एअरटेल, जिओ, व्हीआयचे प्लॅन महागणार

Airtel, Vi And Jio Plans Tariff Hike Soon Expected By Diwali 2022 : दरवर्षीप्रमाणे यंदाही एअरटेल (Airtel), जिओ (Jio), व्हीआयसह (Vodafone Idea or VI) सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन महागणार आहेत.

Airtel, Vi And Jio Plans Tariff Hike Soon Expected By Diwali 2022
एअरटेल, जिओ, व्हीआयचे प्लॅन महागणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एअरटेल, जिओ, व्हीआयचे प्लॅन महागणार
  • एअरटेल, जिओ, व्हीआयसह सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन महागणार
  • दिवाळीच्या सुमारास सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांचे सुधारित प्लॅन जाहीर होतील

Airtel, Vi And Jio Plans Tariff Hike Soon Expected By Diwali 2022 : मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही एअरटेल (Airtel), जिओ (Jio), व्हीआयसह (Vodafone Idea or VI) सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन महागणार आहेत. यंदा दिवाळीच्या सुमारास सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांचे सुधारित प्लॅन जाहीर होतील. या प्लॅनमुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांचे प्लॅन दहा ते बारा टक्क्यांनी महागणार आहेत. सुधारित प्लॅन ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२२ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. 

सुधारित प्लॅनमुळे सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांच्या प्रत्येक प्रीपेड ग्राहकाच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल. एअरटेल सुधारित प्लॅनद्वारे प्रत्येक प्रीपेड ग्राहकाच्या माध्यमातून सरासरी २०० रुपयांचे उत्पन्न कमावणार आहे तर जिओ सरासरी १८५ रुपयांचे आणि व्हीआय सरासरी १३५ रुपयांचे उत्पन्न कमावणार आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. 

भारतातील 4G नेटवर्क सक्षम आणि विस्तृत झाले आहे. यामुळे रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज दूरसंचार (Telecom Industry) क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करत आहे. देशातील सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या उत्पन्नवाढीसाठी दरवर्षी किमान एकदा दरवाढ करण्याचे धोरण पुढची काही वर्षे कायम ठेवतील, असाही अंदाज दूरसंचार (Telecom Industry) क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी