Indian Railway Update | रेल्वे प्रवाशांना दणका...'या' ट्रेनचे भाडे वाढणार ५० रुपयांनी! जाणून घ्या तपशीलवार माहिती

Railway Ticket Hike : रेल्वे भाड्यामध्ये आता वाढ होणार आहे. डिझेल इंजिनावर धावणाऱ्या गाड्यांमधून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जास्त भाडे आकारले जाऊ शकते. हे अतिरिक्त भाडे १५ एप्रिलपासून तिकीट बुकिंगच्या वेळी रेल्वे प्रवासात जोडले जाईल. रेल्वे बोर्ड आता डिझेल इंजिनावर चालणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांवर 10 ते 50 रुपयांपर्यतचा हायड्रोकार्बन अधिभार (HCS) किंवा डिझेल कर लावण्याचा विचार करत आहे.

Railway Ticket Fare to get increase
रेल्वे भाड्यात होणार वाढ 
थोडं पण कामाचं
  • रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का बसणार आहे
  • रेल्वे भाडे 10 ते 50 रुपयांपर्यंत वाढणार आहे
  • डिझेल ट्रेनच्या तिकिटात जास्तीचे भाडे आकारले जाईल

Railway ticket price hike : नवी दिल्ली : महागाईचा तडाखा सोसत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता रेल्वे प्रवासाचाही फटका बसणार आहे. रेल्वे भाड्यामध्ये आता वाढ होणार आहे.  डिझेल इंजिनावर धावणाऱ्या गाड्यांमधून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जास्त भाडे आकारले जाऊ शकते. हे अतिरिक्त भाडे १५ एप्रिलपासून तिकीट बुकिंगच्या वेळी रेल्वे प्रवासात जोडले जाईल. रेल्वे बोर्ड आता डिझेल इंजिनावर चालणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांवर 10 ते 50 रुपयांपर्यतचा हायड्रोकार्बन अधिभार (HCS) किंवा डिझेल कर लावण्याचा विचार करत आहे. डिझेल इंजिनचा वापर करून अर्ध्याहून अधिक अंतरापर्यंत धावणाऱ्या गाड्यांवर हा अधिभार लागू होईल. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे इंधनावर गंभीर परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंधन आयातीचा फटका कमी करण्यासाठी रेल्वे हे पाऊल उचलणार आहे. (Bad News for Railway passengers, railway ticket fare to get increased for these trains)

अधिक वाचा : Indian Railways Rule | रेल्वे प्रवासादरम्यान सामान चोरीला गेल्यास चिंता नसावी, मिळेल वस्तूंची भरपाई...जाणून घ्या नियम

भाडे 50 रुपयांपर्यंत वाढणार 

एसी क्लाससाठी 50 रुपये, स्लीपर क्लाससाठी 25 रुपये आणि जनरल क्लाससाठी 10 रुपये तीन श्रेणींमध्ये आकारले जातील. उपनगरीय रेल्वे प्रवासाच्या तिकिटांवर असा कोणताही अधिभार लावला जाणार नाही. निर्धारित अंतराच्या ५० टक्के डिझेलवर धावणाऱ्या गाड्या ओळखण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने सर्व झोनला दिले आहेत. ही यादी दर तीन महिन्यांनी सुधारावी लागते. तथापि, 15 एप्रिलपूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर अधिभार लावण्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

अधिक वाचा : Fuel Price | तुमच्या फायद्याची मोठी बातमी! युक्रेन युद्ध असूनही डिझेल-पेट्रोल होणार स्वस्त...अर्थमंत्र्यांचा आहे हा प्लॅन

डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे घेतला निर्णय 

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष तसेच सौदी अरेबिया आणि येमेन यांच्यातील संघर्षांमुळे जागतिक तेलाच्या किमती सध्या विक्रमी उच्चांक गाठत आहेत. भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल आयात करत असूनही, पुरवठ्याची कमतरता आहे. देशात सलग 12 दिवस इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या इंधनाच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.

अधिक वाचा : Gold Price Today | सोने-चांदी झाले स्वस्त...ग्राहकांमध्ये खरेदीचा जोरदार उत्साह, पाहा आजचा सोन्याचा भाव, करा संधीचे सोने!

रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी निधी वापरणार

भारतीय रेल्वेच्या चालू असलेल्या वीज मोहिमेसाठी देखील HCS अधिभार वापरला जाईल. भारतीय रेल्वे 'मिशन 100% विद्युतीकरण - नेट झिरो कार्बन उत्सर्जन' योजनेअंतर्गत लोकांना पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतूक प्रदान करण्यासाठी रेल्वे आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रवास भाड्यातील या वाढीमुळे ट्रेनचे अंतिम भाडे वाढेल. मूळ भाड्याला हात न लावता सरचार्ज, सवलती कमी करून किंवा आराम आणि सुविधा कमी करून एकूण भाडे वाढवण्याचा रेल्वे बोर्ड प्रयत्न करत आहे.

ट्रेनमध्ये सामानाची चोरी झाल्यास 

तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर हे तुम्हाला माहित असायला हवे. भारतीय रेल्वेच्या प्रवाशांच्या (Railway Passengers) सोयीसाठी काही खास नियम (Railway Rules)आहेत ज्यांची माहिती घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक, रेल्वेने प्रवास करणाऱ्या 80 टक्के प्रवाशांना हे नियम माहीत नसतात. यामुळे ते रेल्वेच्या (Indian Railway) सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, रेल्वे प्रवासादरम्यान तुमचे सामान चोरीला (Stolen goods rule)गेले तर तुम्हाला त्याची भरपाई मिळू शकते. तुम्ही तुमच्या सामानाची भरपाई मागू शकता. एवढेच नाही तर ६ महिन्यांत तुमचा माल न मिळाल्यास तुम्ही ग्राहक मंचाकडेही जाऊ शकता. असे बरेच नियम आहेत ज्याबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या नियमांची माहिती असेल तर तुम्हाला प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी