अंबानींच्या २ मोठ्या कंपन्यांचे ९५ टक्के शेअर गहाण

काम-धंदा
Updated May 08, 2019 | 16:29 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Anil Ambani News: अनिल अंबानी यांच्या दोन कंपन्यांनी ९५ टक्क्यांपर्यंत शेअर गहाण ठेवले आहेत. कोटक इक्विटीच्या रिपोर्ट याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे.

Anil Ambani
अंबानींच्या २ मोठ्या कंपन्यांचे ९५ टक्के शेअर गहाण  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई:  अनिल अंबानी गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहे. अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या दोन कंपन्यांचे  ९५ टक्क्यांहून अधिक शेअर्स मार्च २०१९ च्या शेवटी कर्जदारांकडे गहाण ठेवले होते. ब्रोकरेज फर्म कोटक इंस्टिट्युशनल इक्विटीच्या एका रिपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा झाला आहे. रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, सुभाष चंद्रा यांच्या नेतृत्तवात असलेली एस्सेल समूहाच्या दोन कंपन्या झी एंटरटेनमेंट आणि डिश टीव्हीच्या प्रमोटर्सची क्रमशः 66.2 टक्के आणि 94.6 टक्के भागीदारी गहाण ठेवली होती. 

कोटक इंस्टिट्यूशनल इक्विटीनं तयार केलेल्या हा रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की,  IL&FS चे कर्ज संकटात आले आहे. गैर-वित्तीय बँकिंग कंपन्या (एनबीएफसी) मधील डीफॉल्टमुळे IL & FS ला बेकायदेशीर कर्ज देणे कठीण झाले आहे.

प्रमोटर्स पारंपारिक रूपानं आपला दुसऱ्या व्यवसायासाठी पैसे एकत्र करण्यासाठी आपली सूचीबद्ध कंपन्यांची भागीदारी गहाण ठेवतात. अनिल अंबानी यांचा रिलायन्स समूह आणि एस्सेल समूह या दिवसांत संकटांचा सामना करत आहेत. 

रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, प्रमोटर्सनं रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपली 98.3 टक्के आणि रिलायन्स कॅपिटलमध्ये 96.9 टक्के भागीदारी गहाण ठेवली होती. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध टॉप 500 कंपन्यांच्या विश्लेषणावर आधारित रिपोर्टमध्ये सांगितलं की, मूल्याच्या आधारावर प्रवर्तकांचे शेअर्स गहाण ठेवण्यात आले होते. भागीदारी डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत मार्च २०१९ तिमाहीमध्ये घटली होती. 

मार्च तिमाहीच्या शेवटी प्रमोटर्संची गहाण ठेवलेली भागीदारी घटून 2.83 टक्के राहिली आहे. प्रमोटर्संचे शेअर गहाण ठेवताना शिल्लक रक्कम मार्च २०१९ पर्यंत १.९५ लाख कोटी रूपये होती. बीएसई- ५०० इंडेक्सच्या बाजार Capitalizationच्या तुलनेत जवळपास 1.38 टक्के आहे. टॉप ५०० कंपन्यापैकी ११६ कंपन्यांनी शेअर गहाण ठेवले.

डिसेंबर २०१८ तिमाहीमध्ये ती 2.98 टक्के होती. अंबानी समूहच्या कंपन्या रिलायन्स इंफ्रा आणि रिलायन्स कॅपिटल अशी एक कंपनी आहे जी प्रमोटर्संनं आपल्या ९५ टक्क्यांहून अधिक शेअर गहाण ठेवले होते. 

अनिल अंबानी यांच्या नेतृत्त्वाखाली रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या प्रमोटर्संच्या गहाण ठेवलेली भागीदारीमध्ये तिमाहीच्या दरम्यान घट नोंदवली गेली आहे. याव्यतिरिक्त स्ट्राइड्स फार्मा, कॉफी डे एंटरप्राइजेज आणि बजाज कंझ्युमर केअरची गहाण असलेली भागीदारीमध्ये घट नोंदवण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी