Rise in SIP Investment | शेअर बाजाराच्या तेजीची कमाल, म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारे गुंतवणुकीचा पूर

SIP Investment | सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजरातील तेजीचा फायदा घेऊ इच्छितात. ज्या गुंतवणुकदारांना शेअर बाजारात प्रत्यक्ष शेअर घेऊन गुंतवणूक (Investment) करायची नाही ते इक्विटी म्युच्युअल फंडाद्वारे (Mutual Funds) बाजारात करू शकतात. त्यातही म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे (Mutual Fund SIP)गुंतवणूक केल्यास दरमहा छोट्या रकमेद्वारे गुंतवणूक करता येते. या घटकांचाच परिणाम होत एसआयपीद्वारे केली जाणारी गुंतवणूक पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांवर जाऊन पोचली आहे.

Mutual Funds SIP
म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणुकीत वाढ 
थोडं पण कामाचं
  • म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारे विक्रमी गुंतवणूक
  • शेअर बाजारातील तेजीमुळे वाढली एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक
  • एसआयपीद्वारे विक्रमी १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

Investment in Mutual Funds: मुंबई : शेअर बाजारात (Share market) मागील वर्षभरापासून जबरदस्त तेजी दिसून येते आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये शेअर बाजार आणि बाजारातील गुंतवणुकीविषयी कमालीची उत्सुकता आहे. सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजरातील तेजीचा फायदा घेऊ इच्छितात. ज्या गुंतवणुकदारांना शेअर बाजारात प्रत्यक्ष शेअर घेऊन गुंतवणूक (Investment) करायची नाही ते इक्विटी म्युच्युअल फंडाद्वारे (Mutual Funds) बाजारात करू शकतात. त्यातही म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे (Mutual Fund SIP)गुंतवणूक केल्यास दरमहा छोट्या रकमेद्वारे गुंतवणूक करता येते. या घटकांचाच परिणाम होत एसआयपीद्वारे केली जाणारी गुंतवणूक पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांवर जाऊन पोचली आहे. याआधी २०१९ मध्ये ९८,६१२ कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे झाली होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजे अॅम्फीने (AMFI) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. (Annual inflows in SIP by retail investors first time reaches at Rs 1 lakh crore level due share market boom)

परकी गुंतवणुकदारांचा काढता पाय, मात्र बाजार तेजीत

मागील काही दिवसांपासून परकी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसा काढून घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र एसआयपीद्वारे झालेल्या विक्रमी गुंतवणुकीमुळे शेअर बाजारावर या शेअर विक्रीचा नकारात्मक परिणाम झाला नाही. कारण एसआयपीद्वारे येणाऱ्या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा बाजारात गुंतवण्यात आला आहे. म्युच्युअल फंडांनी २०२१च्या ११ महिन्यांमध्ये शेअर बाजारात ६३,४३९ कोटी रुपयांची गुंतवणूक ओतली आहे. तर परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी ४३,१९३ कोटी रुपये शेअर बाजारातून काढून घेतले आहेत. फेब्रुवारी २०२० नंतर म्युच्युअल फंडांद्वारे झालेल्या गुंतवणुकीत वाढ झाली आहे.

एसआयपीद्वारे दर महिन्याला सरासरी ९,००० कोटींची गुंतवणूक

नोव्हेंबरपर्यतच्या सात महिन्यांमध्ये दर महिन्याला एसआयपीमधील गुंतवणूक वाढतच गेली आहे. त्याआधी पहिल्या तीन महिन्यात एसआयपीद्वारे १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. २०२१च्या प्रत्येक महिन्यात एसआयपीद्वारे सरासरी ९,३३७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याआधी एसआयपीद्वारे दरमहा होणारी सरासरी गुंतवणूक ७,०२८ कोटी रुपये होती.

एसआयपीतून दमदार परतावा

एसआयपीद्वारे गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. तीन वर्षात गुंतवणुकदारांना सरासरी एसआयपीद्वारे २५ टक्के परतावा मिळाला आहे. तर पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर एसआयपीद्वारे सरासरी १९ टक्के परतावा मिळाला आहे. इक्विटी फंड्समधील फोलिओंची संख्या वाढून ७.८ कोटींवर जाऊन पोचली आहे. यातील २० टक्के खाती यावर्षी वाढली आहेत.

गुंतवणुकीचे विविध प्रकार विविध परतावा देत असतात. त्यांचे फायदे आणि तोटे असतात. इक्विटी हा प्रकार सर्वाधिक संपत्ती निर्मिती करतो. इक्विटी म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक. आता प्रत्यक्ष शेअर घेऊनदेखील यात गुंतवणूक करता येते. याला दुसरा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड हे इक्विटी आणि डेट अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करून तुम्ही छोट्याशा नियमित गुंतवणुकीने दीर्घकालावधीत मोठा लाभ मिळवू शकता. दररोज फक्त २० रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तजवीज किंवा आर्थिक व्यवस्था निर्माण करू शकता. तरुणवयातच एसआयपीद्वारे गुंतवणूक केली तर रिटायरमेंटपर्यत तुम्ही करोडपती सहज बनू शकता.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी