Credit Card Shopping: ऐनवेळी पैशांची गरज पडली तर आपल्या हातात पैसे (money)असावे यासाठी क्रेडिट कार्ड खूप महत्त्वाचे आहे. या कार्डच्या मदतीने आपण खरेदी करतो, त्यावरुन खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंसाठी लगेच पेमेंट (payment) करण्याची गरज राहत नाही. आपल्या खात्यात पैसे नसले तरी आपण या क्रेडिट कार्डच्या (Credit Card) मदतीने पैसै काढू शकतो, खरेदी करतो. हा फायदा जाणून आपण कार्डचा वापर खूप वेळा करतो. परंतु या कार्डचा जसा फायदा आहे तसा तोटा देखील आहे. यामुळे जर तुम्ही क्रेडिट कार्ड धारक असाल तर काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे.( are you using credit card while shoping? know the benefits and Disadvantages )
अधिक वाचा : या स्टार किड्सला नाही आवडत अभिनय क्षेत्र
या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून लोक क्रेडिट कार्डचा बिनधास्त वापर करतात. विशेषत: खरेदी करताना लोक क्रेडिट कार्डचा वापर जाणूनबुजून करतात, पण त्याचा काही फायदा होतो की नकळतपणे वापरकर्ते आपलं नुकसान करुन घेतात. त्याबद्दल जाणून घेऊया.
तुमच्या खरेदीसाठी पैसे देण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे आहेत.
खरेदीच्या वेळी क्रेडिट कार्ड तुमची क्रयशक्ती वाढवते. तसेच ते स्थानिक आणि परदेशातील सर्व प्रकारच्या स्टोअरमध्ये स्वीकारले जाते.
अधिक वाचा : अजितदादांना जाळ्यात अडकवणार आणि भाजप एनसीपीला रडवणार?
विशिष्ट प्रकारची दुकाने, सुपरमार्केट, पेट्रोल-डिझेल पंप आणि रेस्टॉरंटमध्ये क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी विविध प्रकारचे रिवॉर्ड मिळत असतात.
क्रेडिट कार्ड वापरणे आणि वेळेवर पेमेंट केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर मजबूत होण्यास मदत होऊ शकते. हे नंतर कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवणे सुलभ होते.
अधिक वाचा : जाणून घ्या शुक्रवारचं राशीभविष्य
खरेदी करताना डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्ड वापरल्याने फसव्या व्यवहारांपासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. वेगवेगळ्या क्रेडिट कार्डांच्या क्रेडिट मर्यादा देखील भिन्न असतात. अशा परिस्थितीत, त्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे भरता येत नाहीत आणि यामुळे फसव्या व्यवहारांपासून वाचू शकतात
क्रेडिट कार्डचे जसे अनेक फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत, जे खरेदीसाठी वापरताना लक्षात ठेवले पाहिजेत.
अधिक वाचा : चंद्रपूरमध्ये जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद
क्रेडिट कार्ड वापरण्याचा सर्वात मोठा दोष म्हणजे व्याज भरावे लागते. क्रेडिट कार्डच्या वापरासाठी उच्च व्याजदर आकारले जातात आणि बहुतेकदा असे दिसून येते की लोक खरेदी करताना त्याचा अतिवापर करतात, ज्यामुळे त्यांना नंतर जास्त रक्कम मोजावी लागते.
जर तुम्ही देय तारखेपर्यंत तुमची बिले भरली नाहीत तर क्रेडिट कार्ड मोठ्या प्रमाणात विलंब शुल्क आकारत असते. त्यामुळे तुमच्या खिश्यावर भार पडतो. त्यामुळे क्रेडिट कार्डाचा वापर विवेकपूर्वक केला पाहिजे.
जसे क्रेडिट कार्ड वापरल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकतो, तसाच तो तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब करू शकतो. उच्च शिल्लक, उशीरा पेमेंट आणि नवीन कार्ड्ससाठी वारंवार अर्ज यासारख्या गोष्टी तुमच्या स्कोअरमधून गुण कमी करू शकतात.