US Federal Reserve Chair Jerome Powell : नवी दिल्ली : अमेरिकन शेअर बाजार (American Share Market) आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Fed)यांचे खूप जवळचे नाते आहे. फेडच्या निर्णयांचा थेट परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर होत असतो.अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल (Jerome Powell)यांनी कॅन्सस सिटी येथील जॅक्सन होल, वायोमिंग येथे अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या वार्षिक धोरण बैठकीमध्ये आठ मिनिटांचे मुख्य भाषण दिले आणि शेअर बाजारावर दडपण आले. पॉवेलच्या भाषणाने हे स्पष्ट केले की अमेरिकन फेडरल रिझर्व्ह महागाईवर शिक्का मारण्यासाठी व्याजदर (Interest rate hike) वाढवत राहण्याची शक्यता आहे. (American share market tumbled after Jerome Powell which indicated interest hike)
अधिक वाचा : Supertech Twin Tower Noida : भारतातील सर्वात उंच ट्विन टॉवर ७० कोटी खर्चून बांधले आणि २० कोटी खर्चून पाडणार
यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवण्याची आक्रमक मोहीम सुरू केली आहे आणि जागतिक चलन धोरण निर्मात्यांच्या जॅक्सन होल येथील परिषदेत पॉवेलच्या भाषणात असे म्हणत अमेरिकन शेअर बाजाराच्या आशांना झूळ चारली की महागाई विरुद्धची लढाई संपलेली आणि अमेरिकन फेड लवकरच वाढलेले व्याजदर कमी करेल. पॉवेलच्या भाषणातून हे स्पष्ट झाले की आगामी काळात व्याजदर वाढत राहतील. पॉवेल यांनी व्याजदर वाढीचे संकेत दिले आणि अमेरिकन शेअर बाजाराने हाय खाल्ली. डाऊ जोन्स, एस अॅंड पी आणि नासडॅक या तीनही प्रमुख निर्देशांकांसह शुक्रवारी तीन टक्के किंवा त्याहून अधिक घसरणीसह अमेरिकन शेअर्स घसरले. अवघ्या आठ मिनिटांच्या कालावधीत, पॉवेलच्या भाषणाने बाजारात खळबळ उडाली ज्यामुळे अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीत तब्बल 78 अब्ज डॉलरची घट झाली.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत 27 ऑगस्ट 2022 पर्यंत 5.5 अब्ज डॉलर्सची घसरण झाली असून त्यांची एकूण संपत्ती 254 अब्ज डॉलर झाली आहे. तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत जेफ बेझोस (Jeff Bezos)यांनी ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार 6.8 अब्ज डॉलर गमावले आहेत. या दोन्ही श्रीमंतांच्या संपत्तीत सुमारे 12 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
दरम्यान, ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार बिल गेट्स आणि वॉरेन बफे या दोन प्रसिद्ध श्रीमंतांच्या संपत्तीत अनुक्रमे 2.2 अब्ज डॉलर आणि 2.7 अब्ज डॉलरची घट झाली आहे. तर गुगलच्या सेर्गे ब्रिनची संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या खाली आली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्स ही जगातील सर्वात श्रीमंत लोकांची दैनिक क्रमवारी आहे. न्यूयॉर्कमधील प्रत्येक ट्रेडिंग दिवसाच्या शेवटी आकडे अपडेट केले जातात.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मंदी आणि किंमतीचा दबाव कमी करण्याच्या माफक चिन्हांमुळे वित्तीय बाजारपेठांमध्ये आशा निर्माण झाली होती की अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आपल्या आक्रमक व्याजदर वाढीला आळा घालेल. व्याजदर वाढीचे सत्र त्यामुळे थांबेल. मात्र त्याउलट पॉवेल यांनी व्याजदर वाढीचेच सूतोवाच केल्यानंतर अमेरिकन निर्देशांक घसरले. आगामी काळात अमेरिकन फेडला महागाई रोखण्याच्या प्रयत्नात जोरदार व्याजदर वाढ करावी लागेल.
पॉवेलने कबूल केले की व्याजदर वाढीमुळे अर्थव्यवस्था मंदावते आणि रोजगारावरदेखील विपरित परिणाम होतो. हे दुर्दैवी आहे मात्र महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ही पावले उचलावी लागतात.