Weather Prediction by Coconut : नवी दिल्ली : महिंद्रा अॅंड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच अॅक्टिव्ह असतात. त्यांचे ट्विट धमाल उडवून देत असतात. ते सतत काहीतरी चाकोरीबाहेरील शोधत असतात. त्यामुळेच त्यांचे ट्विट चर्चेत असते. आता त्यांनी आपल्या नव्या ट्विटमध्ये (Anand Mahindra Funny Tweet) एक हवेत लटकणाऱ्या नारळाचा फोटो शेअर करून धमाल उडवून दिली आहे. हे नारळ साधेसुधे नसून ते हवामानाचा अंदाज व्यक्त करते. अनेकवेळा हवामान विभागाचा हवामानासंदर्भातील अंदाज (Weather Prediction)चुकत असतो. अशावेळी या लटकत्या नारळाचा ( Coconut)वापर करून हवामानाचा अंदाज घेण्याची पद्धत आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया. (Anand Mahindra Shared a funny photo of coconut predicting the weather)
अधिक वाचा : 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून पुन्हा मोठी भेट, जुलै मध्ये पुन्हा होणार महागाई भत्त्यात वाढ
आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी एका लटकत्या नारळाचा फोटो शेअर केला आहे. हवामान बदल (Climate Change), जागतिक पर्यावरण संकट याच्या पार्श्वभूमीवर जगभरात हवामानात सतत बदल होताना दिसतात. अवकाळी पाऊस, वादळे, तापमानातील वाढ, अनियमित पाऊस, पूर, दुष्काळ यासारख्या असंख्य संकटांना जगभरातील अनेक देशांना तोंड द्यावे लागते आहे. अशा वेळी सर्वच जण हवामाना विभागाच्या अंदाजाकडे डोळे लावून बसलेले असतात. मात्र अनेकवेळा हवामान विभागाचा अंदाजदेखील चुकलेला दिसतो. आता आनंद महिंद्रा यांनी जो हवेत लटकणाऱ्या नारळाचा फोटो शेअर केला आहे तो एका बीचवरील आहे. या हवते लटकणाऱ्या नारळासोबतच एक बोर्ड लावण्यात आला आहे. या बोर्डवर हवामानासंदर्भात आणि या नारळासंदर्भात लिहिण्यात आले आहे. म्हणजेच या नारळाच्या दशेवरून हवामानाविषयी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आनंद महिंद्रा यांनी मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावरील एक नारळ आणि बोर्ड यांचा फोटो शेअर केला आहे. यात हवामानाविषयीचे अंदाज देण्यात आले आहेत. मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर असणारे हे नारळ आणि बोर्ड आहे. जर हे हवेत लटकणारे नारळ स्थिर असेल तर हवामान स्थिर आहे. नारळ ओले असल्यास पावसाचा अंदाज घेता येतो. तर नारळ सुकल्यास कोरडे हवामान राहण्याचा अंदाज येतो. याचप्रकारे हे हवेत लटकणारे नारळ हिमवर्षाव, धुके आणि वादळाचीदेखील सूचना देते.
अधिक वाचा : India Post Sarkari Bharti 2022: ग्रामीण डाक सेवकांच्या 38 हजार जागा रिक्त, GDS साठी करा अर्ज
आनंद महिंद्रा यांच्या या हवेत लटकणाऱ्या नारळावर आणि हवामान अंदाजावर सोशल मीडियावर अनेक मजेदार कॉमेंट्स आल्या आहेत. एका युजरने या नारळाला हवामान विभागापेक्षा जास्त विश्वसनीय म्हटले आहे. त्याने म्हटले आहे की इथे नारळामुळे किमान हवामानाचा अंदाजतरी येईल. नाहीतर हवामान विभाग जेव्हा म्हटते की हवा कोरडी राहील तेव्हाच पावसाची रिपरिप सुरू होते. तर एका युजरने म्हटले आहे की मालदिवमध्ये याच प्रकारे हवामानाचा अंदाज घेतला जातो. तर आणखी एका युजरने नारळाऐवजी एका दगडाचा फोटो शेअर करत हवामानाचा अंदाज दाखवला आहे.