Vistara Flight Offer: फक्त ९७७ रुपयांमध्ये करू शकता हवाई प्रवास; लवकर करा तिकिट बुक ! आज आहे शेवटची संधी

काम-धंदा
Updated Jan 07, 2022 | 16:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vistara Flight Offer | देशातील सुप्रसिद्ध आणि नामांकित एअरलाईन कंपनी विस्ताराने विमानसेवेवरील तिकिटांवर मोठी ऑफर दिली आहे. दरम्यान, विस्तारा कंपनी काही दिवसांतच आपला ७ वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कंपनीच्या स्थापनेला ७ वर्षांचा कालावधी पूर्ण होईल.

Airline company vistara has made a big offer to passengers on the occasion of its 7th anniversary The offer is valid till 12 midnight on January 7
फक्त ९७७ रुपयांमध्ये करू शकता हवाई प्रवास  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशातील सुप्रसिद्ध आणि नामांकित एअरलाईन कंपनी विस्ताराने विमानसेवेवरील तिकिटांवर मोठी ऑफर दिली आहे.
  • कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर विशेष भाडे जाहीर केले आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचे भाडे इकॉनॉमी क्लाससाठीचे भाडे ९७७ रुपयांपासून २६७७ रुपयांपर्यंत सुरू होते.
  • विस्तारा कंपनीने आपल्या सातव्या वर्धापनदिनानिमित्तची ऑफर या वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत प्रवासासाठी दिली आहे.

Vistara Flight Offer | नवी दिल्ली : देशातील सुप्रसिद्ध आणि नामांकित एअरलाईन कंपनी विस्ताराने (Vistara) विमानसेवेवरील तिकिटांवर मोठी ऑफर दिली आहे. दरम्यान, विस्तारा कंपनी काही दिवसांतच आपला ७ वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कंपनीच्या स्थापनेला ७ वर्षांचा कालावधी पूर्ण होईल. आपल्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक अतिशय उत्तम ऑफर आणली आहे. त्या ऑफर अंतर्गत केवळ ९७७ रुपयांमध्ये हवाई प्रवास करता येणार आहे. (Airline company vistara has made a big offer to passengers on the occasion of its 7th anniversary The offer is valid till 12 midnight on January 7). 

९७७ रुपयांपासून शुल्क सुरू

कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर विशेष भाडे जाहीर केले आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचे भाडे इकॉनॉमी क्लाससाठीचे भाडे ९७७ रुपयांपासून २६७७ रुपयांपर्यंत सुरू होते. तर प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लाससाठी हे भाडे ९७७७ रुपये एवढे आहे. लक्षणीय बाब म्हणजे कंपनीने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी देखील नवीन भाडे जाहीर केले आहे.

ट्विटद्वारे दिली माहिती

विस्तारा कंपनीने आपल्या सातव्या वर्धापनदिनानिमित्तची ऑफर या वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत प्रवासासाठी दिली आहे. (Vistara 7th Anniversary Offer) एअरलाइन कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की कंपनीचा आगामी ७ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी विस्तारासोबत बुकिंग करताना विशेष भाड्याचा आनंद घ्या. #AirlineIndiaTrusts सह तुमच्या भविष्यातील प्रवासाची योजना करा.

https://twitter.com/airvistara/status/1478934806897442816?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1478934806897442816%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fbusiness%2Fvistara-airline-gave-a-great-offer-will-be-able-to-book-flight-tickets-only-for-rs-977%2F1064806

या मार्गांवरील प्रवासात मिळणार सवलत

भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या जम्मू-श्रीनगर मार्गावरील भाडे ९७७ रुपये आहे. मुख्य मार्ग ज्यामध्ये प्रवासी ऑफरचा लाभ घेऊ शकतात ते बंगळुरू-हैदराबाद (रु. १७८१), दिल्ली- पाटणा (रु. १९७७), बंगळुरू- दिल्ली (रु. ३९७०), मुंबई- दिल्ली (रु. २११२) आणि दिल्ली- गुवाहाटी (रु. २७८०).

७ जानेवारी मध्यरात्री १२ वाजता बुकिंग होणार बंद 

विस्तारा कंपनीने दिलेल्या आपल्या सातव्या वर्धापनदिनानिमित्तची ऑफरची बुकींग ७ जानेवारी पासून सुरू झाली आहे. जी ७ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहिल. या ऑफरमधअ.े ३० सप्टेंबर पर्यंतची तिकिट बुक केली शकतात. 

तिकीट कसे बुक कराल

विस्तारा कंपनीच्या ७ व्या वर्धापनदिनाच्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी प्रवासीव कंपनीची वेबसाइट www.airvistara.com वर आपली तिकिट बुक करू शकतात. याशिवाय विस्ताराच्या मोबाइल ॲपवरूनही प्रवासी तिकीट बुक करू शकतात. Air Vistara चे मोबाईल अॅप iOS आणि Android दोन्हीवर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर विस्ताराच्या विमानतळ तिकीट कार्यालये (एटीओ), कॉल सेंटर्स, ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी आणि इतर ट्रॅव्हल एजन्सीद्वारे देखील बुक करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी