NFT | Amitabh Bachchan यांच्या एनएफटी कलेक्शनचा धमाका, लिलावात मिळाल्या विक्रमी बोली

Amitabh Bachchan NFT | मधूशाला एनएफटी हे अमिताभ बच्चन यांचे वडील हरीवंश राय बच्चन यांच्या कवितांचे कलेक्शन आहे. या कवितांना स्वत: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. याच्या लिलावाशिवाय अमिताभ बच्चन यांच्या यादगार चित्रपटांचे सात ऑटोग्राफ पोस्टर आणि अर्धा डझन एनएफटी आणि पोस्टर कलेक्शनचादेखील समावेश आहे.

Amitabh Bachchan NFT
अमिताभ बच्चन यांचे एनएफटी 
थोडं पण कामाचं
  • अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांच्या नॉन फंजिबल टोकन (NFT) कलेक्शनला लिलावात १० लाख डॉलरच्या विक्रमी बोली
  • लिलाव प्रक्रिया १ नोव्हेंबरला सुरू होत ४ नोव्हेंबरला संपली
  • अमिताभ बच्चन एनएफटी कलेक्शनला भारतातील आतापर्यतची सर्वाधिक बोली मिळाली

Amitabh Bachchan NFT | मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार (Bollywood Superstar)असलेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांच्या नॉन फंजिबल टोकन (NFT) कलेक्शनला लिलावात १० लाख डॉलरच्या विक्रमी बोली मिळाल्या आहेत. या एनएफटी कलेक्शनमध्ये मधूशाला, ऑटोग्राफ असणारे पोस्टर यांचा समावेश आहे. ही लिलाव प्रक्रिया Beyondlife.Club ने आयोजित केल्या होत्या. ही लिलाव प्रक्रिया १ नोव्हेंबरला सुरू होत ४ नोव्हेंबरला संपली होती. अमिताभ बच्चन एनएफटी कलेक्शनला (Amitabh Bachchan NFT collection) भारतातील आतापर्यतची सर्वाधिक बोली मिळाली आहे. ही लिलाव प्रक्रिया संपताना ७,५६,००० डॉलरची बोली मिळाली आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी ४,२०,००० डॉलरची बोली मिळाली होती. (Amitabh Bachchan NFT | Amitabh Bachchan's NFT collections gets record bids)

अमिताभच्या वडिलांच्या कवितांचे कलेक्शन

मधूशाला एनएफटी हे अमिताभ बच्चन यांचे वडील हरीवंश राय बच्चन यांच्या कवितांचे कलेक्शन आहे. या कवितांना स्वत: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. याच्या लिलावाशिवाय अमिताभ बच्चन यांच्या यादगार चित्रपटांचे सात ऑटोग्राफ पोस्टर आणि अर्धा डझन एनएफटी आणि पोस्टर कलेक्शनचादेखील समावेश आहे. यामध्ये पहिल्या दिवशी १ लाख डॉलरपेक्षा जास्त बोली मिळाल्या आहेत.

एनएफटीमध्ये विविध कलेक्शन

लिलाव प्रक्रियेत दुसरे एनएफटी लूट बॉक्स आहे. याची किंमत प्रत्येकी १० डॉलर निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये बॉक्स विकत घेणाऱ्यास एनएफटी कलेक्शनमधून एक अश्युअर्ड कलावस्तू मिळते. लूट बॉक्समध्ये ५,००० वस्तू आहेत. यासाठी ३ लाख पेक्षा जास्त क्रिप्टो फॅन्सने साइन अप केले आहे. लूट बॉक्स ड्रॉप्सला ५०,००० डॉलरच्या बोली मिळाल्या आहेत. लिमिटेड एडिशन विन्टेज पोस्टर सोबत ऑथेंटिसिटीचे डिजिटल एनएफटी सर्टिफिकेट आहे. त्याची विक्री ९४,०५२ डॉलरला झाली आहे. ऑगस्ट मध्ये BeyondLife.club ने घोषणा केली होती की बच्चन प्लॅटफॉर्मवर आपले एनएफटीचे कलेक्शन सुरू करतील. 

एनएफटी (NFT) काय असते?

साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर नॉन फंजिबल टोकन म्हणजे एनएफटी ही एक डिजिटल मालमत्ता असते. एखाद्या खऱ्या वस्तूचे प्रतिनिधित्व करणारी ही डिजिटल मालमत्ता असते. ही खरी वस्तू संगीत, कला, खेळणी, गेम, व्हिडिओ किंवा सोशल मीडिया पोस्ट इत्यादी विविध वस्तूंचे डिजिटल स्वरुपात प्रतिनिधित्व करणारी ही मालमत्ता किंवा टोकन असते. मात्र याच्या नावात असल्याप्रमाणे म्हणजे हे नॉन फंजिबल टोकन असल्यामुळे याची इतर वस्तूशी अदलाबदल होऊ शकत नाही. हे युनिक आणि दुसऱ्या कशानेही न बदलता येणारे असते. अलीकडच्या काळात एनएफटी हे कलेशी निगडीत वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीसाठी लोकप्रिय झाले आहेत. मात्र यांचा शोध काही आताच लागलेला नाही. २०१४ पासून एनएफटी चलनात आहेत.

एनएफटी हे डिजिटल टोकन असते म्हणजेच ही एक डिजिटल मालमत्ता असते. त्यामुळे याचा संबंध इंटरनेटशी आहे. प्रत्येक एनएफटीचे स्वत:चे असे एक खास वैशिष्ट्य असते. इथेच या डिजिटल टोकनचा नॉन फंजिबल भाग महत्त्वाचा ठरतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी