Ashay Bhave Success Story: मुंबई : भारतासारख्या मोठ्या देशात गुणवत्तेची कमतरता नाही. देशातील अनेक तरुण सध्या यशस्वीरित्या स्टार्टअप (Startup) चालवत आहेत. अलीकडच्या काळात देशात स्टार्टअपची संकल्पना चांगलीच रुजली आहे. यामुळे तरुण उद्योजकांना (young Entrepreneurs), व्यावसायिकांना प्रचंड मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. काही भारतीय स्टार्टअप तर जगप्रसिद्ध झाले आहेत. अशाच उद्योगी तरुणांपैकी एक आहे आशय भावे (Ashay Bhave) हा २३ वर्षांचा तरुण. आशय भावेचे स्टार्टअप कचऱ्यापासून बुटं (Sneakers manufacturing from waste)बनवते. या स्टार्टअपमुळे प्रभावित होत आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आशयचा स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर दिली आहे. एका ट्वीटद्वारे जेव्हा आनंद महिंद्रा या स्टार्टअपबद्दल कळाले तेव्हा त्यांना आपल्या ट्वीटर हॅंडलद्वारे (Twitter)आशयच्या स्टार्टअपचे कौतुक केले. (Who is Ashay Bhave to whom Anand Mahindra have given offer of crores)
आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत म्हटले की त्यांना खेद वाटतो की या प्रेरणादायी स्टार्टअपबद्दल आधी माहित नव्हते. हे त्या प्रकारचे स्टार्टअप आहे ज्यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. फक्त मोठ्या युनिकॉर्न स्टार्टअपनाच प्रोत्साहन देता कामा नये. पुढे महिंद्रा म्हणाले की ते या स्टार्टअप कडून एक जोडी बूट विकत घेणार आहेत. हे बूट विकत घेण्याची सर्वात चांगली पद्धत कोणी सुचवू शकेल का. पुढे ते म्हणाले जेव्हा हे स्टार्टअप गुंतवणूक घेण्यास सुरूवात करेल किंवा भांडवलाची उभारणी करेल तेव्हा त्यांनी आपल्यालादेखील त्यात सहभागी करून घ्यावे.
आशय भावेने जुलै २०२१ मध्ये या आगळ्या वेगळ्या स्टार्टअपची सुरूवात केली होती. या स्टार्टअपचे नाव थैली (Thaely) असे आहे. कंपनीने ५० हजार पेक्षा जास्त प्लास्टिक बॅग आणि ३५,००० प्लास्टिक बॉटलच्या मटेरियलचा पुनर्वापर केला आहे. आशय भावेला ही कल्पना तो शिकत असताना आली होती. आशय २०१७ मध्ये बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत होता. हा त्याचा कॉलेजमध्ये असतानाचा एक प्रोजेक्ट होता. यावर त्याने काम केले होते. आता ही कल्पना एक यशस्वी बिझनेस मॉडेल बनले आहे. सध्या त्याची कंपनी मोठ्या ब्रॅंडच्या तुलनेत छोटीशी दिसते. मात्र लवकरच युरोप आणि अमेरिकेतील बाजारपेठेत आपली उत्पादने विकण्याची आशयची योजना आहे.
आशय भावेने प्लास्टिक आणि रबर पासून बनलेल्या स्नीकर्सची कल्पना २०१९ मध्ये एमिटी विद्यापीठात युरेका स्टार्टअप पिच स्पर्धेत सादर केली होती. तिने जिंकल्यावर त्याचा उत्साह वाढला. यातून आशय भावेला त्याचा प्रोटोटाइप तयार करण्यासाठी भांडवल मिळण्यासदेखील उपयोग झाला. त्याने आपल्या स्नीकरचे डिझाइन बास्केटबॉल स्नीकरच्या फॅशनवरून घेतले आहे. आशयचे स्टार्टअप वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडून स्वस्त कच्चा माल विकत घेते. प्लास्टिक बॅग उष्णता आणि प्रेशरच्या मदतीने एका फॅब्रिकमध्ये बदलतात. याला ThaelyTex म्हणतात. त्यानंतर त्या फॅब्रिकला बुटात रुपांतरित केले जाते. प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो. या स्टार्टअपला एक जोडी बुट बनवण्यासाठी १२ प्लास्टिकच्या बाटल्या आणि १० प्लास्टिक बॅग लागतात. हे बुट चार प्रकारचे असतात आणि त्याची किंमत जवळपास ७,००० रुपये आहे.