Atal Pension Yojana | साडेतीन कोटींपेक्षा जास्त लोकांनी घेतला हा पेन्शन प्लॅन, पाहा फायदे

Atal Pension Yojana | या योजनेची सुरूवात ९ मे २०१५ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी केली होती. १८ ते ४० वर्षांच्या वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक या सरकारी योजनेत गुंतवणूक (Investment) करू शकते. निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर असावे यासाठी केंद्र सरकारने ही अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगार या योजनेत गुंतवणूक करून पेन्शनचा (Pension) लाभ घेऊ शकतात.

Atal Pension Yojana
अटल पेन्शन योजना 
थोडं पण कामाचं
  • अटल पेन्शन योजनेचे मोठे फायदे
  • असंघटीत क्षेत्रातील लोकांसाठी सरकारने सुरू केला पेन्शन प्लॅन
  • छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मिळवा पेन्शन

Atal Pension Yojana | नवी दिल्ली : केंद्र सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी आणलेल्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) गुंतवणूक करून दर महिन्याला गॅरंटीड पेन्शन मिळवता येते. या योजनेची सुरूवात ९ मे २०१५ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी केली होती. १८ ते ४० वर्षांच्या वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक या सरकारी योजनेत गुंतवणूक (Investment) करू शकते. निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर असावे यासाठी केंद्र सरकारने ही अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगार या योजनेत गुंतवणूक करून पेन्शनचा (Pension) लाभ घेऊ शकतात. या योजनेचे नियमन पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅंड डेव्हलपमेंट ऑथोरिटीकडून (PFRDA) केले जाते. (Atal Pension Yojana: More than 3.54 crore people have registered for this pension plan, see the benefits)

भारत सरकारच्या www.india.gov.in या पोर्टलनुसार अटल पेन्शन योजना ही भारतातील नागरिकांसाठी असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठीची एक केंद्रीय पेन्शन योजना आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत ६०व्या वर्षी १,००० रुपयांपासून ते ५,००० रुपये प्रति महिन्याचे किमान पेन्शन खातेधारकाच्या योगदानानुसार दिले जाणार आहे. कोणताही भारतीय नागरिक ही योजनेत सहभागी होऊ शकतो. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते पाहूया.

पात्रता, गुंतवणूक आणि फायदा

सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे www.india.gov.in दिलेल्या माहितीनुसार कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय १८ वर्षे ते ४० वर्षे आहे, तो अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो. शिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे कोणत्याही बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक बचत खाते असले पाहिजे. जर तुम्ही १८ वर्षे वयापासून या योजनेत गुंतवणूक सुरू केली तर १,००० रुपयांचे गॅरंटीड पेन्शन मिळवण्यासाठी फक्त ४२ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर ५,००० रुपयांचे गॅरंटीड पेन्शन मिळवण्यासाठी या योजनेत दर महिन्याला २१० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

तुमच्या पश्चात नॉमिनीला मिळेल रक्कम

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ६०व्या वयानंतर निश्चित पेन्शन मिळते. तर पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला तितकेच गॅरंटीड पेन्शन मिळते. याशिवाय पेन्शनधारकाच्या ६० वर्षे वयाचे होईपर्यत एकूण जमा झालेली रक्कम किंवा पेन्शन फंड हा नॉमिनीला परत करण्याची देखील व्यवस्था आहे. जर दोघांचा म्हणजे पेन्शनधारक आणि त्याचा जोडीदार या दोघांचाही मृत्यू झाल्यास नॉमिनीला पेन्शन मिळणार आहे.

असे सुरू करा खाते

अटल पेन्शन योजनेत आपले खाते सुरू करण्यासाठी तुमचे ज्या बॅंकेत बचत खाते आहे, तिथे जाऊन अटल पेन्शन योजनेचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल. शिवाय आधार क्रमांक आणि मोबाइल नंबरदेखील द्यावा लागेल. दर महिन्याच्या इन्स्टॉलमेंटसाठी तुमच्या बचत खात्यात पुरेशी रक्कम असणे आवश्यक असते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी