त्या ऐवजी कपाळावर 0.5 सेंमीची टिकली लावावी लागणार आहे. तसेच  डोक्याचे केसही जुन्या पद्धतीने बांधता येणार नाहीत.  तर हातात फक्त एक बांगडी तेही डिझाईन नसलेली वापरता येणार आहे. 

अधिक वाचा  : उद्धव ठाकरे कडाडले,कर्नाटकच्या CMचा ठाकरी शैलीत घेतला समाचार

केबिन क्रू महिलांसाठी कानातील एअर रिंग्स हे सोन्याचे किंवा डायमंड असलेले  गोल आकाराचे ठेवावे लागेल. त्यावर कोणत्याच प्रकारची सजावट नको असलेले कानातील रिंग्स परिधान करावे लागतील. तर कपाळावर 0.5 सेंमीची टिकली आणि अंगावर साडी परिधान करावी लागणार आहे. तसेच हातात एकच बांगडी टाकावी लागेल त्यावरही सजावट मान्य केली जाणार नाही. डोक्याचे केसही जुन्या पद्धतीने बांधता येणार नाहीत. डोक्याला बॉबी पिन्स लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे  आयशॅडो, लिपस्टिक, नेल पेंट आणि हेअर शेड कार्डचे काटेकोरपणे पालन करावे (वैयक्तिक शेड्सना परवानगी नसणार आहे. 

तसेच विमानात ड्युटी करत असताना हवाई सुंदरींना त्वचेच्या रंगाशी मिळते जुळते कपडे परिधान करावे लागतील. यात साडी आणि इंडो-वेस्टर्न पोशाख कामासाठी वापरता येणार आहे. पुरुष आणि महिला क्रू सदस्यांना डोक्याची  केसं नियमितपणे राखाडी रंगाची  ठेवावी लागतील. फॅशन रंग आणि मेंहदी डोक्याला लावता येणार नाहीये. मनगट, मान, घोट्यावर काळा किंवा धार्मिक धागा घालता येणार नाहीये. कामावर नसताना  कर्मचाऱ्यांना गणवेश आणि त्याचे सामान परिधान करता नेणार नाहीये. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी