ATM Cash Transaction : ATM मधून निघाली नाही कॅश आणि खात्यातून डेबिट झाले पैसे तर काय कराल? वाचा खास टिप्स

एटीएम मुळे बॅकिंग सेवा अधिक सुलभ झाली आहे. आपल्या खात्यातून रोख रक्कम काढण्यासाठी आपल्याला बँकेत जायची गरजच नाही, अवघ्या काही सेकंदात एटीएममधून रोख रक्कम आपल्या हातात येते. असे असले तरी या एटीएममुळे अनेकवेळेला समस्या उद्भवतात. कधी कधी एटीएममधून पैसे काढताना रोख रक्कम येत नाही आणि आपल्या खात्यातून ती रक्कम डेबिट झाली असते. अशा घटना अनेक ग्राहकांसोबत झाल्या आहेत आणि या घटनांमुळे ग्राहक घाबरून जातात.

ATM
एटीएम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • एटीएम मुळे बॅकिंग सेवा अधिक सुलभ झाली आहे.
 • असे असले तरी या एटीएममुळे अनेकवेळेला समस्या उद्भवतात.
 • कधी कधी एटीएममधून पैसे काढताना रोख रक्कम येत नाही आणि आपल्या खात्यातून ती रक्कम डेबिट झाली असते.

ATM Cash Transaction :मुंबई : एटीएम (ATM) मुळे बॅकिंग सेवा (Banking Service) अधिक सुलभ झाली आहे. आपल्या खात्यातून रोख रक्कम काढण्यासाठी (cash withdrawal) आपल्याला बँकेत जायची गरजच नाही, अवघ्या काही सेकंदात एटीएममधून रोख रक्कम आपल्या हातात येते. असे असले तरी या एटीएममुळे अनेकवेळेला समस्या उद्भवतात. कधी कधी एटीएममधून पैसे काढताना रोख रक्कम येत नाही आणि आपल्या खात्यातून ती रक्कम डेबिट (Debit) झाली असते. अशा घटना अनेक ग्राहकांसोबत झाल्या आहेत आणि या घटनांमुळे ग्राहक घाबरून जातात. परंतु यात घाबरून जाण्याचे कारण नाही. अशी वेळ आल्यास काय करता येईल याबद्दल आपण जाणून घेऊया (atm cash withdraw money deducted but cash not dispensed know rbi rule and atm tips in marathi)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 29 July 2022: सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, चांदीदेखील वधारली...अमेरिकन घटकांचा परिणाम, पटापट पाहा ताजा भाव 


पाच दिवसांत पैसे येतील परत

जर एटीएममध्ये पैसे काढताना पैसे आलेच नाही आणि खात्यातून पैसे डेबिट झाले असतील तर घाबरून जायचे कारण नाही. तांत्रिक कारणांमुळे अशा घटना घडतात. हे पैसे परत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कालावधी ठरवून दिला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार डेबिट झालेले पैसे पाच दिवसांच्या आत खातात परत करणे बँकेला बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दर दिवशी बँकेला रुपये भरपाई म्हणून द्यावी लागेल. 

अधिक वाचा : Changes from August : 1 ऑगस्टपासून होतायत अनेक बदल, वेळीच लक्ष दिलं नाही तर पडेल भुर्दंड

या गोष्टींची घ्या काळजी

 1. कॅश काढताना एटीएममध्ये व्यवहार पूर्ण होईपर्यंत कॅश विड्रॉची नोटिफिकेशन चेक करा.
 2. कॅश न निघाल्यास बँकेतील खात्यातील रक्कम तापासून पहा.
 3. जर एटीएममधून पैसे नाही निघाले तर पाच दिवस वाट पहा, बहुतांश वेळी पाच दिवसांत पैसे बँक खात्यात परत येतात. 
 4. जर पाच दिवसानंतरही पैसे परत नाही आले तर बँकेत जाऊन यावर रीतसर तक्रार करावी
 5. जर तक्रार केल्यानंतरही ३० दिवसांत पैसे नाही आले तर बँकेत जाऊन वरिष्ठ अधिकार्‍यांकडे जाऊन तक्रार करावी

अधिक वाचा : ITR Filing: करदात्यांना पाठवलेल्या कडक भाषेतील मेसेजवरील टीकेनंतर, बदलला प्राप्तिकर विभागाचा सूर 

ऑनलाईन तक्रार करावी

 1. स्टेट बँकेत जर अशी समस्या उद्भवली असेल तर आरबीयाने निर्धारित केलेल्या कालावधीत पैसे नाही आले तर या लिंकवर जाऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता. https://crcf.sbi.co.in/ccf/ under Existing Customer //ATM related//ATM related//Account Debited but cash not dispensed 
 2. तसेच एसबीआयच्या हेल्पलाईन क्रमांक 1800 11 2211 (toll-free), 1800 425 3800 (toll-free) वर फोन करून तक्रार करू शकता.
 3. तसेच 080-26599990 या क्रमाकांवर सकाळी ८ ते सांयकाळी ८ वाजेपर्यंत फोन करून तक्रार करू शकता. 

अधिक वाचा : SBI Update : स्टेट बॅंकेची नवी व्हॉट्सअप बॅंकिंग सुविधा, पाहा ग्राहकांना कशी वापरता येणार...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी