FM Sitharaman's plan to control Fuel Price : नवी दिल्ली : देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol-Diesel Price) सातत्याने वाढ होत असून दर गगनाला भिडले आहेत. मागील फक्त 14 दिवसांत पेट्रोलच्या दरात 8.40 रुपयांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत स्वस्त पेट्रोलची अपेक्षा करणे कठीण आहे. पण सरकार अशी यंत्रणा बनवणार आहे, ज्यामुळे आगामी काळात पेट्रोल स्वस्त मिळू शकेल. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) मोठे वक्तव्य केले आहे. इंधनाच्या वाढणाऱ्या दरांनी (Fuel Price) सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती (Crude Oil price) आणि देशातंर्गत पातळीवर इंधनाचे वाढलेले दर सर्वांनाच चिंता करायला लावत आहेत. (Amid of Russia-Ukraine War, FM Nirmala Sitaraman have plan to get down fuel prices)
अधिक वाचा : Petrol, Diesel Price Today : दोन आठवड्यात 12वी दरवाढ; आज 40 पैशांनी कमी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर
खरे तर रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे की, देशाला सवलतीत किंवा स्वस्तात इंधन हवे आहे. रशियाच्या ऑफरनंतरच भारताने स्वस्त तेलाची खरेदी सुरू केली असून भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहणार आहे. याचा अर्थ आगामी काळात स्वस्त तेलासह कंपन्यांचे मार्जिनही सुधारेल. सरकार उत्पादन शुल्कातही सवलत देऊ शकते. तुम्हाला माहित आहे का, आपला देश आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो.
अधिक वाचा : Government Scheme | आता सरकार विवाहितांना देणार मोठा लाभ, दरमहा मिळणार 44,793 रुपये
रशिया-युक्रेन युद्धानंतर अनेक देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही रशियन कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली असून किमान 3 ते 4 दिवसांपासून कच्चे तेल खरेदी केले आहे. अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, 'मी माझी ऊर्जा सुरक्षा आणि माझ्या देशाचे हित प्रथम स्थानावर ठेवेन. जर कच्च्या तेलाचा पुरवठा सवलतीत उपलब्ध असेल तर मी तो का घेऊ नये?' त्या म्हणाल्या की युरोपने एक महिन्यापूर्वी रशियाकडून 15% अधिक कच्चे तेल आणि वायू खरेदी केला आहे. मग आम्ही खरेदी का करत नाही?
विशेष म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताने स्वस्त रशियन तेल खरेदी केल्याचे जोरदार समर्थन केले आहे. नुकतेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की मला वाटते की देशांनी बाजारात जाऊन त्यांच्या लोकांसाठी कोणते चांगले सौदे आहेत हे पाहणे स्वाभाविक आहे. "जर आम्ही दोन किंवा तीन महिने थांबलो आणि खरोखरच रशियन गॅस आणि तेलाचे मोठे खरेदीदार कोण आहेत हे पाहिले, तर मला शंका आहे की यादी पूर्वीपेक्षा फार वेगळी नसेल," युरोप आणि नाटो पूर्वीप्रमाणेच रशियन गॅस आणि कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याकडे जयशंकर यांना लक्ष वेधायचे होते.