Milk Price Hike: Amul आणि Mother Dairy ने वाढवले ​​दुधाचे दर, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ

Milk Price Hike: Amul आणि Mother Dairy ने ​​दुधाचे दर वाढवले असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या दरवाढीमुळे देशातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Breaking News
Milk Price Hike: Amul आणि Mother Dairy ने वाढवले ​​दुधाचे दर, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ 
थोडं पण कामाचं
  • Amul आणि Mother Dairy ने ​​दुधाचे दर वाढवले
  • Amul आणि Mother Dairy ने ​​दुधाच्यात दरत प्रति लिटर 2 रुपयांची केली वाढ
  • दूध दरवाढीमुळे सर्वसामान्यांची मोदी सरकारवर टीका

Mother Dairy and Amul Milk Price Hike: मुंबई: महागाईने सर्वसामान्यांच्या बजेट आणि खिशाला मोठा फटका बसला. कारण पिशवी बंद दूध विकणाऱ्या दोन नामांकित कंपन्यांनी आज मंगळवारी (16 ऑगस्ट 2022) पुन्हा एकदा त्यांच्या दुधाच्या दरात वाढ जाहीर केली आहे. (amul and mother dairy raises its liquid milk prices by rs 2 litre with effect from august 17)

मदर डेअरी कंपनीने सांगितले की, बुधवारपासून (17 ऑगस्ट 2022) दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ही वाढ मदर डेअरीच्या सर्व प्रकारच्या दुधावर लागू होणार आहे.

दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या हवाल्याने सांगितले की, अमूल (Amul)दुधाचे  ब्रँड गोल्ड (Amul Gold), शक्ति (Amul Shakti) आणि ताजा (Amul Taza)यांच्या किंमतीत दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढले आहेत.

अधिक वाचा: Inflation in India : महागाईचा फटका; एका वर्षात वाढल्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमती, भाव आटोक्यात आणण्यात सरकार अपयशी

फेडरेशनकडून दुधाच्या दरातील ही वाढ अहमदाबाद (गुजरात), दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई आणि अन्य इतर शहरात वाढ करण्यात आली आहे. दुधाच्या दरातील ही वाढ 17 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे.

दुधाच्या दरवाढीबाबत सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

दुधाच्या दरात वाढ झाल्याची बातमी सोशल मीडियावर येताच लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कुणी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, तर कुणी देशहितासाठी हे आवश्यक पावले असल्याचे म्हटले आहे. ट्विटरवर @ImSushanta11 या हँडलने खिल्ली उडवत असं म्हटलं आहे की, "न्यू इंडियामध्ये आपले स्वागत आहे." @CaptainGzb असं म्हणतो की - ही प्रत्येक भारतीयासाठी चांगली बातमी आहे. पीएम मोदी आता या पैशातून अधिक विकास करू शकतील.

अधिक वाचा: Independence Day : हीच ती वेळ! सोने 100 रुपयांखाली; पेट्रोल अवघ्या 25 पैशात, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत किती वाढली महागाई?

तर @nirajpr80300851 च्या हँडलवरून संताप व्यक्त करण्यात आला आहे. 'मध्यमवर्गीयांना जिवंत मारले पाहिजे', असं म्हणत दुधाच्या दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर @PinguuJi म्हणाले की, 'मी आजपासून मदर डेअरीच्या वस्तू खरेदी करणार नाहीत. सर्वसामान्यांकडून लुबाडण्याची ही हद्द आहे.'

 

दुसरीकडे @kadityaworlds ने खिल्ली उडवली आणि असं म्हटलं की, 'आता आम्ही राष्ट्र उभारणीसाठी अधिक योगदान देऊ शकू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.' तथापि, @leosamit यांनी हे देशाच्या हितासाठी आवश्यक पाऊल असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी