Best place to buy home | देशात घर खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण कोणते? पाहा काय म्हणते आर्थिक सर्वेक्षण

Real Estate update : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा तपशील आर्थिक सर्वेक्षण अहवालात (Economic Survey) देण्यात आला आहे. या आर्थिक सर्वेक्षण अहवालात घर घेण्यासाठी देशातील सर्वोत्तम ठिकाण कोणते याची माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र यासारख्या विविध राज्य सरकारांनी सर्कल रेट आणि मुद्रांक शुल्क कमी केले होते.

Best place to buy home in India
घर विकत घेण्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाण कोणते 
थोडं पण कामाचं
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला
  • आर्थिक सर्वेक्षण अहवालात घर घेण्यासाठी देशातील सर्वोत्तम ठिकाण कोणते याची माहिती देण्यात आली
  • घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र यासारख्या विविध राज्य सरकारांनी मुद्रांक शुल्क घटवले

Best place to buy home as per economic survey : नवी दिल्ली :  अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी आर्थिक आढावा म्हणजे आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey) सादर केला. त्यात 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अर्थसंकल्पापूर्वी (Budget 2022) देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा तपशील या अहवाल देण्यात आला आहे. या आर्थिक सर्वेक्षण अहवालात घर घेण्यासाठी देशातील सर्वोत्तम ठिकाण कोणते याची माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र यासारख्या विविध राज्य सरकारांनी सर्कल रेट आणि मुद्रांक शुल्क कमी केले होते. (As per Economic Survey 2021-22, best place to buy home, flat in India)

कोरोना महामारीमुळे शहरांमध्ये घरांच्या व्यवहारात घट

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत जवळपास सर्वच शहरांमध्ये गृहनिर्माण व्यवहारात घट झाली होती. तथापि, कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान, मुंबई, ठाणे, पुणे, नोएडा, हैदराबाद आणि बेंगळुरू यांसारख्या अनेक शहरांमधील घरांचे व्यवहार महामारीपूर्व पातळीच्या तुलनेत वाढले होते. गांधीनगर, अहमदाबाद, चेन्नई, रांची, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये महामारीपूर्व स्तरावर दुसऱ्या कोविड -19 लाटेदरम्यान गृहनिर्माण व्यवहारात घट झाली. तथापि, ही घट कोरोनाच्या पहिल्या लाटेत झालेल्या घसरणीपेक्षा खूपच कमी आहे.

कोरोना महामारीचा रिअल इस्टेटला फटका

अहवालानुसार, कोरोना महामारीमुळे नोकरीची अनिश्चितता कायम आहे. त्यामुळेच ईएमआयसंदर्भात (EMI)नोकरदार चिंतेत आहे. मार्च 2019 च्या तुलनेत मध्यमवर्गीयांचे घर घेण्यासाठी गृहकर्ज घेण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. हे प्रमाण गेल्या चार वर्षांच्या पातळीपेक्षा कमी आहे. वैयक्तिक कर्जाचा सर्वात मोठा विभाग असलेल्या गृहकर्जात नोव्हेंबर 2021 मध्ये वार्षिक पातळीवर 8% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. अर्थात ही नोव्हेंबर 2020 मधील 8.4% वार्षिक वाढीपेक्षा किरकोळ कमी आहे. गृहकर्जाचे प्रमाण मार्च 2018 मध्ये वार्षिक स्तरावर 13.3%, मार्च 2019 मध्ये 21.1%, मार्च 2020 मध्ये 13.3% आणि मार्च 2020 मध्ये 9.1% वाढले होते. कमी व्याजदर आणि मालमत्तेची वाजवी किंमत यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला बसलेला धक्का कमी झाला. वर्षभरात, राज्य सरकारांनी मुद्रांक शुल्कात कपात केली तर विकासकांनी घर खरेदीदारांना प्रोत्साहन आणि सवलती देऊ केल्या. याचा सकारात्मक परिणाम झाला.

शेअर बाजारावर FOMO चा प्रभाव

आर्थिक सर्वेक्षणानुसार, एप्रिल-नोव्हेंबर 2021 मध्ये 75 कंपन्यांच्या IPO ने 89,066 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. तर एप्रिल-नोव्हेंबर 2020  या कालावधीत 29 कंपन्यांनी 14,733 कोटी रुपये बाजारातून उभे केले होते. शेअर बाजारातील भांडवल उभारणीत यातून 504.5 टक्क्यांची नेत्रदीपक वाढ दिसून येते. शेअर बाजारावर मागील वर्षभरात FOMO म्हणजे fear of missing outचा परिणाम म्हणजे आपण गुंतवणुकीची चांगली संधी दवडू, इतरांना जी कमाईची संधी मिळते आहे ती आपल्याला मिळणार नाही अशा भावनेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली दिसून आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी