Gautam Adani Journey | शिक्षण सोडण्यापासून ते किडनॅप होईपर्यत...सगळ्या जगाला थक्क करणाऱ्या, गौतम अदानींचा जबरदस्त प्रवास

Gautam Adani's success journey : गौतम शांतीलाल अदानी (Gautam Adani) हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा सध्या जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. गौतम अदानी त्याच्या संपत्तीत जोरदार वाढ झाल्यामुळे त्यांचा समावेश 100 अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या मोजक्या लोकांमध्ये झाला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती (Gautam Adani Wealth) 118 अब्ज डॉलरवर पोचली आहे. त्यांच्या यशाची जबरदस्त कहाणी जाणून घेऊया

Amazing facts about Gautam Adani
गौतम अदानी यांच्या काही थक्क करणाऱ्या गोष्टी 
थोडं पण कामाचं
  • 118 अब्ज डॉलरच्या संपत्तीनिशी गौतम अदानी आता जगातील सहाव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
  • 97.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह रिलायन्सचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 11 व्या क्रमांकावर
  • शाळा मध्येच सोडून मुंबईच्या हिऱ्या व्यापारात यश कमावणाऱ्या आणि वयाच्या 20 व्या वर्षी करोडपती होणाऱ्या अदानींच्या यशाची कहाणी

Amazing facts about Gautam Adani : नवी दिल्ली  : गौतम शांतीलाल अदानी (Gautam Adani) हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा सध्या जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. गौतम अदानी त्याच्या संपत्तीत जोरदार वाढ झाल्यामुळे त्यांचा समावेश 100 अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या मोजक्या लोकांमध्ये झाला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती (Gautam Adani Wealth) 118 अब्ज डॉलरवर पोचली आहे. त्यामुळे गौतम अदानी आता जगातील सहाव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर 97.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह रिलायन्सचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 11 व्या क्रमांकावर आहेत. अदानी आणि अंबानी यांच्या संपत्तीत आता 20.4 अब्ज डॉलरचा फरक आहे. (Amazing facts about Gautam Adani, his spectacular journey)

गौतम अदानींच्या या थक्क करून टाकणाऱ्या जबरदस्त प्रवासातील काही थक्क करणाऱ्या गोष्टी जाणून घेऊया-

1. मृत्यूशी निसटती भेट

मुंबई हल्ल्यात गौतम अदानी मृत्यूच्या कचाट्यातून सुटले होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी गौतम अदानी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये जेवत होते. त्या दिवशी हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला होता. अदानी इतर पाहुण्यांसह तळघरात लपले. अदानी यांनी सांगितले होते की, त्यांनी मृत्यूला केवळ 15 फूट अंतरावरून पाहिले होते. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 160 हून अधिक लोकांचा बळी घेतला होता.

अधिक वाचा : Gautam Adani Update | अदानींचा झंझावात...अंबानी सोडाच, गुगलच्या संस्थापकांनादेखील टाकले मागे, लवकरच जेफ बेझॉसलाही टाकणार मागे...एका दिवसात कमावले 65 हजार कोटी

2. अदानींचे झाले होते अपहरण 

गौतम अदानी यांचे एकदा अपहरण झाले होते. 1998 मध्ये त्यांच्या संपत्तीबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन फझलू रहमानने 15 लाख डॉलर्सच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण केले होते.

3. अवघ्या 100 तासांत 6,000 कोटींचा करार पूर्ण 

गौतम अदानी यांचे बोलणी कौशल्य म्हणजे नेगोशिएशन स्किल जबरदस्त आहे. त्यांनी अवघ्या 100 तासांत 6,000 कोटी रुपयांचा करार पूर्ण केला होता. या करारामुळे त्यांना उडुपी थर्मल पॉवर प्रकल्प मिळाला. या करारासाठीच्या वाटाघाटी 100 तासांत पूर्ण झाल्या होत्या.

4. वयाच्या 20 व्या वर्षी झाले करोडपती 

गौतम अदानी वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी करोडपती झाले. हा पैसा त्यांनी स्वतः कमावला. गौतम अदानी यांचा जन्म कापड व्यावसायिक कुटुंबात झाला. पण कौटुंबिक व्यवसायात त्यांना रस नव्हता. म्हणून सुरूवातीला त्यांनी मुंबईत हिरे दलाल म्हणून काम केले आणि अवघ्या तीन वर्षांत दहा लाख कमावले.

अधिक वाचा : Adani Stocks | अदानीच्या या 3 कंपन्यांच्या शेअर्सची धूम...शेअरवर पडल्या गुंतवणुकदारांच्या उड्या, काय आहे कारण?

5. सुरुवातीपासूनच मोठा विचार

अदानी सुरुवातीपासूनच मोठी स्वप्ने पाहत असत. शालेय जीवनात ते एकदा गुजरातमधील कांडला बंदर पाहण्यासाठी गेले होते. तिथलं दृश्य पाहून त्याने ठरवलं होतं की आपणही आयुष्यात असंच काहीतरी किंवा त्याहूनही मोठं करायचं. आज अदानी समूहाकडे अनेक बंदरे आहेत.

6. शिक्षण अर्धवट सोडले

गौतम अदानी यांनी मध्येच शाळा सोडली. अहमदाबादच्या सीएन विद्यालयाच्या वाणिज्य विभागातून त्यांनी शाळा सोडली आहे. मुंबईतील हिऱ्यांच्या व्यवसायाने त्यांना खूप आकर्षित केले होते म्हणूनच त्यांनी यात हात घालायला सुरुवात केली. अवघ्या तीन वर्षांत त्यांनी या व्यवसायात प्रभुत्व मिळवले.

7. अदानी समूह, रिलायन्स आणि टाटा समूहाच्या श्रेणीत

अदानी समूह आता भारताच्या 200 अब्ज डॉलर बाजारमूल्याच्या तीन सदस्यीय क्लबमध्ये सामील झाला आहे. अदानी ग्रुप व्यतिरिक्त या क्लबमध्ये रिलायन्स ग्रुप आणि टाटा ग्रुपचा समावेश आहे. अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप म्हणजे एकूण बाजारमूल्य आता 16 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. या कंपन्यांच्या शेअर्सनी बंपर परतावा देऊन गुंतवणुकदारांनादेखील श्रीमंत केले आहे. देशातील टॉप-10 कंपन्यांमध्ये अदानी ग्रीनचा समावेश झाला आहे.

अधिक वाचा : LIC IPO Update | सर्वात मोठ्या आयपीओतून लवकरच करा जोरदार कमाई.... एलआयसी आयपीओ 25 ते 29 एप्रिल दरम्यान येण्याची शक्यता

8. सागरी बंदरे-रेल्वे जोडण्यामागे यांचीच कल्पना

भारताच्या सागरी बंदरे-रेल्वे जोडण्याच्या धोरणामागे गौतम अदानी यांची कल्पना आहे. त्यांनी भारताचे तत्कालीन रेल्वे मंत्री नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना देशातील बंदरे मुख्य रेल्वेशी जोडणाऱ्या योजनेचे राष्ट्रीय महत्त्व पटवून दिले. यानंतर सरकारचे पोर्ट-रेल्वे लिंकेज धोरण तयार करण्यात आले.

9. हाच आहे यशाचा मंत्र 

गौतम अदानींच्या या उत्तुंग यशामागे कोणता मंत्र आहे, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला. आपल्या यशामागे एक मंत्र असल्याचे ते म्हणाले होते. “माझ्या संपूर्ण आयुष्यात मला कधीही निकालांचे वेड लागले नाही. निकालाची पर्वा न करता मी फक्त प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित करतो.''

10. अदानींची घातली जगाला गवसणी

अदानींच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत सोमवारी जोरदार तेजी आली. यामुळे अदानींच्या संपत्तीत (Adani Wealth) एकाच दिवसात 8.57 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 65,091 कोटी रुपयांची भर पडली आहे. अदानीची एकूण संपत्ती या वर्षी 41.6 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती आता 118 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे. या संपत्तीसह गौतम अदानी आता जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोचले आहेत. गौतम अदानी यांनी मागील काही वर्षात जोरदार प्रगती केली आहे. बंदरे, विमानतळ, खाणी, ऊर्जा अशा विविध क्षेत्रात त्यांचा अदानी समूह जोरदार घोडदौड करतो आहे. आगामी काळात जगभरातील परिस्थिती लक्षात घेता अदानींनी अपारंपारिक ऊर्जेत म्हणजे सौरऊर्जेत प्रचंड मोठी गुंतवणूक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी