अंबानींच्या सुनेची संपत्ती पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का! 

Akash Ambani Shloka Mehta Anniversary: मागील वर्षी अंबानी कुटुंबातील मुलगा आकाश अंबानी याचे आजच्याच दिवशी श्लोका मेहताशी लग्न झाले होते. पाहा श्लोका मेहता हिची नेमकी संपत्ती किती आहे.

ambani family's daughter in law shloka mehta has earned so much married to akash on this day last year
अंबानींच्या सुनेची संपत्ती पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का!  

मुंबई: Akash Ambani Shloka Mehta Anniversary: गेल्या वर्षी याच दिवशी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याचं श्लोका मेहताशी लग्न पार पडलं होतं. या लग्नात बॉलिवूड सेलेब्सशिवाय देशभरातील बड्या राजकारण्यांनीही आवर्जून हजेरी लावली होती. आकाश अंबानी हा रिलायन्सची टेलिकॉम शाखा रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा संपूर्ण कारभार सांभळतो. तर त्याची पत्नी श्लोका मेहता ही हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांची धाकटी मुलगी आहे. रसेल मेहता हे देशातील सर्वात मोठी डायमंड कंपनी रोझी ब्ल्यू इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

अंबानी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबाबत देशातील लोकांना माहिती आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला त्यांची सून श्लोका मेहता हिच्याबद्दल खास माहिती देणार आहोत. अंबानी कुटुंबातील सून श्लोकाची कमाई माहीत पडल्यास आपल्याला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. मीडिया रिपोर्टनुसार श्लोकाला २०१४   मध्ये रोझी ब्ल्यू फाउंडेशनचं संचालक बनवण्यात आलं होतं. जे रोझी ब्ल्यू ग्रुपचा एक भाग आहे.

इतकेच नाही तर, श्लोका कनेक्ट फॉर या संस्थेची सह-संस्थापक देखील आहे. ही संस्था बिगर सरकारी संस्था (स्वयंसेवी संस्था) यांना मदत करते. फिनअॅपच्या २०१८ च्या अहवालानुसार, श्लोका मेहता हिची एकूण संपत्ती १८० लाख अमेरिकन डॉलर्स एवढी आहे. श्लोकाचे वार्षिक उत्पन्न जवळजवळ ७ कोटी एवढं आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

अंबानी कुटुंबीयांप्रमाणेच त्यांची सून श्लोका हिचे शोकही खूप महागडे आहेत. श्लोकाला लक्झरी  कार खूप आवडतात. तिच्याकडे मिनी कूपर, मर्सिडीज बेंझ आणि बेंटले यासारख्या प्रचंड महागड्या कार आहेत. २०१८ मध्ये, श्लोकाने नवीन बेंटले कार खरेदी केली होती. ज्याची किंमत तब्बल ४ कोटी आहे. त्यामुळे आता अंबानी कुटुंबीयांसोबत आता त्यांच्या सूनेच्या देखील संपत्तीबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, असं असलं तरीही श्लोका कुठेही आपल्या श्रीमंतीचा गवगवा करत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी