Cash Withdrawal | नव्या वर्षात एटीएममधून पैसे काढणे झाले महाग, या दोन पद्धतीने मोफत काढा कॅश

RBI rule | सर्व एटीएममधून केल्या जाणाऱ्या मोफत ट्रान्झॅक्शनवरील (ATM Transaction Charge)मर्यादा संपल्यानंतर होणाऱ्या ट्रान्झॅक्शनवरील चार्ज रिझर्व्ह बॅंकेने (RBI)वाढवला आहे. एटीएमचे शुल्क खूप जास्त असते असे नाही मात्र असेही पर्याय आहेत ज्यामुळे एटीएममधून पैसे काढल्यावर शुल्क भरावे लागणार नाही. हे पर्याय म्हणजे मायक्रो एटीएम (Micro ATM) आणि आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम

Cash Withdrawal from ATM
एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्कात झाली वाढ 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयच्या नियमामुळे नव्या वर्षात एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ
  • एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क टाळण्यासाठी दोन पर्याय
  • मायक्रो एटीएम आणि आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टममधून पैसे काढल्यास शुल्क नाही

Free Cash Withdrawal from ATM: नवी दिल्ली : नव्या वर्षात एटीएमशी (ATM)निगडीत नियमात बदल झाला आहे. सर्व एटीएममधून केल्या जाणाऱ्या मोफत ट्रान्झॅक्शनवरील (ATM Transaction Charge)मर्यादा संपल्यानंतर होणाऱ्या ट्रान्झॅक्शनवरील चार्ज रिझर्व्ह बॅंकेने (RBI)वाढवला आहे. एटीएमचे शुल्क खूप जास्त असते असे नाही मात्र असेही पर्याय आहेत ज्यामुळे एटीएममधून पैसे काढल्यावर शुल्क भरावे लागणार नाही. हे पर्याय म्हणजे मायक्रो एटीएम (Micro ATM) आणि आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम (Aadhaar Enabled Payment System). हे दोन पर्याय काय आहेत आणि त्याचा वापर कसा करतात ते पाहूया. (ATM Cash witdrawal charges increased in new year)

१ जानेवारीपासून बदलला नियम

नव्या वर्षात १ जानेवारीपासून एटीएममधून कॅश काढणे महाग झाले आहे. एक जानेवारीपासून ग्राहकांना फ्री एटीएम ट्रान्झॅक्शनची सीमा पार केल्यानंतर तुलनेने अधिक शुल्क भरावे लागणार आहे. मागील वर्षापर्यत बॅंकांच्या एटीएममधून कॅश किंवा नॉन कॅश ट्रान्झॅक्शनवर महिन्यामध्ये ५ ट्रान्झॅक्शन मोफत असायचे. यानंतर २० रुपये प्रति ट्रान्झॅक्शनचा चार्ज लागायचा. मात्र १ जानेवारी २०२२ पासून हा चार्ज २१ रुपये प्रति ट्रान्झॅक्शन झाला आहे.

मायक्रो-एटीएममधून काढा पैसे

रिझर्व्ह बॅंकेने जरी एटीएममधून पैसे काढण्यावरील चार्ज वाढवला असला तरी याचा परिणाम मायक्रो एटीएमवर होणार नाही. इथून तुम्हाला मोफत पैसे काढता येतील. मायक्रोएटीएम म्हणजे एक पीओएस मशीन म्हणजे स्वाइप मशीनसारखी असते, ही मशीन दुकानांमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी लावलेली असते. यातून तुम्हाला डेबिट कार्डद्वारे पैसे काढता येतात. यामध्ये बॅंकेत जायची कटकट किंवा एटीएमच्या रांगेची चिंताही नसते.

अर्थात ही सुविधा प्रत्येक ठिकाणी नसते. काही निवडक दुकानांमध्येच असते. मागील काही वर्षात मायक्रोएटीएमचा वापर वाढला आहे कारण यात एटीएमचा खर्च लागत नाही आणि काम मात्र एटीएमप्रमाणेच होते. या मशीनमधून पैसे काढणे, ट्रान्सफर करणे, तिकिट बुकिंग आणि पैसे जमा करणे, इतर विविध ऑनलाइन कामे करता येतात. 

आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम

जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टमचा वापर करू शकता. यात तुम्हाला शुल्क भरावे लागणार नाही. कारण रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार यातून शुल्क आकारले जाणार नाही. या सुविधेअंतर्गत तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंट आणि मोबाइल नंबरच्या मदतीने पैसे काढता येतात. युआयडीएआयद्वारे ऑथेंटिकेशन होत यातून पैसे काढता येतात. यामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड किंवा पिन ची गरज नसते. ही मशीनदेखील स्वाइप मशीनसारखीच असते, मात्र त्यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील लागलेला असतो. अर्थात जर तुमचे आधार बॅंक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. नव्या वर्षात बॅंकिंगशी संबंधि नियमांमध्ये झालेले बदल जाणून घ्या म्हणजे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी