अमेरिकेचा मोठा निर्णय, 'या' बड्या चीनी कंपनीसोबत व्यवहार न करण्याचा निर्णय

काम-धंदा
Updated Aug 10, 2019 | 22:21 IST

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं आहे की, अमेरिका हुवावेसोबत कोणताही व्यवहार करणार नाही. अमेरिकेने हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका असं सांगत घेतला आहे.

donald_trump
'या' चीनी कंपनीसोबत व्यवहार न करण्याचा अमेरिकेचा निर्णय  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • अमेरिका आणि चीनमध्ये पुन्हा एकदा सुरु झालं ट्रेड वॉर
  • अमेरिकेने हुवावेच्या व्यवहारांवर घातली बंदी
  • सप्टेंबरमध्ये दोन्ही देशांमध्ये होणारी बैठक होऊ शकते रद्द

वॉश्गिंटन: चीन आणि अमेरिकेत सुरु असलेलं व्यापारी युद्ध शमण्याची चिन्ह अद्याप तरी दिसत नाहीत. जी २० समिटनंतर असं वाटत होतं की, दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आता सुरळीत होतील आणि सारं काही व्यवस्थित होईल. पण आता पुन्हा एकदा संपूर्ण व्यापार जगतावर चिंतेंचे ढग दिसून येत आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत असं म्हटलं की, चीनची दिग्गज टेलिकॉम कंपनी हुवावेसह अमेरिका आता कोणताही व्यवहार करणार नाही. याआधी देखील अमेरिकेने चीनी कंपनी हुवावेवर हेरगिरीचा आरोप केला होता. 

ट्रम्प यांनी याबाबत असं म्हटलं की, '५ जी टेक्नोलॉजीमध्ये भागीदारीची संधी दिल्यास अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.' यावेळी अमेरिकेने फक्त अमेरिकेतच हुवावेवर बंदी घातलेली नाही. तर इतर देशांनाही तसं करण्यासाठी प्रेरित केलं आहे. हुवावे कुठेही आपला जम बसवू नये यासाठी अमेरिका बरेच प्रयत्न करत आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, हुवावे ही कंपनी चीनी सरकारसाठी हेरगिरी करत आहे. 

डोनाल्ड ट्रम्प याबाबतीत असं म्हणाले की, 'आम्ही हुवावेसोबत कोणताही व्यापार करणार नाही. मी खरोखरच याबाबत निर्णय घेतला आहे. हुवावेसोबत कोणताही व्यापार न करणं हे खूप सोपं आहे. आम्ही हुवावेसोबत कोणताही व्यवसाय न करण्याचा निर्णय अनेक गोष्टी विचारात घेऊन केला आहे. याचा अर्थ असा नाही की, जेव्हा आम्ही इतर वेळेस व्यापार करु तेव्हा सहमत नसूच, पण आता हुवावेसोबत कोणताही व्यापार करणार नाही.' 

अमेरिकन सरकारच्या या निर्णयाचा अमेरिकी खासदार मार्को रुबियो यांनी स्वागत केलं आहे. या नियमाच्या अंतर्गत अमेरिका सरकारी एजन्सीद्वारा हुवावे आणि अन्य चीनी कंपन्यांकडून उपकरणं खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकन सरकारद्वारे जारी करण्यात आलेले नियम १३ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात चीनमधील उत्पादनांवर नवीन दर लावल्यानंतर चीनमध्ये अमेरिकेकडून सर्व कृषी उत्पादनांच्या खरेदीवर बंदी घालण्यात आली. ज्यानंतर दोन्ही देशांमध्ये एक दरी निर्माण झाली आहे. 

यासोबतच ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, चीनसोबत सप्टेंबरमध्ये होणारी चर्चा रद्द करु शकतात. जर असं झाल्यास अमेरिका आणि चीनमधील संबंध आणखी बिघडू शकतात. ट्रम्प यांनी सुट्ट्यांवर जाण्याआधी असं म्हटलं की, 'आम्ही पाहू की सप्टेंबरमध्ये चर्चा करु शकू की, नाही. आम्ही सौद्यासाठी तयार नाहीत. पण आम्ही पाहू की, नेमकं काय होतं ते. आमच्याकडे सर्व पर्याय आहेत. आम्ही चांगली कामगिरी करु शकतो. दोन्ही देशांमध्ये जुलैमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबरमध्ये चर्चा होणार होती. दरम्यान, अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंधाचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. त्यामुळेच आता नेमकं काय होतं याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
अमेरिकेचा मोठा निर्णय, 'या' बड्या चीनी कंपनीसोबत व्यवहार न करण्याचा निर्णय Description: अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं आहे की, अमेरिका हुवावेसोबत कोणताही व्यवहार करणार नाही. अमेरिकेने हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका असं सांगत घेतला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...