Dry fruits price: प्रचंड स्वस्त झाले ड्रायफ्रूट्स, काजू, पिस्ताच्या किंमतीत घसरण 

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Jun 17, 2020 | 17:04 IST

Dry fruits prices down: लॉकडाउननंतर सर्व ड्रायफ्रूट्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. विशेषत: बदाम, काजू, पिस्ता, यांच्या किंमत खूप कमी झाल्या आहेत.

dry fruits
ड्रायफ्रूट्स (सुका मेवा)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊननंतर ड्रायफ्रूट्स झाले खूप स्वस्त
  • बदाम, काजू आणि पिस्ताच्या किंमतीत जवळजवळ २० टक्क्यांची घट 
  • अमेरिकन बदामाच्या किंमतीत सर्वाधिक घट

जयपूर: अमेरिका आणि चीनमधील सध्याच्या भांडणाचा परिणाम म्हणा किंवा लॉकडाऊनमुळे कमी झालेली मागणी म्हणा, पण बाजारपेठांमध्ये गेल्या तीन महिन्यांत सुक्या मेव्याच्या किंमतीमध्ये तब्बल २० टक्क्यांची घट झाली आहे. (Dry fruits prices Slash) मग ते बदाम असो वा काजू-पिस्ता. एकीकडे इतर गोष्टींच्या किंमती वाढत असल्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे बदाम आणि इतर ड्रायफ्रूट्सच्या किंमती प्रति किलो २०० रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत.

सर्व सुक्या मेव्यांच्या किंमतीत घट

फेडरेशन ऑफ ग्रोसरी अँड ड्रायफ्रूट कमर्शियल असोसिएशन (अमृतसर) चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मेहरा म्हणाले की, काजू, पिस्ता यासह सर्व ड्रायफ्रूट्सच्या (Dry fruits) किंमती कमी झाल्या आहेत. पण सर्वाधिक घट ही अमेरिकन बदामध्ये झाली आहे. ते म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी चांगल्या प्रतीचे बदाम ७०० रुपये प्रति किलो होते. त्यांची किंमत आता ५५० रुपये किंवा त्याहूनही कमी झाली आहे.

काजू ४०० रुपये प्रति किलो

जयपूरमधील दिल्ली ट्रेडिंग कंपनीचे शैलेंद्र भाटिया यांच्या म्हणण्यानुसार, घाऊक बाजारात किंमती १५ ते २० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. चांगल्या प्रतीचे बदाम जे ६९० रुपयांपासून ८०० रुपये किलो होते, ते आता ५०० ते ७०० रुपये किलोने विकले जात आहेत. त्याचप्रमाणे तुकडा काजू ५५० रुपयांवरून ४०० रुपये प्रति किलोवर आले आहेत. पिस्ताबद्दल सांगायचे तर चांगल्या प्रतीचा पिस्ता पूर्वी १२०० रुपये होता जो आता १००० रुपयांपर्यंत विकला जात आहे. म्हणजेच २०० रुपयांची घट झाली आहे.

सर्वात मोठी घसरण बदाम, काजू आणि पिस्ताच्या किंमतीत

व्यापाऱ्यांच्या मते ड्रायफ्रूट्समध्ये सर्वाधिक घट बदाम, काजू आणि पिस्तामध्ये झाली आहे. अक्रोड, अंजीर, मनुका यासारख्या इतर  ड्रायफ्रूट्सच्या किंमतीत फारसा फरक झालेला नाही. व्यापाऱ्यांच्या मते किंमतीतील कपातीमागील प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊन आहे. मेहरा यांच्या म्हणण्यानुसार, दोन महिने बाजार चालू नव्हता त्यामुळे आयात केलेला माल विकलाच गेला नाही. त्यामुळे जेव्हा मागणी-पुरवठा समीकरण चुकले तेव्हा किंमती खाली आल्या. ड्रायफ्रूट्सचा सर्वाधिक वापर हा मिठाई, हॉटेल उद्योग, विवाहात होतो. पण लॉकडाऊनमुळे ना दोन महिने मिठाई बनवल्या गेल्या, ना हॉटेल उघडलं की लग्न सोहळे झाले. अशावेळी कोणी ड्रायफ्रूट्स कसे खरेदी करणार?

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेला वाद यामुळे देखील किंमती कमी झाल्या

बदाम आणि मनुका वगळता इतर ड्रायफ्रूट्स हे गरम असतात. म्हणून हिवाळ्यात ते अधिक खाल्ले जातात. उन्हाळ्यात मिठाई, आईस्क्रीम उद्योगात त्यांचा जास्त वापर केला जातो. जयपूर किराणा व ड्रायफ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष प्रल्हाद अग्रवाल यांच्या मते, बदामच्या किंमतीतील घट होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेला वाद. अमेरिकन बदामांचे दोन मोठे आयातदार म्हणजे चीन आणि भारत. पण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून अमेरिका आणि चीन यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळे तेव्हापासून चीनने अमेरिकेकडून बदाम आयात करणं बंद केलं आहे बाहेर काढल्यानंतर आता चीन त्यातून बदाम विकत घेत नाही. त्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेतही त्याचे दर घसरले आहेत.

कॅलिफोर्नियामध्ये बदामचे दर मोठ्या प्रमाणात घसरले

मेहरा यांच्या म्हणण्यानुसार, कॅलिफोर्नियामध्ये बदामची किंमत  २.३५ डॉलरने घसरुन १.५० डॉलर एवढी झाली आहे. शैलेंद्र भाटिया यांच्या मते दोन महिने लॉकडाऊनमुळे विक्री झाली नाही आणि अजूनही २० ते २५ टक्केच विक्री सुरु आहे. चंद्रशेखर मालपाणीच्या मते, लॉकडाउन व ऑफ सीजन यामुळे ड्रायफ्रूट्स विक्रेत्यांचे खूपच नुकसान झाले आहेत. त्यात आता याच्या किंमती देखील निम्म्यावर आल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी