ATM Cash Withdrawals | या तारखेपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार, पाहा नवीन चार्जेस आणि इतर माहिती

ATM Cash Withdrawals | जानेवारी महिन्यापासून बॅंकेच्या ग्राहकांना अधिक शुल्क भरावे लागणार आहे. बॅंकेने दिलेल्या एटीएमच्या मोफत ट्रान्झॅक्शन (Free ATM Transactions) संख्येच्या वर तुमचे ट्रान्झॅक्शन संख्या गेल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. जून महिन्यात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) बॅंकांना नियोजित मोफत ट्रान्झॅक्शननंतर होणाऱ्या एटीएममधील कॅश काढण्याच्या आणि इतर ट्रान्झॅक्शनवरील शुल्क (ATM Transaction charges) १ जानेवारी २०२२ पासून वाढवण्याची परवानगी दिली होती.

ATM Transaction charges
एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्क  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बॅंका वाढवणार एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्क
  • आरबीआयकडून बॅंकांना शुल्क वाढवण्यासाठी परवानगी
  • नवीन शुल्क आकारणी १ जानेवारी २०२२ पासून लागू

ATM Cash Withdrawals Charges | नवी दिल्ली :  एटीएममधून (ATM) पैसे काढणे आता आणखी महाग होणार आहे. जानेवारी महिन्यापासून बॅंकेच्या ग्राहकांना अधिक शुल्क भरावे लागणार आहे. बॅंकेने दिलेल्या एटीएमच्या मोफत ट्रान्झॅक्शन (Free ATM Transactions) संख्येच्या वर तुमचे ट्रान्झॅक्शन संख्या गेल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. जून महिन्यात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) बॅंकांना नियोजित मोफत ट्रान्झॅक्शननंतर होणाऱ्या एटीएममधील कॅश (Cash withdrawal from ATM) काढण्याच्या आणि इतर ट्रान्झॅक्शनवरील शुल्क (ATM Transaction charges) १ जानेवारी २०२२ पासून वाढवण्याची परवानगी दिली होती. आरबीआयच्या  मार्गदर्शक तत्त्वांनुसार एटीएममधील मोफत ट्रान्झॅक्शननंतरच्या व्यवहारांवर १ जानेवारी २०२२ पासून २१ रुपये + जीएसटी इतके शुल्क आकारले जाणार आहे. अॅक्सिस बॅंकेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (ATM Cash Withdrawals to get more costlier from this date, Check new charges)

बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेची परवानगी

सर्वच बॅंकांना एटीएमवरील मोफत ट्रान्झॅक्शननंतरच्या व्यवहारांवरील शुल्क वाढवण्याची परवानगी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिली आहे. १ जानेवारी २०२२ पासून ग्राहकांना आता मोफत ट्रान्झॅक्शन संख्या संपल्यानंतर २१ रुपये प्रति ट्रान्झॅक्शन द्यावे लागणार आहेत. शिवाय यावर जीएसटी करदेखील ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार आहे. याआधी बॅंका ग्राहकांकडून २० रुपये वसूल करत होत्या. रिझर्व्ह बॅंकेनेदेखील आपल्या सर्क्युलरमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे.

इंटरचेंज ट्रान्झॅक्शनवरील शुल्कदेखील महागले

अर्थात ग्राहकांना दर महिन्यासाठी मोफत पाच एटीएम ट्रान्झॅक्शनची सुविधा त्यांच्या बॅंकेकडून मिळत राहणारच आहे. या पाच ट्रान्झॅक्शनमध्ये वित्तीय आणि बिगर वित्तीय अशा दोन्ही ट्रान्झॅक्शनचा समावेश आहे. मेट्रो शहरांमध्ये ग्राहक तीन वेळा एटीएममध्ये मोफत ट्रान्झॅक्शन करू शकणार  आहेत तर बिगर मेट्रो एटीएममध्ये पाच वेळा मोफत ट्रान्झॅक्शन करता येणार आहे. याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना याची देखील परवानगी दिली आहे की बॅंकांनी इंटरचेंजसाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शनमागील शुल्क वाढवावे. त्यामुळे वित्तीय ट्रान्झॅक्शनसाठी आता बॅंका १५ रुपयांऐवजी १७ रुपयांचे शुल्क आकारणार आहेत, तर विगर वित्तीय ट्रान्झॅक्शनसाठी ५ रुपयांऐवजी ६ रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. हे सर्वच सेंटरसाठी लागू असणार आहे. ही नवीन शुल्क आकारणी १ ऑगस्ट २०२१ पासून लागू झाली आहे.

आरबीआयच्या नवीन गुंतवणूक योजना

दरम्यान आरबीआय सर्वसामान्य नागरिकांसाठी गुंतवणुकीची योजना आणली आहे. आरबीआय रिटेल डायरेक्ट योजनेअंतर्गत सर्वसामान्य किंवा रिटेल गुंतवणुकदार सरकारी कर्जरोखे किंवा बॉंड्समध्ये पैसा गुंतवू शकणार आहेत. या योजनेमुळे गुंतवणुकदारांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे आणलेल्या सिक्युरिटिजमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणुकदार सरकारी सिक्युरिटिज खाते ऑनलाइन मोफत स्वरुपात सुरू करू शकतात. आतापर्यत सरकारी सिक्युरिटिज मार्केटमध्ये मध्यम वर्ग, ज्येष्ठ नागरिक, छोटी बचत करणारे गुंतवणुकदार यांनी म्युच्युअल फंडांसारखे पर्याय निवडावे लागत होते. आता त्यांना गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय मिळाला आहे. यामुळे छोट्या गुंतवणुकदारांना निर्धास्तपणे गुंतवणूक करता येणार आहे. शिवाय यातून चांगला परतावादेखील मिळणार आहे. आर्थिक समावेशकतेसाठी तळातील शेवटच्या माणसाचाही सहभाग आवश्यक आहे. ऑनलाइन खाते सुरू करता येणार आहे, त्यामुळे नोकरदारांना घरबसल्या सुरक्षितरित्या गुंतवणूक करता येणार आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी