Anand Mahindra झाले ऑटोचालकाचे फॅन, म्हणाले हा तर मॅनेजमेंट प्रोफेसर, शिकण्याची व्यक्त केली इच्छा, पाहा व्हिडिओ

Auto Driver Anna Durai : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे त्यांच्या आधुनिक दृष्टिकोनासाठी चांगलेच लोकप्रिय आहेत. ते त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रोत्साहन देणारे ट्विट (Tweet) पोस्ट करत असतात. ज्यात काही वेळा काही गुणवत्ता किंवा विशेष कौशल्य असलेल्या लोकांचाही उल्लेख असतो. आनंद महिंद्रा यांचे ताजे ट्विटही असेच आहे. यावेळी महिंद्राने आपल्या ट्विटमध्ये चेन्नई येथील ऑटो चालक अण्णा दुराईचा उल्लेख केला आहे.

Anand Mahindra on Anna Durai
ऑटोचालक अण्णा दुराई यांच्यावरील आनंद महिंद्राचे ट्विट 
थोडं पण कामाचं
  • आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रोत्साहन देणारे ट्विट करत असतात
  • यावेळी महिंद्राने आपल्या ट्विटमध्ये चेन्नई येथील ऑटो चालक अण्णा दुराई यांचा उल्लेख केला.
  • अण्णा दुराई चेन्नईत खूप प्रसिद्ध आहेत

Anand Mahindra Tweet : नवी दिल्ली : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे त्यांच्या आधुनिक दृष्टिकोनासाठी चांगलेच लोकप्रिय आहेत. ते त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रोत्साहन देणारे ट्विट (Tweet) पोस्ट करत असतात. ज्यात काही वेळा काही गुणवत्ता किंवा विशेष कौशल्य असलेल्या लोकांचाही उल्लेख असतो. आनंद महिंद्रा यांचे ताजे ट्विटही असेच आहे. यावेळी महिंद्राने आपल्या ट्विटमध्ये चेन्नई येथील ऑटो चालक अण्णा दुराईचा (Auto driver Anna Durai) उल्लेख केला आहे. (Anand Mahindra become fan of Chennai Auto driver, says he is Management Professor)

आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

वास्तविक आनंद महिंद्रा यांनी अण्णा दुराई यांच्यावरील 'द बेटर इंडिया'चा व्हिडिओ (The Better India Video)शेअर केला असून दुराई यांना व्यवस्थापनाचे प्राध्यापक म्हटले आहे. व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, 'जर एमबीएचे विद्यार्थी त्याच्यासोबत (अण्णा दुराई) एक दिवस घालवू शकत असतील, तर तो ग्राहक अनुभव व्यवस्थापनाचा एक छोटासा अभ्यासक्रमच असेल. हा माणूस फक्त ऑटो ड्रायव्हर नाही... तो मॅनेजमेंटचा प्राध्यापक आहे.' इतकेच नाही तर महिंद्राने आपल्या ट्विटमध्ये महिंद्रा इलेक्ट्रिकच्या सीईओ सुमन मिश्रा यांना टॅग करत पुढे लिहिले आहे, 'चला त्यांच्याकडून शिकूया...'

दुराई हा १२वीचा विद्यार्थी आहे

प्रत्युत्तरादाखल सुमन मिश्रा यांनी ट्विट केले की, 'आनंद महिंद्रा, हा खऱ्या अर्थाने ग्राहक केंद्रित नवा उपक्रम आहे. अण्णा दुराई, आम्ही महिंद्रा इलेक्ट्रिक येथे सहकार्य करण्यासाठी, शिकण्यासाठी आणि ही मानसिकता जोपासण्यासाठी उत्सुक आहोत. त्याचवेळी अण्णा दुराई यांनी आनंद महिंद्रा यांचे आभार मानत उत्तर दिले की त्यांचा संदेश पाहून मला सन्मान मिळत आहे.अण्णा दुराई चेन्नईत खूप प्रसिद्ध आहेत. अण्णा १२ वी शिकलेले आहेत पण ते अस्खलित इंग्रजी बोलतात. Hyundai, Vodafone, Royal Enfield आणि Danfoss आणि Gamesa सारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी व्यवस्थापनाच्या युक्त्या शिकवल्या आहेत.

ऑटोमध्ये प्रवाशांसाठी आहेत या सुविधा

बेटर इंडिया व्हिडिओमध्ये अण्णा दुराईच्या ऑटोमध्ये वाय-फाय, टीव्ही, एक छोटा फ्रिज आहे. ते त्यांच्या ग्राहकांना ऑटोमध्ये मास्क, सॅनिटायझर, वर्तमानपत्रे, मासिके, स्नॅक्स, पुस्तके, स्वाइपिंग मशीन, लॅपटॉप आणि टॅब्लेट देखील देतात. तेही कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता. त्याच्या ऑटोमध्ये Amazon Echo आणि Google Nest देखील आहे. ३७ वर्षीय दुरई सामान्य ऑटो ड्रायव्हर सारखा दिसतो पण अर्थव्यवस्था, स्टार्टअप इत्यादीबद्दल बोलतो. अण्णा दुराई यांचे स्वप्न व्यापारी बनण्याचे होते परंतु कौटुंबिक कारणांमुळे त्यांना १२वीतच शाळा सोडावी लागली. त्यांनी ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या आणि त्यानुसार त्यांच्या ऑटोमध्ये त्या सुविधा जोडल्या आहेत. अण्णा दुराईसारख्या प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण कल्पना लढवणाऱ्या तरुण व्यावसायिंकाची देशाला मोठी गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी