Multibagger stock : या एका शेअरवर मिळणार मोफत 9 शेअर्स, शिवाय शेअर स्प्लिट होत होणार 10 शेअर्स...गुंतवणुकदारांच्या शेअरवर उड्या

Share Market : दुसऱ्या तिमाही निकालानंतर कंपन्यांचे संचालक मंडळ आर्थिक स्थितीचा आढावा घेत या घोषणा करत आहेत. अशाच एक मल्टीबॅगर शेअर (Multibagger stock)असलेल्या कंपनीने आपल्या शेअरधारकांना कमाईची दणदणीत संधी दिली आहे. सध्या बाजारातदेखील तेजी दिसते आहे. त्यातच दुसऱ्या तिमाही निकालांच्या घोषणानंतर लाभांश आणि बोनस शेअर्स जाहीर केले जात आहेत.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • अल्स्टोन टेक्सटाईलच्या गुंतवणुकदारांची जोरदार कमाई
  • कंपनी देणार बोनस शेअर्स
  • शिवाय शेअरदेखील स्प्लिट, कमाईच कमाई

Share Market Investment : मुंबई : सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या लाभांश किंवा बोनस शेअर्स जाहीर करत आहेत. दुसऱ्या तिमाही निकालानंतर कंपन्यांचे संचालक मंडळ आर्थिक स्थितीचा आढावा घेत या घोषणा करत आहेत. अशाच एक मल्टीबॅगर शेअर (Multibagger stock)असलेल्या कंपनीने आपल्या शेअरधारकांना कमाईची दणदणीत संधी दिली आहे. ही कंपनी एक स्मॉल कॅप श्रेणीतील कंपनी आहे. कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करणारी घोषणा केली आहे. ही कंपनी आहे अल्स्टोन टेक्सटाईल (Alstone Textiles). कंपनीने शेअरधारकांसाठी बोनस शेअर्सची घोषणा केली आहे.  कंपनी 9:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. ( Alstone Textiles share declared 9:1 bonus shares to investors)

अधिक वाचा  : खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत

गुंतवणुकदारांची होणार दिवाळी

अल्स्टोन टेक्सटाईल (Alstone Textiles) आपल्या शेअरधारकांना दणदणीत बोनस शेअर्स (Bonus Shares) देणार आहे. कंपन्या एका शेअरसाठी शेअरधारकाला तब्बल 9 शेअर्स मिळणार आहेत. म्हणजेच या कंपनीचा एक शेअर ज्याच्याकडे असेल त्याला 9 बोनस शेअर्स मिळतील आणि त्यानंतर त्याच्याकडील एकूण शेअर्सची संख्या 10 इतकी होईल. बरं गुंतवणुकदारांचा फायदा इतक्यावरच थांबणार नाही. तर बोनस शेअर्सबरोबर कंपनीने स्टॉक स्प्लिटही (Stock Split)जाहीर केला आहे. 1:10 च्या प्रमाणात हा स्टॉक स्प्लिट होणार आला आहे. म्हणजेच कंपनीचा 1 शेअर 10 शेअर्समध्ये विभागला जाईल. कंपनीने यासाठी आता रेकॉर्ड डेट निश्चित केलीआहे. कंपनीच्या बोर्डाने 3 डिसेंबर 2022 ही बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठीची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे.

अधिक वाचा  : मेव्हण्याचं केलं अपहरण...खंडणी म्हणून मागितली वधू

अल्स्टोन टेक्सटाइल्सच्या शेअरचा छप्परफाड परतावा 

अल्स्टोन टेक्सटाइल्स या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मागील काही दिवसांपासून जोरदार तेजी आली आहे. शेअरला काही ट्रेडिंग सत्रांपासून अप्पर सर्किट लागते आहे.  अल्स्टोन टेक्सटाइल्सच्या शेअरची किंमत विक्रमी पातळीवर पोचली आहे.  या स्मॉल-कॅप श्रेणीतील शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात तब्बल 1,300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. फक्त एका वर्षाच्या कालावधीत अल्स्टोन टेक्सटाईल्सच्या शेअरची किंमत  15.75 रुपयांवरून 224.30 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचली आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना कंपनीचा शेअर  5% तेजी नोंदवून 235.50 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

अधिक वाचा  : एकादशी आणि रविवारी तुळशीला का अर्पण नाही करत जल?

संचालक मंडळाची बोनस शेअरला मंजूरी

कंपनीने शेअर बाजारात माहिती देताना सांगितले आहे की कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येक इक्विटी शेअरसाठी प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 9 इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यास मान्यता दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने 8 कोटींची थकबाकी नोंदवली आहे. कंपनीचा परदेशातील आणि भारतातील कापड बाजारातील व्यवसाय लक्षात घेता आगामी तिमाहीत कंपनीची कामगिरी चांगली होण्याची अपेक्षा आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी