एअरटेल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 249 रुपयांच्या प्लानमध्ये मिळवा 4 लाखांचा विमा

काम-धंदा
Updated May 13, 2019 | 22:59 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Airtel Prepaid Recharge: एअरटेलनं ग्राहकांसाठी एक खास प्लान आणलाय. आता एअरटेलच्या ग्राहकांना 249 रुपयांच्या प्लानमध्ये 4 लाखांचा विमा मिळणा आहे. जाणून घ्या प्लानच्या अटी, नियम आणि इतर माहितीबाबत...

Airtel
एअरटेलचा प्लान कसा कराल अॅक्टिव्हेट 

नवी दिल्ली: भारती एअरटेल कंपनी आता ग्राहकांसाठी कॉलिंग आणि डेटा बेनिफिटसोबत विमा ही देणार आहे. कंपनीनं यासाठी एचडीएफसी लाईफ सोबत करार केला आहे. यासाठी ग्राहकांना ना कोणत्या पद्धतीचं पेपर वर्क करावं लागणार ना कुठलीही मेडिकल टेस्ट करावी लागेल. आपण जसा आपला फोन रिचार्ज कराल तसा आपला विमा रिन्यू होणार आहे. एअरटेलचा हा प्लान 249 रुपयांचा आहे. यात 4 लाख रुपयांचा विमा कव्हर केलेला असेल. हे लाईफ कव्हर ग्राहकांना एचडीएफसी लाईफ कंपनी देणार आहे. या पॉलिसीत टर्म इंश्यूरन्स कव्हर केलेला असेल.

249 रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळणार आहे. सोबतच ग्राहकांना दररोज 100 SMS मोफत मिळतील. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध असणार आहे. आपल्या प्लानची वैधता हिच विम्याची सुद्धा वैधता असणार आहे.

ग्राहकांना पहिल्या रिचार्जनंतर एका SMS द्वारे माय एअरटेल अॅप किंवा रिटेलरकडून नाव रजिस्टर करावं लागेल. ही प्रक्रिया फक्त एकदाच करायची आहे. यानंतर ग्राहक जेव्हा जेव्हा रिचार्ज करेल तेव्हा तेव्हा विमा प्लान रिन्यू होईल.

ही पॉलिसी 18 ते 54 वयाच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना ही विमा पॉलिसी डिजिटल माध्यमातून पाठवली जाईल. जर कुणाला कागदी स्वरूपात आपली विमा पॉलिसी हवी असेल तर त्यासाठी त्यांना वेगळा अर्ज करावा लागेल.

IRDAI च्या आकड्यांनुसार, भारतात 4 टक्के लोकांहूनही कमी नागरिकांची विमा पॉलिसी आहे. तर दुसरीकडे 2022 पर्यंत देशातील 38 टक्के लोक स्मार्टफोनचा वापर करतांना दिसतील. याच गोष्टीचा वापर करत एअरटेलनं एचडीएफसी लाईफ सोबत मिळून ही विमा स्कीम लॉन्च केली आहे. जेणेकरून स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाची विमा पॉलिसी असावी आणि विमा समाजातील खालच्या घटकापर्यंत पोहोचावा.

सरकारकडूनही देशातील प्रत्येक नागरिकाचा विमा असावा यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. तरीही अजून देशातील मोठ्या संख्येनं नागरिकांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. एअरटेलच्या या योजनेनंतर आता कंपनीच्या गाहकांच्या संख्येत आणखी किती वाढ होते, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, देशातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये एअरटेल नंबर एक वर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी