Baba Ramdev Latest : गौतम अदानींना बाबा रामदेवचे आव्हान... पतंजलीची हनुमान उडी आणि बाबाजींचे 'धना'सन...

Patanjali 4 IPO : एकीकडे गौतम अदानी आपली संपत्ती तुफान वेगाने वाढवत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर बाबा रामदेव यांनी पतंजलि लि.च्या माध्यमातून आपला विस्तार तुफान वाढवला आहे. आता तर आगामी काळात बाबा रामदेव यांच्या 4 कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. अदानी समूह आणि पतंजलि दोन्हीही खाद्यतेलाच्या व्यवसायात वेगाने विस्तार करत आहेत. त्यामुळे आता अदानींना बाबा रामदेव यांचे आव्हान असणार आहे.

Baba ramdev
बाबा रामदेव  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मागील काही वर्षात अनेक पहिल्या पिढीलीच उद्योजक आणि व्यावसायिक यांनी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आपला झेंडा रोवला आहे.
  • गौतम अदानी आणि बाबा रामदेव यांच्या घोडदौडीने तर सर्वांना थक्क केले आहे
  • आता आपल्या पतंजलीच्या विस्तारातून बाबा रामदेव गौतम अदानींनाच स्पर्धा देण्याच्या तयारीत आहेत

Patanjali's 4 IPO : नवी दिल्ली : भारतीय उद्योगविश्वाने मागील काही वर्षात मोठी झेप घेतली आहे. जी उद्योग घराणी आधीच पाय रोवून उभी होती त्यांनी प्रचंड विस्तार केलाच. मात्र त्याचबरोबर अनेक पहिल्या पिढीलीच उद्योजक (Industrialist) आणि व्यावसायिक यांनी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आपला झेंडा रोवला आहे. अशाच दोन व्यक्ती म्हणजे गौतम अदानी (Gautam Adani) आणि बाबा रामदेव (Baba Ramdev). गौतम अदानींनी तर तुफान वेगाने संपत्ती वाढवत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्तीचा (World's second richest) किताब नुकताच पटकावला आहे. अदानी समूहाच्या कंपन्या शेअर बाजारात धूम करत आहेत. आता अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. आघाडीचे उद्योग समूह किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीचेन नसून योगगुरूचे कॉर्पोरेट गुरू झालेल्या बाबा रामदेव यांचे आहे. (Baba Ramdev to compete with Gautam Adani as 4 Patanjali companies to get listed in share market)

अधिक वाचा : WhatsApp वापरतायं तर रहा सावधान !, Unknow number वरून शिक्षकाला कॉल आला, थोडा वेळ बोलणं होताच झाली फसवणूक 

योगगुरू बाबा रामदेव यांनी शुक्रवारी त्यांच्या व्यवसायाबाबत मोठी घोषणा केली आहे. पतंजली समूह (Patanjali Group)पुढील चार ते पाच वर्षांमध्ये आपल्या चार कंपन्यांची नोंदणी शेअर बाजारात करणार आहे. यासोबतच कंपनीने आपला व्यवसाय अडीच पटीने वाढवण्याची योजनाही जाहीर केली आहे.

बाबा रामदेव आणि अदानींची स्पर्धा

बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाचे मुख्य लक्ष खाद्यतेल व्यवसायावर (Edible Oil business) आहे. सध्या भारतातील या व्यवसायात सध्या अदानी विल्मारचे वर्चस्व आहे. ही अदानी समूहाचीच एक आघाडीची कंपनी आहे. दुसऱ्या बाजूला रुची सोयाला विकत घेतल्यापासून रामदेव बाबांची पतंजलीदेखील खाद्यतेलाच्या बाजारात विस्तार करते आहे. भारताच्या खाद्यतेलाच्या बाजारपेठेत अदानी विल्मरचा वाटा तब्बल 19 टक्के आहे. तर पतंजली फूड्सचा वाटा सुमारे 8 टक्के आहे. खाद्यतेलाच्या बाजारपेठेत आपला वाटा वाढवण्यासाठी पतंजली समूह पाम तेलाच्या बाबतीत स्वावलंबी होणार आहे. यासाठी पतंजली समूह 15 लाख एकरपेक्षा जास्त जागेत पामची झाडे लावणार आहे. 11 राज्यांतील 55 जिल्ह्यांमध्ये ही झाडे लावण्यात येणार आहेत. पतंजलीचा दावा आहे की, कोणत्याही कंपनीद्वारे भारतात करण्यात आलेली ही सर्वात मोठी पाम लागवड असेल.

अधिक वाचा : PM Modi Cars : पंतप्रधान मोदींच्या कारमध्ये सर्वात सुरक्षित आहे ही कार...एके-47, बॉम्बस्फोट, गॅस हल्ल्यापासूनही सुरक्षित

शेअर बाजारात पतंजलीची घोडदौड

फक्त खाद्यतेलाच्या व्यवसायातच नाही तर बाबा रामदेव यांच्या पतंजलीने शेअर बाजारातदेखील मोठी झेप घेतली आहे. आगामी काळात पतंजली समूहाकडेदेखील अदानी समूहाप्रमाणे शेअर बाजारात सूचिबद्ध केलेल्या अनेक कंपन्या असणार आहेत. सध्या बाबांची पतंजली फूड्स ही एकमेव कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. बाबा रामदेव यांची योजना आता समूहाच्या इतर 4 कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्याची आहे. पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली लाईफस्टाईल आणि पतंजली वेलनेस अशा या चार कंपन्या आहेत. बाबा रामदेव यांनी सांगितले की, पतंजली समूहाचा व्यवसाय अडीच पटीने वाढून येत्या पाच ते सात वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोचणार आहे. एवढेच नाही तर येत्या काही वर्षांत हा पतंजली समूह पाच लाख लोकांना रोजगारही देणार आहे.

अधिक वाचा : संन्यासी CM योगी बनले भगवान; अयोध्येत बनलं योगी आदित्यनाथ यांचं मंदिर

अदानींचा संपत्ती वाढीचा विक्रम

गौतम अदानी यांनी मागील काही दिवसात सर्वांनाच आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावली आहेत. त्यांच्या संपत्तीत तुफान वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांनी जगातील एकेक दिग्गजाला मागे टाकत जागतिक क्रमवारीत वरचे स्थान पटकावले आहे. शुक्रवारी अमेझॉनचे जेफ बेझोस यांना मागे टाकत गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले. फोर्ब्सच्या रिअल टाइम आकडेवारीनुसार, अदानी समूहाच्या (Adani Group) शेअरमध्ये वाढ झाल्यामुळे अदानीची एकूण संपत्ती 155.7 बिलियन डॉलर इतकी झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट आणि अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स सध्या शेअर बाजारात आपल्या उच्चांकीवर व्यवहार करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी