१ मार्चपासून बदलणार अनेक नियम, आपल्या खिशावर होणार या बदलांचा थेट परिणाम

काम-धंदा
Updated Feb 28, 2021 | 10:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

1 March 2021: उद्यापासून तुमच्या घरातील सिलेंडरपासून ते बँकांपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. जाणून घ्या काय आहेत हे नियम आणि काय बदलणार आहे.

Money
उद्यापासून बदलणार सर्व नियम, आपल्या खिशावर होणार या बदलांचा थेट परिणाम  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • 1 मार्चपासून बदलणार स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरच्या किंमती
  • या बँकांसाठीचे नियम बदलणार
  • बदलणार बँकांचे आयएफएससी कोड

1 March 2021: उद्यापासून नवा महिना (New month) सुरू होत आहे. या दिवसापासून म्हणजेच 1 मार्च 2021पासून आपल्या दैनंदिन आयुष्याशी (routine life) संबंधित अनेक गोष्टींबाबतचे नियम बदलणार (rules change) आहेत जे जाणून घेणे आपल्यासाठी गरजेचे आहे. यात सर्वात आधी एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG gas cylinder) किंमतीत वाढ (price hike) होणार आहे. तसेच बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँकेच्या (Dena Bank) व्यवहारांशी (transactions) संबंधित अनेक नियमांमध्येही बदल होणार आहेत.

1 मार्चपासून बदलणार स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरच्या किंमती

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या किंमती ठरवतात. त्याचप्रमाणे 1 मार्च रोजी म्हणजे उद्यापासून गॅस सिलेंडरच्या किंमती बदलणार आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्यात कंपन्यांनी तीन वेळा सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत आणि आत्ताही दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 794 रुपये आहे.

या बँकांसाठीचे नियम बदलणार

सरकारी बँका, बँक ऑफ बडोदा यांनी आपल्या खातेधारकांना इशारा दिला आहे. केंद्र सरकारने देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये केले आहे. त्यामुळे या दोन्ही बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर विजया बँक आणि देना बँकेचे ग्राहक हे आता बँक ऑफ बडोदाचे ग्राहक झाले आहेत. बँकेने आधीच सांगितल्याप्रमाणे उद्यापासून म्हणजेच 1 मार्चपासून विजया बँक आणि देना बँकेचे आयएफएससी कोड बदलणार आहेत. त्यामुळे या दोन्ही बँकांच्या ग्राहकांनी आपला नवा आयएफएससी कोड समजून घेणे महत्वाचे आहे, अन्यथा त्यांना बँकेचे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.

बदलणार बँकांचे आयएफएससी कोड

1 मार्चपासून जुने आयएफएससी कोड काम करणार नाहीत. त्यामुळे जर आपण अद्याप आपला नवा आयएफएससी कोड जाणून घेतला नसेल तर तात्काळ जाणून घ्या. बँकेने ट्वीट करून ही माहिती दिली आहे की देना बँक आणि विजया बँकेचे ग्राहक जे आता बँक ऑफ बडोदाचे ग्राहक झाले आहेत त्यांनी आपला नवा आयएफएससी कोड घ्यावा. सोबतच पंजाब राष्ट्रीय बँकेचाही आयएफएससी कोड बदलणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी