Automobile sector | 'चिप'चा तुटवडा, वाहन उत्पादक क्षेत्राच्या १००० कोटींच्या नुकसानीचा अंदाज, मोठे संकट

Auto sector | चिपच्या तुटवड्यामुळे देशातील वाहन उत्पादक क्षेत्रासमोर (Automobile sector) मोठे आव्हान निर्माण झाले आहे. चिप शॉर्टेजचे संकट एवढे मोठे आहे की फक्त वाहन उद्योगच नाही तर देशांतर्गत ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्सवरदेखील याच्या तडाख्यात सापडले आहेत. आगामी दिवसांमध्ये वाहन उत्पादक आणि वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांना मोठाच फटका बसणार आहे. एका अंदाजानुसार वाहन उत्पादक कंपन्यांना चिपच्या तुटवड्यामुळे जवळपास १,००० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

Automobile sector
वाहन उत्पादन क्षेत्र 
थोडं पण कामाचं
  • ऑटोमोबाइल क्षेत्रासमोर सेमीकंडक्टर चिपचे संकट
  • ऑटो सेक्टरचे १,००० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती
  • ऑटो कॉम्पोनंट कंपन्यांना देखील बसला मोठा फटका

Automobile sector | नवी दिल्ली : देशातील सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्याचे (Chip shortage)संकट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. चिपच्या तुटवड्यामुळे देशातील वाहन उत्पादक क्षेत्रासमोर (Automobile sector) मोठे आव्हान निर्माण झाले आहे. चिप शॉर्टेजचे संकट एवढे मोठे आहे की फक्त वाहन उद्योगच नाही तर देशांतर्गत ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्सवरदेखील याच्या तडाख्यात सापडले आहेत. आगामी दिवसांमध्ये वाहन उत्पादक आणि वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांना मोठाच फटका बसणार आहे. एका अंदाजानुसार वाहन उत्पादक कंपन्यांना चिपच्या तुटवड्यामुळे जवळपास १,००० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. (Automobile sector to face Rs 1,000 crore loss due to Chip shortage)

तसे पाहिले तर वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांना म्हणजे ऑटो कॉम्पोनंट कंपन्यांना दुहेरी फटका बसला आहे. चिपच्या तुटवड्यामुळे हे क्षेत्र आधीच अडचणीत सापडलेले होते. आता कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्यामुळे या कंपन्यांचा उत्पादन खर्च चांगलाच वाढला आहे. त्यामुळे त्याचा दणका या क्षेत्राला बसला आहे.

सेमीकंडक्टर उद्योगात ऑटो सेक्टरचा हिस्सा

सध्याच्या परिस्थितीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत उद्योगाच्या एकूण उलाढालीवर परिणाम करणाऱ्या दोन घटकांचा ऑटो कॉम्पोनंट कंपन्यांवर दबाव येतो आहे. त्यामुळे भविष्यात जरी वाहनांना बाजारपेठेत मागणी असली तरी या क्षेत्राला मात्र फटका बसण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टर उद्योगामध्ये ऑटोमोबाइल क्षेत्राचा हिस्सा फक्त ७ ते १० टक्के आहे. अर्थात कारमध्ये वापरण्यात येणाऱ्या चिपची संख्या लक्षात घेता हे प्रमाण २० टक्क्यांपर्यत जाऊ शकते.

चिपच्या तुटवड्यामुळे ऑटोमोबाइल क्षेत्राचे १,००० कोटींचे नुकसान

चालू आर्थिक वर्षात म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षात चिपच्या तुटवड्यामुळे वाहन उत्पादन क्षेत्राच्या महसूलात १,००० कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज, ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात इक्राने पॅसेंजर व्हेहिकल्स मॅन्युफॅक्चरर्सच्या उत्पादनात पाच लाख वाहनांनी घटण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यामुळे या क्षेत्राचे १,५०० ते २,००० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. 

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये ऑटो कॉम्पोनंट उद्योगाचा वार्षिक व्यवसाय ६५ टक्क्यांनी वाढून २६.६ अब्ज डॉलरचा झाला आहे. वाहनांची मागणी पुन्हा वाढणे, सेमीकंडक्टर्सच्या तुटवड्याचा मुद्दा, उत्पादन खर्चातील वाढ, लॉजिस्टिक कॉस्टमधील वाढ हे सर्व घटक असतानादेखील ऑटो सेक्टरमध्ये रिकव्हरीचे संकट घोंगावते आहे.

कोरोना महामारीच्या संकटकाळात ऑटोमोबाइल क्षेत्राला मोठा फटका बसला होता. त्यातून हे क्षेत्र सावरत असतानाच आता पुन्हा सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारपेठेत वाहनांची मागणी वाढत असताना सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा आणि उत्पादन खर्चातील वाढ या मुद्द्यांमुळे देशातील ऑटोमोबाइल क्षेत्र मोठ्या संकटाला तोंड देते आहे. मागील काही वर्षे या क्षेत्रासाठी खूपच आव्हानत्मक ठरली आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी