Amazon Layoff : अनेकांवर कोसळतेय बेरोजगारीची कुऱ्हाड, Twitter, Meta नंतर आता Amazon मध्येही नोकर कपात

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 12, 2022 | 10:06 IST

एका वृत्तानुसार, Amazon Inc खर्च कमी करण्यासाठी आढावा घेत आहे.वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की अ‍ॅमेझॉनने काही नफा नसलेल्या युनिट्समधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी शोधण्यास सांगितले आहे.

Amazon Layoff: After Twitter, Meta, Amazon also cut jobs
अरे देवा! आता Amazonमधील 3766 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ॲमेझॉन कंपनीने आर्थिक परिस्थितीचं कारण देत सध्या भरती थांबवली आहे.
  • अॅमेझॉन कंपनीने त्याच्या अलेक्सा व्यवसायाचे देखील मूल्यांकन करत आहे.
  • अलेक्सा युनिटला वर्षाला $5 अब्ज पेक्षा जास्त ऑपरेटिंग तोटा झाला आहे.

मुंबई : नोकरदारासाठी सध्या वाईट दिवस चालू आहेत, असं दिसून येत आहे.    Twitter, Meta आणि Byju, Brainly आणि Unacademy यासह इतर अनेक कंपन्यांनी खर्चात कपात आणि निधीच्या तुटवड्याचा हवाला देत अनेक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकलं आहे. आता  Amazon सुद्धा तोट्यात जाणाऱ्या युनिट्सचे पुनरावलोकन (review) करत असून  अनेक नोकरदारांना नोकरी वाचविण्याचं टेन्शन आलं आहे. एका वृत्तानुसार, Amazon Inc खर्च कमी करण्यासाठी आढावा घेत आहे.वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की अ‍ॅमेझॉनने काही नफा नसलेल्या युनिट्समधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी शोधण्यास सांगितले आहे.  (Amazon Layoff: Unemployment ax falling on many,After Twitter, Meta, Amazon also cut jobs)

अधिक वाचा  : खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत

याशिवाय कंपनीने नवीन भरतीवरही तात्काळ बंदी घातली आहे.ॲमेझॉन कंपनीने आर्थिक परिस्थितीचं कारण देत सध्या भरती थांबवली आहे. त्यानंतर 3700 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात येणार आहे. दरम्यान ज्या युनिट्समध्ये नफा दिसत आहे, त्या विभागात कंपनी नोकर भरती करत आहे. तसेच रिटेल आणि रोबोटिक्स मधील काही विभाग कंपनी बंद करत आहे.अ‍ॅमेझॉन कर्मचार्‍यांपैकी एक असलेला जेमी झांग हा अ‍ॅमेझॉन रोबोटिक्स एआय मधील सॉफ्टवेअर अभियंता आहे. त्याने आपल्या लिंक्डइनवर पोस्ट केले की, रोबोटिक्स विभागातून त्याची संपूर्ण  टीम काढून टाकली आहे."अ‍ॅमेझॉन रोबोटिक्स एआय मधील माझा 1.5 वर्षांचा कार्यकाळ हा आश्चर्यकारक आलेल्या टाळेबंदीमध्ये संपला (आमची संपूर्ण रोबोटिक्स टीम गेली!), असं "झांग यांनी  आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

अधिक वाचा  : मेव्हण्याचं केलं अपहरण...खंडणी म्हणून मागितली वधू

दरम्यान अ‍ॅमेझॉन कंपनीने त्याच्या अलेक्सा व्यवसायाचे देखील मूल्यांकन करत आहे. सध्या असलेल्या व्हॉइस असिस्टंटमध्ये नवीन गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित करावे की नाही यावर कंपनी विचार करत आहे. परंतु ही क्षमता आणि नव्या गोष्टी जोडण्यासाठी अधिक गुंतवणूक आवश्यक आहे. परंतु  अहवालानुसार बरेच ग्राहक फक्त काही कार्यांसाठी डिव्हाइस वापरतात.

अधिक वाचा  : एकादशी आणि रविवारी तुळशीला का अर्पण नाही करत जल?

डब्ल्यूएसजेने (WSJ)दस्तऐवजांचा हवाला देऊन अहवाल दिला आहे की, अलेक्सा असलेल्या युनिटला वर्षाला $5 अब्ज पेक्षा जास्त ऑपरेटिंग तोटा झाला आहे. अ‍ॅमेझॉनचे प्रवक्ते ब्रॅड ग्लासर म्हणाले, "आम्ही अर्थातच सध्याचे मॅक्रो-पर्यावरण विचारात घेत आहोत आणि खर्च ऑप्टिमाइझ करण्याच्या संधींचा विचार करत आहोत." ग्लासर म्हणाले की कंपनी "अलेक्साच्या भविष्याबद्दल आशावादी" आहोत कारण हा Amazonसाठी एक महत्त्वाचा व्यवसाय आणि गुंतवणूकीचे क्षेत्र आहे.

Amazon ने व्यस्त सुट्टीच्या हंगामात वाढ मंदावलीचा इशारा दिल्यानंतर ही बातमी आली आहे. या सुट्टीच्या काळात विक्रीत वाढ होत असते. परंतु महागाईमुळे ग्राहक पैसा कमी खर्च करत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी, कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की अ‍ॅमेझॉन आपल्या कॉर्पोरेट कर्मचार्‍यांमध्ये नियुक्ती गोठवेल,कारण ई-कॉमर्स "असामान्य मॅक्रो-इकॉनॉमिक वातावरणामुळे पुढील काही महिने तरी नोकरभरती केली जाणार नाहीये. 

आर्थिक मंदीमुळे ॲमेझॉन कंपनीचा मोठा निर्णय

आर्थिक मंदीमुळे ॲमेझॉन कंपनीने तोट्यात असलेल्या प्रक्रिया बंद करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या आठवड्यातच हायरिंग फ्रीजची घोषणा केली. यानंतर आता कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी