Air India stop credit facility 'एअर इंडिया'मधून फुकट प्रवास बंद

Air India stops credit facility on purchase of tickets 'एअर इंडिया'मधून क्रेडिटच्या जोरावर केला जाणारा फुकट प्रवास बंद होणार आहे. सरकारी कामासाठी पैसे देऊन विमानाचे तिकीट खरेदी करुन प्रवास करता येईल.

Air India stops credit facility on purchase of tickets
'एअर इंडिया'मधून फुकट प्रवास बंद 
थोडं पण कामाचं
  • 'एअर इंडिया'मधून फुकट प्रवास बंद
  • 'एअर इंडिया'मधून क्रेडिटच्या जोरावर केला जाणारा फुकट प्रवास बंद
  • सरकारी कामासाठी पैसे देऊन विमानाचे तिकीट खरेदी करुन प्रवास करता येईल

Air India stops credit facility on purchase of tickets नवी दिल्ली: मंत्री, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना 'एअर इंडिया'मधून 'क्रेडिट'वर प्रवासाची परवानगी होती. या प्रक्रियेत सरकारी कामासाठी प्रवास करत असलेल्या व्यक्तीला क्रेडिट मर्यादा जाहीर करुन पैसे न देता तिकीट खरेदी करुन प्रवास करता येत होता. नंतर सरकारी निधीमधून संबंधित प्रवासाचे पैसे एअर इंडिया कंपनीला देण्याची तरतूद होती. पण आता एअर इंडिया कंपनी टाटा समुहाने ताब्यात घेतली आहे. यामुळे 'एअर इंडिया'मधून क्रेडिटच्या जोरावर केला जाणारा फुकट प्रवास बंद होणार आहे.

सरकारी कामासाठी पैसे देऊन विमानाचे तिकीट खरेदी करुन प्रवास करता येईल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या पत्रानुसार पुढील आदेश निघेपर्यंत सरकारी कामासाठी 'एअर इंडिया'तून प्रवास करण्यासाठी पैसे मोजावे लागतील.

ज्या सरकारी विभागांनी अद्याप क्रेडिट योजनेंतर्गत खरेदी झालेल्या तिकिटांची रक्कम दिलेली नाही त्यांनी तातडीने एअर इंडिया कंपनीची थकीत रक्कम द्यावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. क्रेडिट योजना बंद केली असल्यामुळे विमान प्रवास करायचा असल्यास पैसे मोजून तिकीट खरेदी करावे असेही केंद्र सरकारने सर्व सरकारी विभागांना कळवले आहे. 

केंद्र सरकारने २००९ पासून एअर इंडिया कंपनीच्या तिकिटांची खरेदी करण्यासाठी क्रेडिट योजना सुरू केली. सरकारी कामासाठी प्रवास करणाऱ्या मंत्री, अधिकारी-कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेता येत होता. पण सरकारकडून पैसे वेळेत मिळत नसल्यामुळे एअर इंडियाच्या खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नव्हता. सरकार हे कंपनीचे मोठे ग्राहक होते. पण या ग्राहकाकडून खरेदी झालेल्या तिकिटांचे पैसे वेळेत मिळत नव्हते. सरकारी विभाग पैसे द्यायला दिरंगाई करत होते. याचा कंपनीच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम झाला होता. सरकारच्या ताज्या आदेशामुळे एअर इंडियाला पुढील काही दिवसांत थकीत रक्कम मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी