Amazon Layoff Update : स्वत:हून राजीनामा दिल्यास चांगले फायदे....अ‍ॅमेझॉनची भारतीय कर्मचाऱ्यांना ऑफर, 10,000 कर्मचारी काढणार

Amazon Update : अॅमेझॉन तब्बल 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून (Amazon lay off) काढून टाकणार आहे. कंपनीने त्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो आहे.हजारो लोकांच्या नोकऱ्या एकाचवेळी जाणार असल्यामुळे अॅमेझॉनने कर्मचाऱ्यांना ऑफर देण्यास सुरूवात केली आहे. यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांनी स्वत:च राजीनामा देण्यास सांगते आहे.

Amazon Lay off
अ‍ॅमेझॉनची प्रचंड नोकरकपात 
थोडं पण कामाचं
  • अ‍ॅमेझॉनने मोठ्या नोकर कपातीला सुरूवात केली
  • कंपनी तब्बल 10,000 कर्मचारी काढणार
  • नोकरकपातीआधी कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली व्हॉलन्टरी सेपरेशन प्रोग्रॅमची ऑफर

Amazon firing Indian employees : नवी दिल्ली : जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने (Amazon) मोठ्या नोकर कपातीला सुरूवात केली आहे. ट्विटर, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, टेन्सेंट यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांनी याआधीच नोकरकपातीचा (Mass Layoff) मार्ग अवलंबला आहे. आता अॅमेझॉन तब्बल 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून (Amazon lay off) काढून टाकणार आहे. कंपनीने त्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो आहे. ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी चांगली नाही त्यांना काढून टाकले जाणार आहे. कामगिरीच्या आधारावर कर्मचाऱ्यांची छाटणी एरवीदेखील होत असते. मात्र आता होणारी नोकरकपात ही ऐतिहासिक असणार आहे. हजारो लोकांच्या नोकऱ्या एकाचवेळी जाणार असल्यामुळे अॅमेझॉनने कर्मचाऱ्यांना ऑफर देण्यास सुरूवात केली आहे. यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांनी स्वत:च राजीनामा देण्यास सांगते आहे. असे केल्यास कंपनी त्या कर्मचाऱ्यांना अनेक फायदे देणार आहे. असे करण्यामागे कर्मचारीदेखील नाराज होऊ नयेत आणि नोकरकपातदेखील अंमलात आणली जावी हा कंपनीचा हेतू आहे. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने राजीनामा (VSP) देण्याच्या ऑफर देण्यात आल्या आहेत. (Amazon gives VSP offer before laying off Indian employees read in Marathi)

अधिक वाचा : FIFA World Cup 2022: 44 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये घडलेय हे....

व्हॉलन्टरी सेपरेशन प्रोग्रॅम काय आहे (VSP)

प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार L1 ते L7 बँडमध्ये काम करणाऱ्या काही भारतीय कर्मचाऱ्यांना  व्हॉलंटरी सेपरेशन प्रोग्राम म्हणजेच VSP च्या ऑफर मिळाल्या आहेत. कंपनीच्या या ऑफरनुसार अॅमेझॉनच्या  एखाद्या कर्मचाऱ्याने व्हीएसपी स्वीकारल्यास त्याला अनेक आर्थिक फायदे मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचार्‍यांना 30 नोव्हेंबर रोजी रात्री 30:30 वाजेपर्यंत ऑफरवर स्वाक्षरी करावी लागेल. मात्र त्यांनी जर ही ऑफर स्वीकारली नाही तर मग त्यांचा आढावा घेण्यात येईल. 

अधिक वाचा : Healthy drinks for winter : हिवाळ्यात ही पेये तुम्हाला ठेवतील निरोगी, शिवाय त्वचादेखील होईल चमकदार

कर्मचाऱ्यांचा काय फायदा होणार

ही ऑफर स्वीकारणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना 22 आठवड्यांचे मूळ वेतन आणि प्रत्येक 6 महिन्यांच्या सेवेसाठी एक आठवड्याचे मूळ वेतन मिळेल. याची मर्यादा 20 आठवडे असेल. यासोबतच कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांच्या विम्याचा लाभही मिळणार आहे. त्याउलट कामगिरीचा आढआवा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्यास त्यांना कंपनीच्या पूर्व-निर्धारित नियमांच्या आधारे पेमेंट केले जाईल. ज्याचे फायदे साहजिकच व्हीएसपी पेक्षा कमी असणार आहेत. यामुळेच अशी शक्यता आहे की अनेक कर्मचारी स्वत:हूनच राजीनामा देईल आणि पर्यायाने कंपनीला जास्त नोकरकपातीची वेळ येणार नाही. असे झाल्यास कंपनीची प्रतिमादेखील खराब होणार नाही. 

अधिक वाचा : या शुक्रवारपासून वर्षातील सर्वात मोठा ‘ब्लॅक फ्रायडे’ सेल

सरकारच्या कडक धोरणाचा परिणाम

कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासंदर्भात सरकारने कठोर धोरण स्वीकारले आहे. कामगार मंत्रालयाने अॅमेझॉन इंडियाला या प्रकरणी उपमुख्य कामगार आयुक्त, बेंगळुरू यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांच्या युनियनने याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुढील अडचणी आणि वाद टाळण्यासाठीच अॅमेझॉनने ही ऑफर आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. प्रत्यक्षात कंपनी 10,000 लोकांना काढून टाकणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी