bal aadhar card : आधार कार्डच्या 'या' नियमात बदल

authentication and rules regarding bal aadhar card : भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. नव्या नियमानुसार जन्म होताच संबंधित हॉस्पिटलकडून प्रमाणपत्र वा स्लिप घेऊन पालक बाळाच्या आधारसाठी अर्ज करू शकतात.

authentication and rules regarding bal aadhar card
आधार कार्डच्या 'या' नियमात बदल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आधार कार्डच्या 'या' नियमात बदल
  • जन्म होताच संबंधित हॉस्पिटलकडून प्रमाणपत्र वा स्लिप घेऊन पालक बाळाच्या आधारसाठी अर्ज करू शकतात
  • बाळ पाच वर्षांचे होईपर्यंत त्याच्या बायोमेट्रिकची आवश्यकता नसते

authentication and rules regarding bal aadhar card : नवी दिल्ली : भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आधारची माहिती सादर करावी लागते.

दररोज आर्थिक व्यवहारांच्या निमित्ताने कोट्यवधी आधार क्रमांकांचे ओटीपीच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन सुरू असते. अनेक महत्त्वाच्या करारांमध्ये आधारची माहिती हा मुख्य आधार आहे.

आधारचे महत्त्व वाढले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आधार आवश्यक आहे. हल्ली तर जन्मलेल्या बाळांची पण आधारकार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  नव्या नियमानुसार जन्म होताच संबंधित हॉस्पिटलकडून प्रमाणपत्र वा स्लिप घेऊन पालक बाळाच्या आधारसाठी अर्ज करू शकतात. बाळ पाच वर्षांचे होईपर्यंत त्याच्या बायोमेट्रिकची आवश्यकता नसते. पण नंतर त्याचे बायोमेट्रिक घेतले जाते. इतरांच्या आधार प्रमाणेच बाल आधार आहे. 

'बाल आधार'साठी आवश्यक कागदपत्रे

  1. 'बाल आधार'साठी मुलाच्यावतीने त्याचे पालक अर्ज करू शकतात
  2. नोंदणीसाठी मुलाचे वय पाच पेक्षा कमी असणे आवश्यक
  3. मुलाच्या जन्माचा दाखला (बर्थ सर्टिफिकेट), मुलाच्या पालकांचे आधार क्रमांक आणि किमान एका पालकाचा फोन नंबर तसेच मुलाचा पासपोर्ट साइझ (आकाराचा) फोटो. मूल आणि पालक यांच्यातील नाते दर्शविणाऱ्या कागदपत्रांना महत्त्व आहे हे लक्षात ठेवा.
  4. छाननीअंती अर्ज मंजूर होतो आणि 'बाल आधार' दिले जाते

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी