PNB Stops Incentive : नवी दिल्ली : तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेत (PNB) असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी पंपावर डिजिटल मोडमध्ये पैसे भरत असाल ही बातमी वाचून तुमची नक्कीच निराशा होईल. कारण पेट्रोल-पंपांवर इंधन खरेदीसाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून डिजिटल पेमेंटवर (Digital Payment) दिलेली 0.75 टक्के सूट मागे घेण्यात आली आहे. याचा परिणाम पंजाब नॅशनल बॅंकेच्या ग्राहकांवर होणार आहे. जाणून घ्या विस्ताराने. (Bad news for PNB customers, bank stopped this facility)
या निर्णयाचा परिणाम अशा लोकांवर अधिक होईल, जे अनेकदा इंधन घेण्यासाठी कार्डद्वारे पैसे देतात. सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) हा लाभ ग्राहकांना हस्तांतरित करणे थांबवले आहे. याचा परिणाम पंजाब नॅशनल बँकेच्या सर्व 18 कोटी ग्राहकांवर होणार आहे. मे महिन्यापासून पीएनबीने ग्राहकांना या सवलतीचा लाभ देणे बंद केले आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी (OMCs) ही सुविधा मागे घेतल्याचे बँकेने म्हटले आहे. PNB वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) ने माहिती दिली आहे की पेट्रोलियम कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL) पेट्रोल पंपांवर डिजिटल मोडद्वारे इंधन खरेदीच्या पेमेंटवर 0.75 टक्के सवलत मागे घेतली आहे. पीएनबीकडून सांगण्यात आले की, मे महिन्यापासून ग्राहकांना या सवलतीचा लाभ देणे बंद केले आहे.
यापूर्वी, NEFT, RTGS शुल्क देखील पंजाब नॅशनल बँकेने (PNB) वाढवले होते. बँकेने केलेला हा बदल 20 मे 2022 पासून लागू झाला आहे. PNB नुसार, ऑफलाइन व्यवहारांसाठी RTGS शुल्क 24.50 रुपये आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी 24 रुपये करण्यात आले आहे. पूर्वी शाखा स्तरावर ऑफलाइन व्यवहारांसाठी RTGS साठी शुल्क 20 रुपये होते.
सरकारी (Government ) आणि खासगी बँकांमध्ये (Private bank) दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. मात्र आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी आठवड्यातून पाच दिवस कामाची मागणी करत आहेत. आपल्या मागणीच्या समर्थनार्थ सरकारी बँकेच्या सुमारे 9 लाख कर्मचाऱ्यांनी 27 जून रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या किमान नऊ युनियन त्यांच्या मागण्यांसाठी 27 जून रोजी एकदिवसीय संपावर जाणार आहेत. त्यांना प्रत्येक शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस हवा असतो. इंडियन बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे सरचिटणीस वेंकटचलम यांनी सांगितले की सुमारे 900,000 बँक कर्मचारी या संदेश आणि इतर काही मागण्यांसाठी 27 जून रोजी काम सोडून आंदोलन करतील. आम्ही गेल्या सात वर्षांपासून सर्व संबंधितांशी बोलत आहोत. पण त्याचे फलित काही झाले नाही. पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही आमच्या मूलभूत मागण्यांपैकी एक आहे आणि ती बँक कर्मचार्यांचे आरोग्य आणि कामाच्या संतुलनासाठी योग्य मागणी आहे.