5G Auction : आता 5G लिलावात अंबानी आणि अदानी पहिल्यांदाच आमनेसामने, आतापर्यत झाली नव्हती थेट स्पर्धा...

Telecom Sector : देशातील दोन आघाडीचे आणि सर्वात श्रीमंत उद्योगपती आता थेट स्पर्धा करण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani)सतत चर्चेत आहेत. मात्र त्यांची एकमेकांशी थेट स्पर्धा झाली नव्हती, कारण त्यांचे व्यवसायाचे क्षेत्र वेगवेगळे होते. मात्र आता अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील उद्योगसमूह पहिल्यांदाच थेट स्पर्धेत उतरण्याची चिन्हे आहेत.

Competition between Ambani & Adani
अंबानी आणि अदानींमधील स्पर्धा 
थोडं पण कामाचं
  • 5G टेलिकॉम स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलै 2022 पासून सुरू
  • अदानी समूहाने शनिवारी दूरसंचार स्पेक्ट्रम मिळविण्याच्या शर्यतीत प्रवेश केल्याची वाच्यता
  • मात्र दूरसंचार क्षेत्रात सध्यातरी अदानी आणि अंबानी आमनेसामने नाही

Muksh Ambani Vs Gautam Adani:नवी दिल्ली : देशातील दोन आघाडीचे आणि सर्वात श्रीमंत उद्योगपती आता थेट स्पर्धा करण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani)सतत चर्चेत आहेत. मात्र त्यांची एकमेकांशी थेट स्पर्धा झाली नव्हती, कारण त्यांचे व्यवसायाचे क्षेत्र वेगवेगळे होते. मात्र आता अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील उद्योगसमूह पहिल्यांदाच थेट स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या शेवटी 5G दूरसंचार सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या एअरवेव्हच्या लिलावात(5G spectrm auction) सहभागी होतील. तेव्हा हे दोन्ही उद्योगपती एकमेकांना टक्कर देणार आहेत. अर्थात या दोघांमध्ये स्पर्धा असूनदेखील बाजारपेठेत त्यांच्यात पूर्णपणे संघर्ष दिसणार नाही. (Ambani & Adani to compete each other in 5G spectrum auction)

अधिक वाचा : EPFO Update: ईपीएफओच्या 73 लाख पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, लवकरच खात्यात ट्रान्सफर होणार रक्कम

अदानी समूहाकडून 5G शर्यतीत सामील होण्याची वाच्यता 

अदानी समूहाने शनिवारी दूरसंचार स्पेक्ट्रम मिळविण्याच्या शर्यतीत प्रवेश केल्याची वाच्यता केली. परंतु त्यांनी हे विमानतळांपासून ते व्यवसायांना आधार देण्यासाठी खाजगी नेटवर्क म्हणून टेलिकॉम स्पेक्ट्रमचा वापर करणार असल्याचे सांगितले. "आम्ही 5G स्पेक्ट्रम लिलावात खाजगी नेटवर्क सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी तसेच विमानतळ, बंदरे आणि लॉजिस्टिक, वीज निर्मिती, ट्रान्समिशन, वितरण आणि विविध उत्पादन ऑपरेशन्समध्ये वर्धित सायबर सुरक्षा प्रदान करण्यासाठी सहभागी होत आहोत," असे निवेदनात म्हटले आहे.

अदानी टेलिफोन क्षेत्रात उतरणार नाही

याचा अर्थ अदानी समूह ग्राहक मोबाइल टेलिफोन क्षेत्रात प्रवेश करणार नाही. या क्षेत्रात अंबानीची रिलायन्स जिओ सर्वात मोठी कंपनी आहे. योगायोगाने, टेलिकॉम कंपन्यांनी खाजगी कॅप्टिव्ह नेटवर्क्सच्या स्थापनेसाठी बिगर-टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रमचे थेट वाटप करण्यास तीव्र विरोध केला. याचा आपल्या व्यवसायावर गंभीर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कंपन्यांना नॉन-टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्याकडून स्पेक्ट्रम भाड्याने घ्यावा किंवा त्यांच्यासाठी खाजगी कॅप्टिव्ह नेटवर्क उभारावे असे वाटत होते. मात्र सरकारने खासगी नेटवर्कच्या बाजूने निर्णय घेतला.

अधिक वाचा : YouTube : एका क्षणात तुमचा खिसा पूर्ण रिकामा करू शकतात हे युट्युब व्हिडिओ, फ्रॉड करण्याची हॅकर्सची नवीन पद्धत...

चार अर्जदारांसह अर्ज प्रक्रिया बंद

5G दूरसंचार सेवा यांसारखी अत्यंत उच्च-गती इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुविधा देण्यासाठी सक्षम असलेल्या या स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज शुक्रवारी किमान चार अर्जदारांसह बंद झाले. 26 जुलै रोजी लिलाव होणार आहे. Jio, Airtel आणि Vodafone Idea या तीन खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी लिलावासाठी अर्ज केला आहे. चौथा अर्जदार अदानी समूह आहे. अदानी समूहाने अलीकडेच एनएलडी (NLD) आणि आयएलडी (ILD) साठी परवाने मिळवले आहेत.

दोघेही उद्योगसमूह गुजरातचे

5G टेलिकॉम स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलै 2022 पासून सुरू होतो आहे आणि या दरम्यान एकूण 72,097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम किमान 4.3 लाख कोटी रुपयांना लिलाव केले जातील. अंबानी आणि अदानी हे दोघेही मूळचे गुजरातचे आहेत आणि त्यांनी मोठ्या व्यावसायिक समूहांची स्थापना केली आहे. मात्र, आजपर्यंत हे दोघेही कोणत्याही व्यवसायात थेट आमने-सामने आले नव्हते.

अधिक वाचा : TATA IPO: कमाईची मोठी संधी! 18 वर्षात पहिल्यांदाच आयपीओ आणतोय टाटा समूह, तारीख आणि तपशील जाणून घ्या

कोण कोणत्या क्षेत्रात भारी

अंबानींचा व्यवसाय तेल आणि पेट्रोकेमिकल्सपासून दूरसंचार आणि रिटेलपर्यंत विस्तारला आहे. तर अदानींनी बंदरांपासून कोळसा, वीज वितरण आणि विमानचालनापर्यंत विस्तार केला आहे. मात्र काहींचे म्हणणे आहे की दोघांचे हितसंबंध खूप व्यापक होत आहेत आणि आता त्यांच्यात संघर्षाची स्थिती तयार झाली आहे.

अदानी यांनी अलीकडच्या काही महिन्यांत पेट्रोकेमिकल्स व्यवसायात प्रवेश करण्यासाठी उपकंपनी स्थापन केली आहे. दुसरीकडे, अंबानी यांनी ऊर्जा व्यवसायात अनेक अब्ज डॉलर्सच्या योजना जाहीर केल्या आहेत. एका सूत्राने सांगितले की, “त्यांच्यामध्ये थेट स्पर्धा कुठे आहे. अदानी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी इलेक्ट्रोलायझर्समध्ये वापरण्यासाठी समुद्राचे पाणी डिसेलिनेट करेल. तर अंबानी आपला तेल व्यवसाय कार्बनमुक्त करण्याचा विचार करत आहेत. पण तरीही या दोघांमध्ये थेट स्पर्धा होणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी