या विमान कंपन्यांच्या बॅगेज चार्जमध्ये वाढ

काम-धंदा
Updated Jul 07, 2018 | 19:55 IST | पूजा विचारे

जेट एअरवेज, इंडिगो एअरलाईन्स, स्पाईस जेट आणि गोएअर यांनी बॅगेज चार्जमध्ये वाढ केली आहे. जर का तुम्ही येत्या काही महिन्यात विमान प्रवास करणार असाल तर या एअरलाईन्सनने बॅगेजच्या चार्जमध्ये किती वाढ केली आहे. हे पाहण्यासाठी खालील बातमी वाचा.

airline
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: TOI Archives

नवी दिल्ली : जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईस जेट आणि गो एअरने १५ किलोपेक्षा जास्त बॅगेजवरच्या चार्जमध्ये वाढ केली आहे. यात इंडिगो, स्पाईस जेट आणि गोएअर आता १५ किलोपेक्षा जास्त बॅगेज असल्यास ३०० रूपयांच्या बदल्यात ४०० रूपये प्रति किलो चार्ज घेतला जाईल. 

याचदरम्यान जेट एअरवेजने आपल्या बॅगेजच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. जेटने बॅगजेचे चार्ज ४०० रूपयांहून आता ५०० रूपये प्रति किलो असे केले आहेत. जेटने आणखी एक नवा नियम तयार केला आहे. यानंतर देशांतर्गत इकोनॉमी उड्डाणावेळी प्रवाशांना १५ किलो बॅगेज असलेली एकच बॅग घेऊन जाता येईल. १५ किलोचे सामान असलेल्या दुसऱ्या बॅगसाठी प्रवाशांना ३९९९ रूपये मोजावे लागतील. हे नवे नियम १५ जुलैपासून लागू होतील. प्रिमीयर क्लासच्या प्रवाशांसाठी १५ किलोपेक्षा कमी असलेल्या २ बॅग घेऊन जाण्याची सूट असेल. 

प्री बुकिंग असल्यास इंडिगो आणि गोएअर ५ किलोच्या अतिरिक्त सामानावर १९०० रूपये वसूल करेल. अतिरिक्त १० किलो वजन असल्यास ३, ८०० रूपये मोजावे लागतील. तसेच अतिरिक्त ३० किलो वजन तुमच्याकडे असल्यास या  दोन्ही एअरलाईन्स ११ हजार ४०० रूपये चार्ज घेईल. तर इंडिगोने गेल्याच वर्षी प्री बुकिंगच्या बॅगेजवर असलेला चार्ज वाढवला होता. 

इंडिगो :  ५ किलोसाठी १,४२५ रूपये
इंडिगो : १० किलोसाठी २,८५० रूपये
इंडिगो : १५ किलोसाठी ४,२७५ रूपये
इंडिगो : ३० किलोसाठी ८,५५० रूपये

इंडिगोने काही दिवसांपूर्वीच ४०० रूपये फ्यूल सरचार्ज घेण्याची सुरूवात केली होती.

एअर इंडियाच्या प्रवाशांना २५ किलोपर्यंत फ्री बॅगेज सुविधा आहे. काहीच दिवसांपूर्वीच एअर इंडियाने सुद्धा अतिरिक्त बॅगेजच्या चार्चमध्ये १०० रूपयांनी वाढ केली. ४०० रूपयांहून ५०० रूपये बॅगेज चार्ज घेण्यात येत आहे. 

स्पाईस जेट : ५ किलो अतिरिक्त बॅगेजसाठी १६०० रूपये
स्पाईस जेट : १० किलो अतिरिक्त बॅगेजसाठी ३२०० रूपये
स्पाईस जेट : १५ किलो अतिरिक्त बॅगेजसाठी ४८०० रूपये
स्पाईस जेट : २० किलो अतिरिक्त बॅगेजसाठी ६४०० रूपये
स्पाईस जेट : ३० किलो अतिरिक्त बॅगेजसाठी ९,६०० रूपये

जानेवारी २०१७ पासून जेट फ्यूलचे दर ४० टक्क्यांने वाढले आहेत. त्यामुळेच एअरलाईन्सने या चार्जमध्ये वाढ केली आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...