Credit Card Rule : जबरदस्त! आरबीआयचा नवा नियम...जर तुम्ही क्रेडिट कार्डधारक असाल तर असे झाल्यास बॅंका तुम्हाला दररोज देणार 500 रुपये

Credit card rule : क्रेडिट कार्डचे बिलिंग, क्रेडिट कार्ड जारी करणे आणि क्रेडिट कार्ड (credit card) बंद करणे यासंबंधी अनेक नवीन मार्गदर्शक तत्त्वे या महिन्याच्या सुरुवातीपासून लागू झाली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हे नवीन क्रेडिट कार्ड नियम (Credit card rule)लागू केले आहेत जेणेकरून कार्डधारक आणि कार्ड देणारी बॅंक किंवा वित्तीय कंपनी यांच्यात अधिक चांगली पारदर्शकता यावी.

RBI Directions regarding credit cards
आरबीआयच्या क्रेडिट कार्डसंदर्भातील सूचना 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयने बॅंका आणि एनबीएफसीना दिल्या नवीन सूचना
  • क्रेडिट कार्डधारकांना आरबीआयने दिला मोठा दिलासा
  • क्रेडिट कार्ड बंद करण्यासंदर्भात आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक सूचना

Credit Card Rule Change : नवी दिल्ली : क्रेडिट कार्डचे बिलिंग, क्रेडिट कार्ड जारी करणे आणि क्रेडिट कार्ड (credit card) बंद करणे यासंबंधी अनेक नवीन मार्गदर्शक तत्त्वे या महिन्याच्या सुरुवातीपासून लागू झाली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हे नवीन क्रेडिट कार्ड नियम (Credit card rule)लागू केले आहेत जेणेकरून कार्डधारक आणि कार्ड देणारी बॅंक किंवा वित्तीय कंपनी यांच्यात अधिक चांगली पारदर्शकता यावी. तसेच ग्राहकांना अधिक सुरक्षा आणि अधिकार मिळावेत. या वर्षाच्या सुरुवातीला क्रेडिट आणि डेबिट कार्ड जारी करणे आणि चालवणे यावर RBIने मुख्य निर्देशांसह सूचना जारी केल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्देश, 2022 अंतर्गत यासंबंधीच्या तरतुदी आधीच लागू झाल्या आहेत. (As per RBI new directions Banks to Pay credit card holders Rs 500 Each Day, if do not follow this rule)

“बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या (Banking Regulation Act, 1949) कलम 35A आणि कलम 56 आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या प्रकरण IIIB द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना, भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे की ते सार्वजनिक हितासाठी आवश्यक आणि योग्य आहे. म्हणून, याद्वारे, यापुढे  दिलेले निर्देश जारी करतात," असे RBI ने 21 एप्रिल रोजी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

अधिक वाचा : Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांना मोठा झटका, 3 महिन्यांत झाले 8 हजार कोटींचे नुकसान

नवीन क्रेडिट कार्ड नियमांनुसार काय बदलले ?

नवीन मुख्य निर्देशांनुसार, RBI ने क्रेडिट कार्ड देणाऱ्या बॅंका किंवा वित्तीय कंपन्या कसे काम करू शकतात याबद्दल अनेक नवीन मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत. यामध्ये क्रेडिट कार्ड बंद करणे, बिलिंग तसेच जारी करणे यामध्ये बदल समाविष्ट आहेत. क्रेडिट कार्डशी संबंधित या निर्देशांच्या तरतुदी प्रत्येक शेड्यूल्ड बँक (पेमेंट बँका, राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका वगळून) आणि भारतात कार्यरत असलेल्या सर्व नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) यांना लागू होतील, असे त्यात म्हटले आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 05 July 2022: सोन्यातील तेजी कायम, चांदीच्या भावातही चांगली वाढ, लगेच पाहा ताजा भाव

क्रेडिट कार्ड बंद करण्याचा नियम: (Credit Card Closure Rule)

कार्ड जारी करणार्‍यांना म्हणजे बॅंका किंवा बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्या यांना या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दररोज 500 रुपये द्यावे लागतील. क्रेडिट कार्ड बंद करण्याबाबत, आरबीआयने आपल्या आदेशात अनेक निर्देशांची शिफारस केली आहे. "क्रेडिट कार्ड बंद करण्याची कोणतीही विनंती क्रेडिट कार्ड देणाऱ्या बॅंक किंवा एनबीएफसीद्वारे सात कामकाजी दिवसांच्या आत मान्य केली जाईल. अर्थात यात कार्डधारकाने सर्व देय देयके भरलेली हवीत," असे आरबीआयने म्हटले आहे. या आदेशांमध्ये रिझर्व्ह बँकेने असे म्हटले आहे की कार्ड देणाऱ्या बॅंकेला विनंती केल्यानंतर सात कामकाजाच्या दिवसांत त्याचे क्रेडिट कार्ड बंद न केल्यास त्यांना ग्राहकाला दररोज 500 रुपये द्यावे लागतील.

अधिक वाचा : ITR Filing: कमी पगार असूनही टीडीएस कापला गेला आहे, नो टेन्शन! असा मिळेल रिफंड

“कार्ड जारी करणार्‍याकडून सात कामकाजी दिवसांत क्रेडिट कार्ड बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास, खाते बंद होईपर्यंत ग्राहकाला देय असलेल्या विलंबासाठी प्रतिदिवस 500 रुपये दंड आकारला जाईल. अर्थात खाते बंद करताना त्या खात्याची कोणतीही थकबाकी असता कामा नये." असेही पुढे आरबीआयने सांगितले आहे.

"क्रेडिट कार्ड खाते बंद केल्यानंतर, क्रेडिट कार्ड खात्यांमध्ये उपलब्ध असलेली कोणतीही क्रेडिट शिल्लक कार्डधारकाच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. कार्ड जारी करणार्‍यांनी कार्डधारकाच्या बँक खात्याचा तपशील त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यास तो मिळवायचा आहे." असे त्यात म्हटले आहे.

पुढे आरबीआयने हे स्पष्ट केले आहे की कार्ड जारीकर्त्याने पोस्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमाने त्याचे क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती पाठवण्याचा आग्रह धरू नये. कारण त्यामुळे विनंती प्राप्त होण्यास विलंब होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी