Baba Ramdev update : नवी दिल्ली : बाबा रामदेव (Baba Ramdev) हे आता चांगलेच मुरलेले उद्योगपती आणि व्यावसायिक झाले आहेत. त्यांच्या एका निर्णयाने किंवा पावलाने त्यांनी त्यांच्या रुचि सोया (Ruchi Soya) या कंपनीला कर्जमुक्त केले आहे. रुची सोया ही खाद्यतेलाच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. रामदेवांच्या पतंजलि आयुर्वेदने (Patanjali Ayurved)ही कंपनी विकत घेतली आहे. रुची सोयाने 2,925 कोटी रुपयांच्या बँकेच्या कर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे कंपनी कर्जमुक्त झाली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या नेतृत्वाखालील रुची सोयाने अलीकडेच त्यांच्या एफपीओद्वारे 4,300 कोटी रुपये उभे केले आहेत. (Baba Ramdev;s Ruchi Soya becomes debt free, Ruchi Soya share shows big surge)
नुकताच रुचि सोयाने एफपीओ (फॉलो-अप पब्लिक ऑफर) बाजारात आणला होता. म्हणजेच कंपनीने आपले काही शेअर्स बाजारात विक्रीसाठी आणले होते आणि त्याला गुंतवणुकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. यातून कंपनीने 4,300 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. यातून बाबा रामदेव यांच्या कंपनीकडे मोठी रोकड जमा झाली आहे. कंपनीने या भांडवलाचा काही भाग कर्ज फेडण्यासाठी वापरला आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी ट्विट केले की रुची सोया कर्जमुक्त झाली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, एफपीओसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कंपनीने सुमारे 1,950 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार असल्याचे सांगितले होते. मात्र कंपनीने कर्जदारांना 2,925 कोटी रुपयांची संपूर्ण कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक वाचा : Multibagger Stock | फक्त 3.48 रुपयांच्या या शेअरने एक लाखाचे केले 27 लाख...गुंतवणुकदार मालामाल
शुक्रवारी ट्रेडिंगच्या शेवटी, रुची सोयाच्या शेअरची किंमत 924.85 रुपये होती. कंपनीच्या एक दिवस आधीच्याच किंमतीच्या तुलनेत हा शेअर 106 रुपये किंवा सुमारे 13 टक्के वाढ दाखवतो आहे. ज्या ग्राहकांना FPO वाटप प्रक्रियेद्वारे रुची सोयाचे शेअर्स मिळाले त्यांना 40 टक्क्यांहून अधिक प्रीमियम मिळाला आहे किंवा फायदा झाला आहे. कंपनीचा FPO 28 मार्च रोजी बंद झाला होता आणि त्यासाठी किंमत श्रेणी 615 ते 650 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने निर्गम किंमत 650 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यास मान्यता दिली होती.
अधिक वाचा : Multibagger Stock | फारशी चर्चा न झालेला हा आहे छुपा रुस्तम शेअर...हजार गुंतवणाऱ्यांनी कमावले लाखो!
अप्रत्यक्षपणे, रुची सोया या खाद्यतेल कंपनीला रामदेवच्या पतंजलीने 2019 मध्ये सुमारे 4,350 कोटी रुपयांना विकत घेतले. ती आधीच लिस्टेड कंपनी आहे. प्रवर्तकांच्या 99 टक्क्यांवरून, कंपनीला सेबीच्या अटी पूर्ण करण्यासाठी 3 वर्षांत ते 75 टक्क्यांपर्यंत खाली आणणे आवश्यक आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने अधिग्रहण केल्यापासून रुची सोयाच्या शेअर्सच्या किंमतीत चांगलीच वाढ होत होती.
कंपनीने इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) जारी केल्यानंतर, ती स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होते. पण जर कंपनीला तिची इक्विटी अधिक पातळ करायची असेल आणि अधिक निधी उभारायचा असेल तर? तेथूनच एफपीओ अस्तित्वात येतो. सोप्या भाषेत एफपीओला दुय्यम ऑफरिंग देखील म्हणतात.