Akshaya Tritiya Gold Buy: फक्त १ रुपयात 'इथं' सोनं खरेदीची संधी, पाहा काय आहे ही ऑफर

काम-धंदा
Updated May 07, 2019 | 14:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण घर बसल्या सोनं खरेदी करु शकतात. ते देखील अवघ्या १ रुपयात यासाठी आपल्याला फक्त स्मार्टफोनचा वापर करावा लागेल. 

GettyImages-gold_buy
फक्त १ रुपयात खरेदी करु शकता सोनं, पाहा ही ऑफर  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: Akshay Tritiya 2019 Money Tips: अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. तसं पाहिल्यास सोन्यामध्ये गुंतवणूक करणं हे देखील चांगलंच आहे. जर आपल्याकडे थोडे जरी पैसे असतील तर आपण सोन्यामध्ये नक्की गुंतवणूक करू शकता. जर आपण आतापर्यंत असं करु शकला नसाल तर आज आपण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तसं नक्की करू शकता. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. कारण आपण घरबसल्या सोनं खरेदी करु शकतात. एवढंच नव्हे तर आपलं सोनं विकू देखील शकता. पण यासाठी आपल्याला थोडं टेक्नोलॉजी फ्रेंडली व्हावं लागेल. 

पेटीएम, गुगल पे आणि फोन पे यासारख्या पेमेंट अॅपचा वापर करणं ही आता अगदीच सोपी गोष्ट झाली आहे. याच अॅप्सच्या मदतीने आपणं सोनं खरेदी आणि विक्री करू शकता. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपण १ रुपयांपासून सोनं खरेदी किंवा विक्री करु शकता. तसंच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पेटीएम हे सोनं खरेदीवर कॅशबॅक ऑफर देखील देत आहे. 

पेटीएमवर सोने खरेदीसाठी विशेष ऑफर

पेटीएमवर आपण १ रुपयांपासून ते १.५ लाखापर्यंत किंमतीचं सोनं खरेदी करु शकता. यासोबतच आपण गोल्ड सेव्हिंग प्लॅन देखील खरेदी करु शकता. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पेटीएमवर खरेदी केल्यास ग्राहकांना १५०० रुपयांचं अतिरिक्त सोनं आणि ५० टक्क्यांपर्यंत कॅशबॅकही मिळणार आहे. यासाठी यूजर्सला पोमोकोड AT2109 वापरावा लागेल. 

फोन पे वरुन १ रुपयात सोने खरेदीची संधी

तसंच आपण फोन पे अॅपवरुन देखील सोनं खरेदी करु शकता. इथे देखील आपण १ रुपयांपासून सोनं खरेदी करू शकता. जे आपण आपल्या इच्छेप्रमाणे विकू देखील शकतात. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने इथून सोनं खरेदी करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. याशिवाय आपण गुगल पे मधून देखील सोनं खरेदी किंवा विक्री करू शकतात. दरम्यान, काल (मंगळवार) अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात वाढ झाली होती. २२ कॅरेट सोन्याचा दर ३२,६७० रुपये एवढा होता. 

सोनं खरेदी करण्यासाठी आपण ऑगमेंट (Augmont)अॅपचा वापर करू शकतात. या अॅपवर आपल्याला 'सोने खरेदीवर चांदी मोफत' अशी ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर 'गोल्ड होम डीलिव्हरी' ऑर्डरवरच मिळणार आहे. या अॅपमध्ये आपण १ ग्रॅमपासून सोनं खरेदी करु शकता. यासोबत आपल्याला चांदी मोफत घरपोच मिळेल. पण ही ऑफर फक्त अक्षय्य तृतीया म्हणजे आजच्या दिवशी ७ मे २०१९ पुरतीच आहे. 

ऑगमोंटचे संचालक, सचिन कोठारी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'आपल्या संस्कृतीत अक्षय्य तृतीयेचं महत्त्व फार मोठं आहे. या दिवशी आपल्याकडे सोने खरेदीची मोठी परंपरा आहे. यासाठी आम्ही ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणली आहे. ज्यात सोने खरेदीवर चांदी मोफत मिळणार आहे. शेअर बाजारात सध्या बरंच तेजीत आहे. ज्यामुळे आम्हाला ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Akshaya Tritiya Gold Buy: फक्त १ रुपयात 'इथं' सोनं खरेदीची संधी, पाहा काय आहे ही ऑफर Description: Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण घर बसल्या सोनं खरेदी करु शकतात. ते देखील अवघ्या १ रुपयात यासाठी आपल्याला फक्त स्मार्टफोनचा वापर करावा लागेल. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola