Anand Mahindra Post | उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ९०० कर्मचारी काढणाऱ्या कंपनीवर केली कडक टीका

Anand Mahindra | विशाल गर्ग (Vishal Garg)यांनी एका झूम कॉलवर आपल्या कंपनीतील ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. या गोष्टीवर सध्या वादविवाद होत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) याची खूपच चर्चा होते आहे आणि त्यावर टीकादेखील होते आहे. या वादग्रस्त निर्णयानंतर विशाल गर्ग यांनी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता त्यांच्या या निर्णयावर प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अॅंड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनी टीका केली आहे.

Anand Mahindra criticizes Vishal Garg
आनंद महिंद्रा यांची विशाल गर्गवर टीका 
थोडं पण कामाचं
  • आनंद महिंद्रा यांची विशाल गर्गवर टीका
  • विशाल गर्गच्या निर्णयावर सोशल मीडियावर मोठी चर्चा
  • विशाल गर्ग यांनी मागितली माफी

Anand Mahindra | नवी दिल्ली : बेटर डॉट कॉम (better.com)या अमेरिकेतील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गर्ग (Vishal Garg)यांनी एका झूम कॉलवर आपल्या कंपनीतील ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. या गोष्टीवर सध्या वादविवाद होत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) याची खूपच चर्चा होते आहे आणि त्यावर टीकादेखील होते आहे. या वादग्रस्त निर्णयानंतर विशाल गर्ग यांनी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता त्यांच्या या निर्णयावर प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अॅंड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनी टीका केली आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर म्हटले आहे की या कर्मचाऱ्यांना दुसरी संधी द्यायला हवी होती. विशाल गर्ग यांनी अयोग्य पद्धतीने कर्मचारी कपात केली. ज्या वातावरणात गर्ग यांनी हा निर्णय घेतला त्यावरदेखील महिंद्रा यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. (Anand Mahindra criticizes Vishal Garg, raise questions about work culture)

आनंद महिंद्रा यांनी काय म्हटले

आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरपर लिहिले आहे की ही कारवाई होणार हे नक्की होते. मात्र सीईओ अशा पोकळीत काम करत नाहीत. सीईओ अशा पद्धतीने काम करतात ज्यात त्यांना खात्री असते की ते यशस्वी होतील. कंपनीचे संचालक मंडळ कोणत्या प्रकारच्या कार्यसंस्कृतीला चालना देते आणि पाठिंबा देते हे दिसायला हवे. ही कोणत्या प्रकारची कार्यसंस्कृती आहे ज्यात या सीईओला वाटले की त्याच्या या कृतीचे कौतुक होईल आणि त्याला याचा फायदा होईल.

मागील आठवड्यातच महिंद्रा यांनी ट्विट केले होते की 'त्यांना या गोष्टीचे कुतुहल आहे की अशी मोठी चूक केल्यावरदेखील सीईओ त्याच्या पदावर राहतो की नाही. या सीईओला दुसरी संधी दिली पाहिजे असे वाटत नाही का.' त्यानंतर महिंद्रा यांच्या ट्विटवर खूप प्रतिक्रिया आल्या होत्या. यात बहुतांश लोकांनी गर्ग यांच्या कृतीवर टीका केली होती.

विशाल गर्गने मागितली माफी

बेटर डॉट कॉमचे सीईओ विशाल गर्ग यांनी मागील आठवड्यातच आपल्या कृतीबद्दल माफी मागितली होती. त्यांनी ज्या पद्धतीने कर्मचारी कपात केली त्याबद्दल माफी मागितली होती. सोशल मीडियावर त्यांची ही कारवाई जबरदस्त व्हायरल झाली होती. कंपनीच्या ईमेलनुसार बेटर डॉट कॉमचे चीफ फायनान्शियल ऑफिसर केविन रयान कंपनीच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करणार आहे आणि तेच संचालक मंडळाला रिपोर्टिंग करणार आहेत. 

काही दिवसांपूर्वीच विशाल गर्ग (Vishal Garg)आणि त्यांचे स्टार्टअप (Startup)याची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. कारण विशाल गर्ग यांच्या Better.com या कंपनीने एका झूम कॉलवर एका फटक्यात ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले होते. यानंतर काही तासातच विशाल गर्ग सुट्टीवर गेल्याचे वृत्त समोर आले होते. सोशल मीडियावर (Social Media) आणि इंटरनेटवर या निर्णयाची आणि स्टार्टअपची जोरदार चर्चा झाली होती. यावर चांगली टीका देखील झाली होती. मात्र आता Better.com हे स्टार्टअप लिंक्डइनच्या (LinkedIn) यादीत आघाडीवर आहे. अमेरिकेत या स्टार्टअपला पहिला क्रमांक मिळाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी